Wednesday, 11 February 2026

वाहतूक, पार्किंग व रेल्वे व्यवस्थेचे सूक्ष्म नियोजन

 हिंद दी चादर’ शहीदी समागमासाठी प्रशासन सज्ज

वाहतूकपार्किंग व रेल्वे व्यवस्थेचे सूक्ष्म नियोजन

 

नवी मुंबईदि. 10 (विमाका) : हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर’ यांच्या 350 व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त 28 फेब्रुवारी व 1 मार्च 2026 रोजी खारघरसेक्टर 29 येथील ओवे मैदानावर आयोजित भव्य कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर वाहतूकपार्किंग आणि नागरिकांच्या सोयीसुविधांचे सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना विभागीय महसूल आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिल्या. कार्यक्रमस्थळी येणाऱ्या अतिमहत्त्वाच्या व्यक्ती तसेच सामान्य नागरिकांची गैरसोय होऊ नयेयासाठी कोकण विभागीय आयुक्त कार्यालयात आज आढावा बैठक घेण्यात आली.

             या बैठकीस पोलीस उपायुक्त तिरुपती काकडेअपर आयुक्त (सामान्य प्रशासन) फरोग मुकादमसह आयुक्त (करमणूक) रवींद्र पवारउपजिल्हाधिकारी रोहयो तथा नवी मुंबई समागम समन्वयक रवींद्र राठोडभारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे अंशुमन श्रीवास्तव व रवींद्र इंगोलेप्र. माहिती उपसंचालक मनोज सानपजेएनपीएचे वाहतूक अधिकारी यशवंत पाटील व नागेश आकोडेतसेच तहसिलदार (सामान्य प्रशासन) गजानन धुमाळ आदी उपस्थित होते.

मुंबई उपनगरातील प्रत्यक्ष क्षेत्रभेटी देऊन 263 पाड्यांचे सर्वेक्षण पूर्ण

 मुंबई उपनगरातील प्रत्यक्ष क्षेत्रभेटी देऊन 263 पाड्यांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. सुमारे 8,338 कुटुंबांची माहिती संकलित करण्यात आली आहे. राणी दुर्गावती आदिवासी महिला सक्षमीकरण योजनेचा लाभ जास्तीत जास्त आदिवासी महिलांना लाभ मिळण्यासाठी प्रयत्न करावेत.

            आदिवासी समाजाच्या सामाजिक-सांस्कृतिक वैशिष्ट्यांचे दस्तऐवजीकरण टीआरटीआयच्या माध्यमातून करण्यात येत आहे. स्थानिक बोलीभाषापारंपरिक जीवनपद्धतीनैसर्गिक साधनसंपत्तीवरील अवलंबित्व आणि बदलत्या आर्थिक परिस्थितीचा अभ्यास करून योजना तयार कराव्यात. आदिवासी समाजातील महापुरुषक्रांतिकारक यांचा इतिहास विद्यार्थ्यापर्यंत पोहोचावा यासाठी त्यांच्या जीवनावर आधारित पुस्तकांची निर्मिती करण्यात यावी. आदिवासी समाजासाठी कार्य केलेल्या सर्व महान व्यक्तींच्या जयंती व शहीद दिनांची माहिती संकलित करून त्या आदिवासी विकास विभागामार्फत साजऱ्या करण्यात याव्यात. स्पर्धा परीक्षेत यशस्वी होऊन सेवेत रुजू झालेल्या आदिवासी अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात यावा. तसेच आदिवासी बहुल जिल्ह्यात आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करावे अशा सूचना मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी यावेळी दिल्या.

पेसा कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबविणार

 पेसा कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबविणार

-         आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके

 

             मुंबईदि. १० : अनुसूचित क्षेत्रांमध्ये पेसा कायद्याची प्रभावी आणि काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी पेसा क्षेत्रातील सर्व संबंधित अधिकाऱ्यांसाठी व्यापक प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी सांगितले.

 

    मंत्री डॉ.अशोक वुईके यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेबाबत आढावा बैठक झाली. या बैठकीस विभागाचे सचिव विजय वाघमारेसहसचिव मच्छिंद्र शेळकेटीआरटीआयच्या सहसंचालक चंचल पाटीलतसेच विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

मंत्री डॉ. अशोक वुईके म्हणालेवनहक्क कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे राज्यात वैयक्तिक तसेच सामूहिक दाव्यांमध्ये उल्लेखनीय प्रगती झाली असून पात्र लाभार्थ्यांना वनहक्क प्रमाणपत्रांचे वितरण पूर्ण करण्यात आले आहे. राज्यात आदिवनमित्र’ ही डिजिटल प्रणाली विकसित करून सर्व वनहक्क दाव्यांचे डिजिटायझेशन करण्यात येत आहे.

जिल्ह्यातील नागरी दलितेतर वस्त्यामध्ये सुधारणा

 जिल्ह्यातील नागरी दलितेतर वस्त्यामध्ये सुधारणा या योजने अंतर्गत 421.88 कोटीसंभाव्य दरड कोसळण्याच्या ठिकाणी झोपडपट्टीवासियांचे स्थलांतर व पुनर्वसन या योजनेंतर्गत 71.34 कोटी,  भांडुप येथे पक्षी उद्यान तसेच इको टुरिजम तथा वन पर्यटन विकास या योजनेंतर्गत 39.50 कोटीगृह विभागाच्या विविक्षित प्रयोजनासाठी योजना या अंतर्गत 26.96 कोटीलहान मासेमारी बंदरे या योजनेंतर्गत 12.50 कोटी तसेच जिल्ह्यातील 28 पर्यटन स्थळंच्या विकासासाठी पर्यटन विकास या योजनेंतर्गत 12.23 कोटी रुपयांची वाढीव मागणी या बैठकीत प्रस्तावीत करण्यात आली.

