भायखळ्यातील गिरणी परिसरात जागतिक दर्जाचे टेक्सटाईल क्राफ्ट आणि
कल्चरल म्युझियम उभारण्याला गती
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेला मूर्त रूप
मुंबई, दि. 14 : भायखळा परिसरातील ऐतिहासिक इंडिया युनायटेड गिरणी जागेवर अत्याधुनिक टेक्सटाईल, क्राफ्ट आणि कल्चरल म्युझियम प्रकल्प उभारण्याच्या कामांना वेग आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पना आणि पुढाकारातून विकसित होणारा हा प्रकल्प लवकरच प्रत्यक्षात येणार असून, या संदर्भातील सामंजस्य करार झाला आहे
मुंबईच्या समृद्ध वस्त्रोद्योग वारशाचे जतन, पुनरुज्जीवन आणि सांस्कृतिक पुनरुत्थान साधण्याचे ध्येय या भव्य प्रकल्पामागे आहे. मुंबई महानगरपालिका, नॅशनल टेक्सटाईल कॉर्पोरेशन (एनटीसी) आणि जिंदाल साऊथ वेस्ट (जेएसडब्लू) फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प राबविण्यात येत असून, सुमारे चार हजार चौरस मीटर क्षेत्रफळाचे हे गिरणी प्रांगण जागतिक दर्जाच्या सांस्कृतिक केंद्रात रूपांतरित होणार आहे.
No comments:
Post a Comment