Thursday, 12 February 2026

ज्येष्ठ कलावंत जी. एस. माजगावकर यांचा होणार विशेष सन्मान

 ज्येष्ठ कलावंत जी. एस. माजगावकर यांचा होणार विशेष सन्मान

              -उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सांगली पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील

 

मुंबई,दि.१२: कला संचालनालयामार्फत आयोजित ६५ वे महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन (विद्यार्थी विभाग)’ यंदा सांगली येथे आयोजित करण्यात येत असून१६ ते २२ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत कलाविश्व महाविद्यालयशांतिनिकेतन आवार येथे हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले. शालेय विद्यार्थ्यांचा विशेष गौरव हे यंदाच्या प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण ठरणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली.

 

पालक मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणालेराज्यातील शासकीय व खासगी कला संस्थांमधील विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला व्यासपीठ मिळावे या उद्देशाने हे प्रदर्शन दरवर्षी राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये आयोजित केले जाते. यंदा राज्यभरातून ३ हजार,४९० विद्यार्थ्यांच्या ५ हजार ६८० कलाकृती प्राप्त झाल्या असूनत्यापैकी निवड समितीने १,२७५ उत्कृष्ट कलाकृतींची प्रदर्शनासाठी निवड केली आहे. या प्रदर्शनादरम्यान ज्येष्ठ कलावंत जी. एस. माजगावकर यांच्या दीर्घकालीन कलात्मक आणि शैक्षणिक योगदानाचा गौरव करत महाराष्ट्र शासनाच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi