Thursday, 12 February 2026

शालेय विद्यार्थ्यांसाठी यंदापासून एक नवा उपक्रम

 शालेय विद्यार्थ्यांसाठी यंदापासून एक नवा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यापूर्वी केवळ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी मर्यादित असलेल्या या व्यासपीठावर आता शासकीय रेखाकला परीक्षा (ग्रेड परीक्षा) व बालचित्रकला स्पर्धेतील गुणवंत शालेय विद्यार्थ्यांचाही गौरव केला जाणार आहे. शालेय स्तरावरील विद्यार्थ्यांना थेट राज्याच्या मुख्य कला प्रवाहात सहभागी करून घेण्याचा हा निर्णय कला क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. तसेच महाराष्ट्राचा समृद्ध कला वारसा पुढील पिढीकडे पोहोचविण्यासाठी हे प्रदर्शन महत्वाचे ठरेल. सांगलीकर कलाप्रेमीविद्यार्थी आणि शिक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कलाविष्काराचा आनंद घ्यावाअसे आवाहन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.

ज्येष्ठ कलावंत जी. एस. माजगावकर यांचा होणार विशेष सन्मान

 ज्येष्ठ कलावंत जी. एस. माजगावकर यांचा होणार विशेष सन्मान

              -उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सांगली पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील

 

मुंबई,दि.१२: कला संचालनालयामार्फत आयोजित ६५ वे महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन (विद्यार्थी विभाग)’ यंदा सांगली येथे आयोजित करण्यात येत असून१६ ते २२ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत कलाविश्व महाविद्यालयशांतिनिकेतन आवार येथे हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले. शालेय विद्यार्थ्यांचा विशेष गौरव हे यंदाच्या प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण ठरणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली.

 

पालक मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणालेराज्यातील शासकीय व खासगी कला संस्थांमधील विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला व्यासपीठ मिळावे या उद्देशाने हे प्रदर्शन दरवर्षी राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये आयोजित केले जाते. यंदा राज्यभरातून ३ हजार,४९० विद्यार्थ्यांच्या ५ हजार ६८० कलाकृती प्राप्त झाल्या असूनत्यापैकी निवड समितीने १,२७५ उत्कृष्ट कलाकृतींची प्रदर्शनासाठी निवड केली आहे. या प्रदर्शनादरम्यान ज्येष्ठ कलावंत जी. एस. माजगावकर यांच्या दीर्घकालीन कलात्मक आणि शैक्षणिक योगदानाचा गौरव करत महाराष्ट्र शासनाच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.

हवामान कृतीचे नवे मॉडेल

 हवामान कृतीचे नवे मॉडेल

मुंबई क्लायमेट वीक ही भारत आणि ग्लोबल साऊथ देशाच्या नेतृत्वाखालीलनागरिक-केंद्रित हवामान कृतीचे नवे मॉडेल ठरणार आहे. मुंबई क्लायमेट वीक हा सार्वजनिक-खासगी-नागरिक भागीदारीवर आधारित उपक्रम आहे. यामधून शहर पातळीवर हवामान उपाययोजना राबविण्याचा भारतीय नमुना साकारणार आहे. जर या मंचातून ठोस भागीदारीनिधी आणि धोरणात्मक निर्णय घडलेतर तो भारत आणि ग्लोबल साऊथ देशांसाठी दिशादर्शक ठरू शकतो.

 

हवामान बदल हा भविष्यातील नव्हेतर वर्तमानाचा प्रश्न आहे. मुंबई क्लायमेट वीक हा या वास्तवाला सामोरे जाण्याचा सामूहिक प्रयत्न असून जिथे कल्पनाविज्ञानउद्योग आणि नागरिक सहभाग एकत्र असेल.

 

हवामान कृती ही सर्वांची जबाबदारी आहेआणि बदलाची सुरुवात आजपासूनच करावी लागेल, हा संदेश मुंबई क्लायमेट विकच्या माध्यमातून जगभरात जाईल हे नक्की.

