हवामान कृतीचे नवे मॉडेल
मुंबई क्लायमेट वीक ही भारत आणि ग्लोबल साऊथ देशाच्या नेतृत्वाखालील, नागरिक-केंद्रित हवामान कृतीचे नवे मॉडेल ठरणार आहे. मुंबई क्लायमेट वीक हा सार्वजनिक-खासगी-नागरिक भागीदारीवर आधारित उपक्रम आहे. यामधून शहर पातळीवर हवामान उपाययोजना राबविण्याचा भारतीय नमुना साकारणार आहे. जर या मंचातून ठोस भागीदारी, निधी आणि धोरणात्मक निर्णय घडले, तर तो भारत आणि ग्लोबल साऊथ देशांसाठी दिशादर्शक ठरू शकतो.
हवामान बदल हा भविष्यातील नव्हे, तर वर्तमानाचा प्रश्न आहे. मुंबई क्लायमेट वीक हा या वास्तवाला सामोरे जाण्याचा सामूहिक प्रयत्न असून जिथे कल्पना, विज्ञान, उद्योग आणि नागरिक सहभाग एकत्र असेल.
हवामान कृती ही सर्वांची जबाबदारी आहे, आणि बदलाची सुरुवात आजपासूनच करावी लागेल, हा संदेश मुंबई क्लायमेट विकच्या माध्यमातून जगभरात जाईल हे नक्की.
No comments:
Post a Comment