Thursday, 12 February 2026

परळीतील महापशूधन एक्स्पोचे शुक्रवारी पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची १४ फेब्रुवारी रोजी उपस्थिती

 परळीतील महापशूधन एक्स्पोचे शुक्रवारी पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते उद्घाटन  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची १४ फेब्रुवारी रोजी उपस्थिती

 

·         पशू प्रदर्शनाची तयारी अंतिम टप्प्यातएक हजाराहून अधिक विविध पशू

·         बीडसह राज्यातील पशू पालकांनी प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन

 

मुंबईदि. ११ : परळी येथे पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पुढाकाराने राष्ट्रीय स्तरावरील महापशुधन एक्स्पो पहिल्यांदाच आयोजित करण्यात आले आहे. या पशू प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी १३ फेब्रुवारी रोजी पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते होणार आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शनिवार, १४ फेब्रुवारी रोजी पशुधन एक्स्पोला भेट देणार आहेत.

 

शहरातील वैद्यनाथ महाविद्यालयाच्या समोरील ओपळे मैदानात पशुसंवर्धन विभागाच्या वतीने १३ ते १५ फेब्रुवारी दरम्यान 'अखिल भारतीय पशुपक्षी महा पशुधन एक्स्पो प्रदर्शनाचेभव्य आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनामध्ये देशभरातील विविध प्रजातींचे एक हजाराहून अधिक पशू पाहण्यास मिळणार असून प्रदर्शनाच्या तयारीला सध्या वेग आला आहे.

कांदळवन बफर झोनमधील भराव प्रकरणी सरकारी अभियोक्त्यांच्या सूचनांनुसार कारवाई

 कांदळवन बफर झोनमधील भराव प्रकरणी सरकारी अभियोक्त्यांच्या

सूचनांनुसार कारवाई

— पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे

मुंबईदि. ११ : क्षेत्र विकासाच्या कामांदरम्यान काही खाजगी विकासकांनी कांदळवनापासून ५० मीटर अंतराच्या बफर झोनमध्ये अनधिकृत भराव टाकून कांदळवन वृक्षांचे नुकसान केल्याचे निष्पन्न झाल्या. प्रकरणी सरकारी अभियोक्त्यांच्या सूचनांनुसार अपील सुनावणी घेऊन उच्च न्यायालयातील स्थगिती आदेशाबाबत आवश्यक कार्यवाही करावीअसे निर्देश पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले.


अंधेरी पश्चिम येथील गिल्बर्ट हिल परिसरात अनधिकृत बांधकाम झाल्याच्या

 पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या कीअंधेरी पश्चिम येथील गिल्बर्ट हिल परिसरात अनधिकृत बांधकाम झाल्याच्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर हा भाग हरित क्षेत्रात मोडत असून आवश्यक परवानग्या व नियमांची पूर्तता अनिवार्य आहे. या दृष्टीने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळबृहन्मुंबई महानगरपालिका झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण आणि संबंधित विभागांनी एकत्रित पाहणी करुन कार्यवाही करण्याची आवश्यकता आहे, असे निर्देश त्यांनी दिले.


अंधेरी पश्चिम येथील गिल्बर्ट हिल येथे नियम उल्लंघन प्रकरणी अहवाल सादर करावा

 अंधेरी पश्चिम येथील गिल्बर्ट हिल येथे नियम उल्लंघन प्रकरणी

अहवाल सादर करावा

- पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे

 

मुंबईदि. ११ : गिल्बर्ट हिल हा परिसर पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील व महत्त्वपूर्ण आहे. हा भाग हरित क्षेत्रात मोडत असूनयेथे प्रकल्प विकसित करताना नियमांचे उल्लंघन झाल्याच्या अनुषंगाने संबंधित सर्व विभागांनी समन्वय साधून वस्तुस्थितीची माहिती घेऊन कार्यवाही करावीअहवाल सादर करावा, असे निर्देश पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले.

 

मंत्रालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली यासंदर्भात आढावा बैठक झाली. बैठकीस पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या सचिव जयश्री भोज तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकामहसूल विभागझोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


महासंचालक प्रवीण रंजन म्हणाले, प्रत्येक व्यक्तीच्या मनात राष्ट्र भावना जागृत करणे हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा संकल्प आहे. या संकल्पपूर्तीसाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल देशाच्या एकात्मकतेसाठी सागरी किनारी भागात हा उपक्रम राबवित आहे. सीआयएसएफची ४७ युनिट सागरी किनारी भागात आहे. किनारी गावांमध्ये सागरी सुरक्षेविषयी जागरूकता निर्माण करण्यात येत आहे. ग्रामस्थांशी संवाद करून त्यांच्या अडचणी जाणून घेत त्यांना सागरी सुरक्षेविषयी जागरूक करण्यात येत आहे. गुजरातमधील लखपतपासून सुरू झालेला सायकलपटूंचा २ हजार ३५ किलोमीटरचा प्रवास पूर्ण झाला असून अजून १३०० किलोमीटर प्रवास पूर्ण व्हायचा आहे. तसेच पूर्व भागात सायकलपटूंचे पथक चेन्नई येथे पोहचणार असल्याचेही त्यांनी सांगितले

 महासंचालक प्रवीण रंजन म्हणालेप्रत्येक व्यक्तीच्या मनात राष्ट्र भावना जागृत करणे हा  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा संकल्प आहे. या संकल्पपूर्तीसाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल देशाच्या एकात्मकतेसाठी सागरी किनारी भागात हा उपक्रम राबवित आहे. सीआयएसएफची ४७ युनिट सागरी किनारी भागात आहे. किनारी गावांमध्ये सागरी सुरक्षेविषयी जागरूकता निर्माण करण्यात येत आहे. ग्रामस्थांशी संवाद करून त्यांच्या अडचणी जाणून घेत त्यांना सागरी सुरक्षेविषयी जागरूक करण्यात येत आहे.

 गुजरातमधील लखपतपासून सुरू झालेला सायकलपटूंचा  २ हजार ३५ किलोमीटरचा प्रवास पूर्ण झाला असून अजून १३०० किलोमीटर प्रवास पूर्ण व्हायचा आहे. तसेच  पूर्व भागात सायकलपटूंचे पथक चेन्नई येथे  पोहचणार असल्याचेही त्यांनी सांगितले

भारताने जगाला अनेक तत्वे दिली आहेत. त्यापैकी जग हे एक कुटुंब असल्याचे ' वसुधैव कुटुंबकम तत्व

  विधानसभा अध्यक्ष ॲड नार्वेकर म्हणालेभारताने जगाला अनेक तत्वे दिली आहेत. त्यापैकी जग हे एक  कुटुंब असल्याचे  वसुधैव कुटुंबकम तत्व आहे. विकसित भारतासाठी सुरक्षा दलांचे मोठे सहकार्य राहणार आहे. भारत हा जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. लवकरच आपण तिसऱ्या स्थानावर झेप घेणार आहोत. आज आपण या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झालो आहोत. सीआयएसएफ ने देशाच्या प्रगतीत मोठे योगदान दिले आहे. देशाच्या अंतर्गत सुरक्षेत सीआयएसएफचे कार्य उल्लेखनीय आहे. सायक्लोथॉन हा उपक्रम लोकपयोगी आहे.

सायक्लोथॉन उपक्रमातून देशाची एकात्मता आणि अखंडत्वाचे दर्शन -

 सायक्लोथॉन उपक्रमातून देशाची एकात्मता आणि अखंडत्वाचे दर्शन

-  विधानसभा अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर

·       वंदे मातरम् सुरक्षित तटम समृद्ध भारतम्सायक्लोथॉन उपक्रम

 

मुंबई दि. ११: विविध सुरक्षा दलांमुळे  देशात विविध भाषासंस्कृती असतानाही राष्ट्रीय एकात्मता आणि अखंडत्व कायम आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या वंदे मातरम् सुरक्षित तटम समृद्ध भारतम्'  सायक्लोथॉन उपक्रमातून देशाच्या एकात्मता आणि अखंडत्वाचे दर्शन घडत आहेअसे प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर यांनी केले.

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ)  वतीने गेट वे ऑफ इंडिया परिसरात आयोजित सायक्लोथॉन उपक्रमातील सायकलपटूंच्या स्वागत कार्यक्रमात विधानसभा अध्यक्ष ॲड.नार्वेकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे महासंचालक प्रवीण रंजनअतिरिक्त महासंचालक पद्माकर रणपिसेविजय कुमारक्रिकेटपटू दिलीप वेंगसरकरदिग्दर्शक बोनी कपूरअभिनेता अहान शेट्टीविश्वचषक विजेत्या १९ वर्षाखालील क्रिकेट संघाचा कर्णधार आयुष म्हात्रे उपस्थित होते.

Featured post

Lakshvedhi