Thursday, 12 February 2026

मुंबई क्लायमेट वीक : हवामान कृतीसाठी भारताचा जागतिक मंच

 मुंबई क्लायमेट वीक : हवामान कृतीसाठी भारताचा जागतिक मंच

 

मुंबईत होणारा भारतातील पहिला क्लायमेट वीक हा हवामान बदलावर केवळ चर्चा न करता प्रत्यक्ष कृतीकडे नेणारा मंच ठरणार आहे. शासनउद्योगतज्ज्ञयुवक आणि नागरिक यांना एकत्र आणत हा उपक्रम ग्लोबल साऊथ देशांसाठी हवामान नेतृत्वाचा नवा नमुना मांडणार आहे.

अन्नसुरक्षास्वच्छ ऊर्जा आणि शहरी शाश्वतता या तीन महत्त्वाच्या क्षेत्रांवर भर देत नवकल्पनायुवक सहभाग आणि लोकाभिमुख कार्यक्रमांद्वारे हवामान कृती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. हवामान बदलावर उपाय म्हणजे सामूहिक जबाबदारी आणि तातडीची कृती हा यानिमित्ताने मुंबईतून दिला जाणारा संदेश स्पष्ट आहे....

शासनाने एकूण १२ करार केलेले आहेत. यामध्ये ग्रामविकास, जलसंधारण, सार्वजनिक आरोग्य, महिला व बालविकास,

 असे आहेत करार

टाटा ट्रस्टच्या सोबत शासनाने एकूण १२ करार केलेले आहेत. यामध्ये ग्रामविकासजलसंधारणसार्वजनिक आरोग्यमहिला व बालविकासगडचिरोली जिल्हा प्रशासनमुख्यमंत्री सहाय्यता निधीनागपूर येथील राष्ट्रीय कर्करोग संस्थाअखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थामध्य भारत आयुर्विज्ञान संस्थाकेअर हॉस्पिटलस्वामी विवेकानंद मेडिकल मिशनमिदास मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सोबत सामंजस्य करारांचा समावेश आहे. तसेच नाम फाउंडेशनचा जलसंधारण विभागासोबत करार करण्यात आला आहे.

सामंजस्य करारांची व्याप्ती

 सामंजस्य करारांची व्याप्ती

मातानवजात बालकबालक आणि किशोरवयीन मुलांसाठी आरोग्य सेवा बळकट करणेटेलिमेडिसिनसह इतर माध्यमांतून उपचार सहज देणे,  शहरी आणि दुर्गम भागातील सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवा वाढवणेएकात्मिक आपत्कालीन व्यवस्थापन सेवाद्वारे उत्तम आपत्कालीन प्रतिसादास पाठबळ देणे.  दोन वर्षांखालील मुलांमधील खुंटलेली वाढकमी वजन आणि कुपोषण रोखण्यास मदत करणेकिशोरवयीन कुपोषण आणि रक्तक्षय दूर करणेगडचिरोली सारख्या जिल्ह्यांवर विशेष लक्ष केंद्रित करून 'टेक-होम रेशनसारख्या योजनांचे वितरण मजबूत करणेतलावांचे पुनरुज्जीवनजलकुंभ आणि नद्यांमधील गाळ काढणेभूजल पुनर्भरण सुधारणेमराठवाडा आणि विदर्भासह पाणीटंचाईग्रस्त भागांवर विशेष भर देऊन मृद व जलसंधारण योजनांची अंमलबजावणी करणेहवामान बदलांचा अभ्यास करून शेतीला प्रोत्साहन देणेवन-आधारित आणि ग्रामीण बिगर-शेती उपजीविकेला पाठबळ देणेआरोग्यशिक्षणपोषणपाणीस्वच्छता आणि उपजीविका या सर्वांना एकत्र आणणारा एकात्मिक ग्राम विकास साधणे

