Sunday, 8 February 2026

महाराष्ट्रात सामंजस्य करार केवळ कागदावर होत नसून ते प्रत्यक्षात साकारले जात

 मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेमहाराष्ट्र हे सध्या वेगाने विकसित होणारे राज्य आहे. त्यातल्या त्यात विदर्भाचा प्रदेश झपाट्याने विकसित होत आहे. महाराष्ट्रात सामंजस्य करार केवळ कागदावर होत नसून ते प्रत्यक्षात साकारले जात आहेत. लॉजिस्टिक्सएआयसोलर क्षेत्रामध्ये महाराष्ट्र देशात अग्रेसर आहे. सर्वाधिक विदेशी गुंतवणूक महाराष्ट्रात येत आहे. राज्य सरकारने गेल्या काही महिन्यांमध्ये जीसीसी पॉलिसीजेम्स अँड ज्वेलरी पॉलिसीबांबू पॉलिसी जाहीर केली आहे. नवे औद्योगिक धोरण आले आहे.

यात भर घालून सात नवीन धोरणांची घोषणा येत्या दोन-तीन महिन्यांत होणार आहे. यामध्ये टेक्सटाइल्स अँड अॅपरललेदर अँड फूटवेअरइलेक्ट्रॉनिक्स अँड फॅबएरोस्पेस अँड डीफेन्सएमएसएमईफार्मास्युटिकल बायोटेक अँड मेडिकल डीव्हायसेससर्क्युलर इकॉनॉमीबायो प्लास्टिक या क्षेत्रांतील धोरणांचा समावेश असेल. या सातही धोरणांच्या निर्मितीचे काम सुरू असून येत्या तीन महिन्यांत ते जाहीर करण्यात येतील. यामुळे धोरणप्रेरित गुंतवणूकउद्योगवाढ आणि आर्थिक विकास हेच महाराष्ट्राचं प्रमुख सूत्र ठरेलअसे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.


सोलर मॉड्यूलच्या क्षेत्रात नागपूर क्षेत्रात येणारी गुंतवणूक

 सोलर मॉड्यूलच्या क्षेत्रात नागपूर क्षेत्रात येणारी गुंतवणूक ही देशातील सर्वात मोठी सोलर मॉड्यूल प्रोड्यूसिंग इकोसिस्टीम असून अद्यापही गुंतवणुकीचा ओघ मोठ्या प्रमाणात सुरुच आहे. कृषी प्रक्रियेसह अनेक निर्मितीक्षम क्षेत्रात नागपूर आणि विदर्भाची मोठ्या प्रमाणात आगेकूच सुरु आहे, अनेक क्षेत्रात गुंतवणुकीच्या नव्या संधी येत आहेत. अगदी गडचिरोलीसारख्या क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आकर्षित होत असून भारताचे स्टील हब म्हणून ते पुढे येत आहे. पुढील दहा वर्षांत गडचिरोलीत पोलादनिर्मितीची सर्वाधिक मोठी क्षमता उभी राहणार आहे. एवढेच नाही, तर गडचिरोलीला पर्यावरणपूरक ‘ग्रीन स्टील’ हब म्हणून विकसित करण्याच्या दिशेनेही आम्ही ठोस पावले उचलत असल्याचे त्यांनी सांगितले.

टेक्सटाइल अँड अॅपरल, लेदर अँड फूटवेअर, इलेक्ट्रॉनिक्स अँड फॅब, एरोस्पेस अँड डीफेन्स, एमएसएमई, फार्मास्युटिकल बायोटेक अँड मेडिकल

 . टेक्सटाइल अँड अॅपरललेदर अँड फूटवेअरइलेक्ट्रॉनिक्स अँड फॅबएरोस्पेस अँड डीफेन्सएमएसएमईफार्मास्युटिकल बायोटेक अँड मेडिकल डीव्हायसेससर्क्युलर इकॉनॉमीबायो प्लास्टिक या क्षेत्रांतील धोरणांचा समावेश असेल. या सातही धोरणांच्या निर्मितीचे काम सुरू असून येत्या तीन महिन्यांत ते जाहीर करण्यात येतील. यामुळे धोरणप्रेरित गुंतवणूकउद्योगवाढ आणि आर्थिक विकास हेच महाराष्ट्राचं प्रमुख सूत्र ठरेलअसे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

महाराष्ट्र हे सध्या वेगाने विकसित होणारे राज्य आहे. त्यातल्या त्यात विदर्भाचा प्रदेश

 मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेमहाराष्ट्र हे सध्या वेगाने विकसित होणारे राज्य आहे. त्यातल्या त्यात विदर्भाचा प्रदेश झपाट्याने विकसित होत आहे. महाराष्ट्रात सामंजस्य करार केवळ कागदावर होत नसून ते प्रत्यक्षात साकारले जात आहेत. लॉजिस्टिक्सएआयसोलर क्षेत्रामध्ये महाराष्ट्र देशात अग्रेसर आहे. सर्वाधिक विदेशी गुंतवणूक महाराष्ट्रात येत आहे. राज्य सरकारने गेल्या काही महिन्यांमध्ये जीसीसी पॉलिसीजेम्स अँड ज्वेलरी पॉलिसीबांबू पॉलिसी जाहीर केली आहे. नवे औद्योगिक धोरण आले आहे.

.

