महासंचालक प्रवीण रंजन म्हणाले, प्रत्येक व्यक्तीच्या मनात राष्ट्र भावना जागृत करणे हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा संकल्प आहे. या संकल्पपूर्तीसाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल देशाच्या एकात्मकतेसाठी सागरी किनारी भागात हा उपक्रम राबवित आहे. सीआयएसएफची ४७ युनिट सागरी किनारी भागात आहे. किनारी गावांमध्ये सागरी सुरक्षेविषयी जागरूकता निर्माण करण्यात येत आहे. ग्रामस्थांशी संवाद करून त्यांच्या अडचणी जाणून घेत त्यांना सागरी सुरक्षेविषयी जागरूक करण्यात येत आहे.
गुजरातमधील लखपतपासून सुरू झालेला सायकलपटूंचा २ हजार ३५ किलोमीटरचा प्रवास पूर्ण झाला असून अजून १३०० किलोमीटर प्रवास पूर्ण व्हायचा आहे. तसेच पूर्व भागात सायकलपटूंचे पथक चेन्नई येथे पोहचणार असल्याचेही त्यांनी सांगितले
No comments:
Post a Comment