मुंबई उपनगरात राबविण्यात येणारे विविध नावीन्यपूर्ण उपक्रम

 मुंबई उपनगरात राबविण्यात येणारे विविध नावीन्यपूर्ण उपक्रम

बोरीवलीअंधेरी व कुर्ला येथे राज्यातील पहिले अत्याधुनिक सेवा सुविधा केंद्र सुरू करण्यात आले आहे. युवक व महिलांसाठी रोजगार संधी निर्माण करणारा वॉर्ड स्तरीय कौशल्य सर्वेक्षण हा देशातील पहिला पथदर्शी उपक्रम ठरणार आहे. तसेचकेंद्रीय मत्स्य प्रशिक्षण संस्था (सीआयएफई), वर्सोवा येथे महाराष्ट्रातील पहिले मत्स्य आरोग्य क्लीनिक स्थापन करण्यात येत असूनयामुळे मत्स्य व्यवसायाला चालना मिळणार आहे. विद्यार्थ्यांसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित डिजिटल ज्ञान केंद्र उपनगरात उभारण्यात येणार आहे. गोराई येथे मल्टीस्पेशालिटी पशुवैद्यकीय रुग्णालय उभारण्यासाठी रु. 58.22 कोटींच्या खर्चाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून प्राण्यांसाठी जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध होणार आहेत. प्रशासकीय बळकटीकरणासाठी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात रु.7.41 कोटींच्या निधीतून नियोजन भवन इमारत बांधण्यात येणार आहे. पर्यटन व पर्यावरणपूरक विकासासाठी गोराई येथे कांदळवन उद्यान विकासबांदा येथे एक्सपेरियन्स सेंटर आणि वर्सोवा येथे बीच प्रोजेक्शन मॅपिंग शो यांसारखे वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्प राबविण्यात येत आहेत.

मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी २०२६-२७ या वर्षासाठी १४९७ कोटी रुपये प्रस्तावित

 मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी २०२६-२७  या वर्षासाठी १४९७ कोटी रुपये प्रस्तावित

 

मुंबईदि.१०: मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी २०२६-२७  या वर्षासाठी ७१० कोटी रुपयांच्या प्रारूप आराखड्यास मंजुरी  देण्यात आली आणि ७८७ कोटी रुपयांची वाढीव मागणी करण्यात आली असे १४९७ कोटी रुपये २०२६-२७  साठी प्रस्तावित करण्यात आले आहेत. जिल्हा वार्षिक योजना २०२५-२६ अंतर्गत ११०२.७४ कोटी रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली असूनशंभर टक्के निधी खर्च होण्याच्या दृष्टीने सर्व विभागानी काटेकोर नियोजन करण्याच्या सूचना मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री अॅड. आशिष शेलार यांनी दिल्या.

मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हा नियोजन समितीची बैठक आज वांद्रे येथील चेतना महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री अॅड. आशिष शेलारसह पालकमंत्री मंगलप्रभात लोढा हे होते. सभेला जिल्हाधिकारी सौरभ कटीयारजिल्हा नियोजन अधिकारी संजयकुमार शिंदे यांच्यासह नियोजन समितीचे सदस्यखासदारआमदार तथा विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

मुंबई उपनगरामध्ये वाहतूक कोंडीच्या समस्या तातडीने उपाययोजना करणेकांदळवन संवर्धन करणेडीपी रस्त्यांचे काम प्राधान्याने करणेतसेच ड्रग माफियांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे निर्देश पालकमंत्री अॅड. शेलार यांनी या बैठकीत दिले.

महामंडळाच्या टिळकनगर मळ्यावरील मौजे कान्हेगांव ता. श्रीरामपूर येथील सौर कृषी वाहिनी योजनेसाठी

 महामंडळाच्या टिळकनगर मळ्यावरील मौजे कान्हेगांव ता. श्रीरामपूर येथील सौर कृषी वाहिनी योजनेसाठी महावितरणला 17 हे. 8 आर जागा देण्यास मंजुरी देण्यात आली. त्याचप्रमाणे महामंडळाच्या श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव मळ्यावरील 1500 एकर जमीन संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) यांना देणेबाबत मंत्रिमंडळ उपसमितीसमोर प्रस्ताव ठेवण्याचे निर्देश मंत्री बावनकुळे यांनी दिले. महामंडळाच्या पुणे येथील कार्यालयाच्या निवासी परिसरात मोडकळीस आलेली इमारत पाडण्यात येऊन या जागेचे व्यावसायिक वापरासाठी नियोजन करण्याची सूचना त्यांनी केली. त्याचप्रमाणे महामंडळाच्या मुख्यालयाच्या परिसरातील रहिवासी इमारतीलगतची रिक्त जागा क्रीडा सुविधांसाठी तात्पुरत्या स्वरूपात भाडेतत्वावर देण्याबाबत त्याचप्रमाणे शेती महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या वापरासाठी वाहने खरेदी करण्यासही बैठकीत मान्यता देण्यात आली.

Featured post

Lakshvedhi