या प्रकल्पांतर्गत आकर्षक गॅलरी, कला स्टुडिओ, परफॉर्मन्स स्पेसेस, खुल्या जागेतील शिल्प उद्यान, रेस्टॉरंट्स व कॅफे, कार्यशाळा व कार्यक्रमांसाठी स्वतंत्र सेक्शन्स अशा बहुउद्देशीय आणि आधुनिक सुविधांचा समावेश असणार आहे. संग्रहालयाला लिव्हिंग म्युझियम म्हणून विकसित करण्यात येणार असून, जुन्या गिरणीचा ऐतिहासिक औद्योगिक वारसा जतन करत आधुनिक सांस्कृतिक वातावरणाची सांगड घातली जाणार आहे.
या प्रकल्पाचे संपूर्ण काम जेएसडब्ल्यू फाउंडेशन विनालाभ पद्धतीने करीत असून, संग्रहालयातून प्राप्त होणारे उत्पन्न देखभाल व सार्वजनिक उपक्रमांसाठी वापरले जाणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या 'शहरी वारसा संवर्धन व सांस्कृतिक पुनरुत्थान' या दृष्टीकोनाला हा प्रकल्प आधार देणारा असून मुंबईतील विस्मृतीत गेलेल्या गिरण्यांचा वारसा नव्या पिढीसमोर आणण्यासोबतच हा प्रकल्प महत्त्वपूर्ण शहरी पुनरुत्थानाचे आदर्श उदाहरण ठरेल या प्रकल्पाला अधिक गती देण्यासाठी या प्रकल्पाचे कालबद्ध नियोजन करावे आणि सर्व संबधित विभागाने सहकार्य करावे असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत असे जेएसडब्ल्यू फाउंडेशनने स्पष्ट केले आहे.
No comments:
Post a Comment