विज्ञान, संस्कृती आणि नागरिक सहभाग

 विज्ञानसंस्कृती आणि नागरिक सहभाग

मुंबई क्लायमेट वीकमध्ये नवोन्मेष हा केंद्रस्थानी असणार आहे. या सप्ताहात सार्वजनिक व्याख्यानेकला-संस्कृती कार्यक्रमचित्रपट प्रदर्शन आणि नागरिक कार्यशाळा आयोजित केल्या जातील. हवामान बदल हा केवळ वैज्ञानिक विषय नसून सामाजिक आणि सांस्कृतिक प्रश्नही आहेहे यातून अधोरेखित होते.

 

18 फेब्रुवारी रोजी विशेष सत्रात भारताचे अंतराळवीर राकेश शर्मा आणि अंतराळवीर शुभांशु शुक्ला (दोघेही अशोक चक्र पुरस्कारप्राप्त) शालेय विद्यार्थ्यांशी तसेच जागतिक नेतृत्वाशी संवाद साधणार असूनअंतराळ संशोधनविज्ञान आणि हवामान जबाबदारी यांचा परस्पर संबंध अधोरेखित केला जाणार आहे.

नवकल्पना आणि युवकांची भूमिका

 नवकल्पना आणि युवकांची भूमिका

मुंबई क्लायमेट वीकमध्ये नवोन्मेष हा केंद्रस्थानी असणार आहे. हवामान समस्यांवर नवे उपाय शोधण्यासाठी नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या सहकार्याने इनोव्हेशन चॅलेंज आयोजित करण्यात येणार आहे. स्टार्टअपसंशोधक आणि सामाजिक संस्था हे यामध्ये सहभागी होऊन आपले उपाय सादर करणार आहेत.

युवकांसाठी स्वतंत्र हरित नवकल्पना स्पर्धा असेल. युनिसेफच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष चर्चेत आणि उपाययोजनांमध्ये सहभागी केले जाणार आहे. भविष्यातील हवामान नेतृत्व घडवण्यासाठी हा महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो.

 

नवकल्पना आणि युवकांची भूमिका

 नवकल्पना आणि युवकांची भूमिका

मुंबई क्लायमेट वीकमध्ये नवोन्मेष हा केंद्रस्थानी असणार आहे. हवामान समस्यांवर नवे उपाय शोधण्यासाठी नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या सहकार्याने इनोव्हेशन चॅलेंज आयोजित करण्यात येणार आहे. स्टार्टअपसंशोधक आणि सामाजिक संस्था हे यामध्ये सहभागी होऊन आपले उपाय सादर करणार आहेत.

युवकांसाठी स्वतंत्र हरित नवकल्पना स्पर्धा असेल. युनिसेफच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष चर्चेत आणि उपाययोजनांमध्ये सहभागी केले जाणार आहे. भविष्यातील हवामान नेतृत्व घडवण्यासाठी हा महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो.

तीन महत्त्वाचे केंद्रबिंदू

 उपक्रमात 30 हून अधिक देशांतील प्रतिनिधीआंतरराष्ट्रीय संस्थावित्तीय संघटना आणि उद्योग क्षेत्रातील नेते सहभागी होणार आहेत. बिल गेट्सहिलरी क्लिंटन यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, उद्योगपती आणि नेते यांची उपस्थिती या कार्यक्रमाला जागतिक महत्त्व देते.

यातून भारत हवामान विषयक नेतृत्व केवळ धोरण पातळीवर नव्हेतर प्रत्यक्ष कृतीतून दाखवण्याचा प्रयत्न करत आहे.

 

तीन महत्त्वाचे केंद्रबिंदू

मुंबई क्लायमेट वीकची संकल्पना तीन प्रमुख क्षेत्रांवर आधारित आहे:

१. अन्नप्रणाली (Food Systems) -  हवामान बदलाचा शेती आणि अन्नसुरक्षेवर होणारा परिणाम लक्षात घेऊन टिकाऊ शेती आणि पोषण यावर भर.

२. ऊर्जा संक्रमण (Energy Transition) - पारंपरिक ऊर्जेऐवजी स्वच्छ आणि नवीकरणीय ऊर्जेकडे वाटचाल.

३. शहरी शाश्वतता (Urban Resilience) — शहरांना हवामान बदलाच्या परिणामांपासून सुरक्षित आणि सक्षम बनवणे.

हे तीनही घटक भारताच्या विकासाच्या केंद्रस्थानी आहेतत्यामुळे हा कार्यक्रम केवळ पर्यावरण विषयापुरता मर्यादित राहणार नाही.


Featured post

Lakshvedhi