सामंजस्य करार उद्देश

 कराराचा उद्देश

सामंजस्य करार तंत्रज्ञानडिजिटल नवोपक्रम आणि 'लास्ट-माईल कनेक्टिव्हिटी'  याद्वारे आरोग्यपोषणजलसंधारण आणि ग्रामीण उपजीविका यांमधील शासकीय  प्राधान्यक्रमांना पाठबळ देणेसमुदायांपर्यंत प्रमुख कल्याणकारी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करणेनागपूर येथील सहा मान्यताप्राप्त रुग्णालयांसोबत केलेल्या करारांद्वारेगरजू रुग्णांना आर्थिक सहाय्य देणेमुख्यमंत्री सहाय्यता निधी अंतर्गत दुर्धर गंभीर आजारांमध्ये सुलभ व कमी खर्चाचे उपचार उपलब्ध करून देणे आहे.

महाराष्ट्र शासनाशी भागीदारी करून आरोग्य, शिक्षण, पोषण, उपजीविका, पाणी आणि स्वच्छता कार्यक्रमांमध्ये

 टाटा ट्रस्ट्सचे अध्यक्ष नोएल टाटा म्हणाले,   महाराष्ट्र शासनाशी भागीदारी करून आरोग्यशिक्षणपोषणउपजीविकापाणी आणि स्वच्छता कार्यक्रमांमध्ये सुसूत्रता आणणार आहे.  सर्व सामन्यांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न राहणार आहे. शासनाचे विविध विभाग आणि समुदायांसोबत सकारात्मक परिणाम आणण्याचा हेतू असणार आहे.  शासन आणि टाटा ट्रस्ट्स यांनी आज राज्याच्या एकात्मिक विकासाला पाठबळ देण्यासाठी सामंजस्य करारांवर  स्वाक्षरी करून धोरणात्मक भागीदारी अधिकृत केली आहे. नाम फाउंडेशनचे नाना पाटेकर यांनीही शासनासोबत जलसंधारण क्षेत्रात काम करण्यास मदत मिळत असल्याबाबत समाधान व्यक्त केले.

नाम फाउंडेशन राज्यात जलसंधारणामध्ये

 नाम फाउंडेशन राज्यात जलसंधारणामध्ये मोठे काम करीत आहे. मागील काळात जल स्त्रोतांमधील गाळ काढणे नाला,नदी खोलीकरण व रुंदीकरण आदी कामे करण्यात आली आहेत. राज्यात जलयुक्त शिवार योजना यशस्वीपणे राबविण्यात आली. ही योजना लोक चळवळीच्या स्वरूपात पुढे येत जनतेची योजना झाली. नाम फाउंडेशनच्या सहभागाने विदर्भ व मराठवाड्यातील कमी पर्जन्यमान असलेल्या भागात जलसंधारणाचे मोठे काम झाले. यासाठी टाटा ट्रस्टचीही मदत झाली असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

बहु-आयामी करार माता, नवजात बालक, बाल आणि किशोरवयीन घटकांसाठी आरोग्य सेवा बळकट

 मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणालेमागील दहा वर्षापासून टाटा ट्रस्ट सोबत शासन काम करीत आहे. केवळ निधी देऊन भागीदारी होत नाहीतर काम करून समाजात सकारात्मक प्रभाव पाडणारी भागीदारी टाटा करत असते. हे बहु-आयामी करार  मातानवजात बालकबाल आणि किशोरवयीन घटकांसाठी आरोग्य सेवा बळकट करणे,  खुंटलेली वाढ रोखून  कुपोषणावर उपाय शोधण्यासाठी मदतगार ठरतील. या सोबतच पोषणासाठी आहारात वैविध्य आणणे,  जलस्रोतांचे अधिक शाश्वतपणे जतन आणि व्यवस्थापन,  ग्रामीण महाराष्ट्रात हवामान आधारित कृषी आणि पशुधन विकासाला चालना देण्याची क्षमता या भागीदारीत आहे.

Featured post

Lakshvedhi