Wednesday, 11 February 2026

पेसा कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबविणार

 पेसा कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबविणार

-         आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके

 

             मुंबईदि. १० : अनुसूचित क्षेत्रांमध्ये पेसा कायद्याची प्रभावी आणि काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी पेसा क्षेत्रातील सर्व संबंधित अधिकाऱ्यांसाठी व्यापक प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी सांगितले.

 

    मंत्री डॉ.अशोक वुईके यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेबाबत आढावा बैठक झाली. या बैठकीस विभागाचे सचिव विजय वाघमारेसहसचिव मच्छिंद्र शेळकेटीआरटीआयच्या सहसंचालक चंचल पाटीलतसेच विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

मंत्री डॉ. अशोक वुईके म्हणालेवनहक्क कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे राज्यात वैयक्तिक तसेच सामूहिक दाव्यांमध्ये उल्लेखनीय प्रगती झाली असून पात्र लाभार्थ्यांना वनहक्क प्रमाणपत्रांचे वितरण पूर्ण करण्यात आले आहे. राज्यात आदिवनमित्र’ ही डिजिटल प्रणाली विकसित करून सर्व वनहक्क दाव्यांचे डिजिटायझेशन करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi