Wednesday, 11 February 2026

मुंबई उपनगरात राबविण्यात येणारे विविध नावीन्यपूर्ण उपक्रम

 मुंबई उपनगरात राबविण्यात येणारे विविध नावीन्यपूर्ण उपक्रम

बोरीवलीअंधेरी व कुर्ला येथे राज्यातील पहिले अत्याधुनिक सेवा सुविधा केंद्र सुरू करण्यात आले आहे. युवक व महिलांसाठी रोजगार संधी निर्माण करणारा वॉर्ड स्तरीय कौशल्य सर्वेक्षण हा देशातील पहिला पथदर्शी उपक्रम ठरणार आहे. तसेचकेंद्रीय मत्स्य प्रशिक्षण संस्था (सीआयएफई), वर्सोवा येथे महाराष्ट्रातील पहिले मत्स्य आरोग्य क्लीनिक स्थापन करण्यात येत असूनयामुळे मत्स्य व्यवसायाला चालना मिळणार आहे. विद्यार्थ्यांसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित डिजिटल ज्ञान केंद्र उपनगरात उभारण्यात येणार आहे. गोराई येथे मल्टीस्पेशालिटी पशुवैद्यकीय रुग्णालय उभारण्यासाठी रु. 58.22 कोटींच्या खर्चाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून प्राण्यांसाठी जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध होणार आहेत. प्रशासकीय बळकटीकरणासाठी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात रु.7.41 कोटींच्या निधीतून नियोजन भवन इमारत बांधण्यात येणार आहे. पर्यटन व पर्यावरणपूरक विकासासाठी गोराई येथे कांदळवन उद्यान विकासबांदा येथे एक्सपेरियन्स सेंटर आणि वर्सोवा येथे बीच प्रोजेक्शन मॅपिंग शो यांसारखे वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्प राबविण्यात येत आहेत.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi