परळीतील महापशूधन एक्स्पोचे शुक्रवारी पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची १४ फेब्रुवारी रोजी उपस्थिती
· पशू प्रदर्शनाची तयारी अंतिम टप्प्यात; एक हजाराहून अधिक विविध पशू
· बीडसह राज्यातील पशू पालकांनी प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन
मुंबई, दि. ११ : परळी येथे पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पुढाकाराने राष्ट्रीय स्तरावरील महापशुधन एक्स्पो पहिल्यांदाच आयोजित करण्यात आले आहे. या पशू प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी १३ फेब्रुवारी रोजी पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते होणार आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शनिवार, १४ फेब्रुवारी रोजी पशुधन एक्स्पोला भेट देणार आहेत.
शहरातील वैद्यनाथ महाविद्यालयाच्या समोरील ओपळे मैदानात पशुसंवर्धन विभागाच्या वतीने १३ ते १५ फेब्रुवारी दरम्यान 'अखिल भारतीय पशुपक्षी महा पशुधन एक्स्पो प्रदर्शनाचे' भव्य आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनामध्ये देशभरातील विविध प्रजातींचे एक हजाराहून अधिक पशू पाहण्यास मिळणार असून प्रदर्शनाच्या तयारीला सध्या वेग आला आहे.
No comments:
Post a Comment