आगामी काळात महाराष्ट्राचा भर धोरण आधारित विकासावर

 आगामी काळात महाराष्ट्राचा भर धोरण आधारित विकासावर

-  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

येत्या २-३ महिन्यांत भविष्योन्मुख धोरणे आणणारअॅडव्हांटेज विदर्भ परिषद-२०२६

नागपूरदि. ७- येत्या काळात महाराष्ट्राचा भर धोरण आधारित विकासावर राहणार आहे. यासाठी आम्ही अनेक धोरणे आखली असलीतरी काही धोरणे जुनी झाली असल्याने भविष्यातील गरजाबदल आणि आव्हाने लक्षात घेऊन येत्या दोन-तीन महिन्यात विविध क्षेत्रांतील भविष्योन्मुख (फ्युचर रेडी पॉलिसी) धोरणे आणली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली.

असोसिएशन फॉर इंडस्ट्रिअल डेव्हलपमेंटद्वारे आयोजित अॅडव्हांटेज विदर्भ-खासदार औद्योगिक महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी इंटरनॅशनल बिझनेस कॉनक्लेव्हचे उद्घाटन झाले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.

व्यासपीठावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरीग्लोबल इंडिया बिझनेस फोरमचे जागतिक अध्यक्ष जितेंद्र जोशीअसोसिएशन फॉर इंडस्ट्रिअल डेव्हलपमेंटचे अध्यक्ष आशिष काळे यांच्यासह तब्बल २२ देशांचे राजदूतउच्चायुक्त व बिझनेस प्रतिनिधींची प्रमुख उपस्थिती होती. विशेष म्हणजे याच परिषदेत गुंतवणुकीचे तीन सामंजस्य करारही पार पाडण्यात आले.

Saturday, 7 February 2026

‘हिंद-दी-चादर’ कार्यक्रमासाठी सुरक्षा व सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात

 हिंद-दी-चादर’ कार्यक्रमासाठी सुरक्षा व सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात

मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी

 

·        प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांची विशेष उपस्थितीनवी मुंबईत भव्य कार्यक्रम

 

मुंबई दि. ६ : हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागमाचा भव्य कार्यक्रम 28 फेब्रुवारी व 1 मार्च 2026 रोजी नवी मुंबईतील खारघर येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. देशभरातून लाखो भाविक या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या पार्श्वभूमीवर कार्यक्रमाच्या तयारीस गती देत सुरक्षापाणीपुरवठाभोजननिवासवाहतूकस्वच्छता आदी बाबींची चोख व्यवस्था करण्याचे निर्देश मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव डॉ.श्रीकर परदेशी यांनी दिले.

हिंद-दी-चादर’ श्री गुरू तेग बहादुर यांच्या ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस यांच्यासह गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतमध्यप्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादवगुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेलराजस्थानचे मुख्यमंत्री भजन लाल शर्माआसामचे मुख्यमंत्री डॉ. हिमांता बिस्वा सरमा उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी मंत्रालयात बैठक झाली.

यावेळी राज्य समन्वय समितीचे समन्वयक रामेश्वर नाईकनवी मुंबईचे उपजिल्हाधिकारी तथा कार्यक्रमाचे समन्वयक रविंद्र राठोडसमितीचे शासकीय समन्वयक डॉ.  जगदीश सकवानमुख्यमंत्री कार्यालयाचे अवर सचिव तुषार राठोड यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

तरदूरदृश्य प्रणालीद्वारे कोकणपुणेनाशिक विभागाचे आयुक्तमुंबई शहरउपनगरठाणेरायगडपालघरसिंधुदूर्गरत्नागिरीपुणेसातारासांगलीसोलापूरकोल्हापूरअहिल्यानगरनाशिकजळगावधुळेनंदूरबारचेजिल्हाधिकारीमुख्य कार्यकारी अधिकारीपोलीस आयुक्तपोलीस अधिक्षकपरिवहन आयुक्तमहानगरपालिकेचे आयुक्त यांच्यासह संबंधीत अधिकारी उपस्थित होते.

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात डॉ. विजय कंदेवाड यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग 10 फेब्रुवारी रोजी प्रसारित होणार

 जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात डॉ. विजय कंदेवाड यांच्या मुलाखतीचा

दुसरा भाग 10 फेब्रुवारी रोजी प्रसारित होणार

 

मुंबईदि. 6: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात आरोग्य संचालक डॉ. विजय कंदेवाड यांची अरुणोदय’ सिकलसेल ॲनिमिया जनजागृती मोहिमेवर आधारित विशेष मुलाखतीचे प्रसारण करण्यात येत आहे. या मुलाखतीचा पहिला भाग नुकताच प्रसारित झाला असून दुसरा भाग मंगळवार10 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 8.00 वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रक्षेपित होणार आहे.

 

या भागामध्ये डॉ. कंदेवाड यांनी सिकलसेल ॲनिमियाचा प्रतिबंधरुग्ण व वाहकांची ओळखविवाहपूर्व आणि गर्भावस्थेतील तपासणीचे महत्त्व तसेच शासनामार्फत उपलब्ध मोफत तपासणी व उपचार सुविधा याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले आहे. सिकलसेल ॲनिमिया हा अनुवांशिक रक्तविकार असून त्याचा प्रादुर्भाव विशेषतः आदिवासी व दुर्गम भागांमध्ये अधिक प्रमाणात आढळतो. या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी अरुणोदय’ जनजागृती मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावाअसे आवाहन त्यांनी केले आहे. या मुलाखत निवेदिका उन्नती जगदाळे यांनी घेतली आहे.

 

तसेच ही मुलाखत माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत समाजमाध्यमांवरही उपलब्ध राहणार असून पुढील लिंकवर पाहता येणार आहे.

 

X (Twitter): https://twitter.com/MahaDGIPR

Facebook: https://www.facebook.com/MahaDGIPR

YouTube: https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR

००००

Featured post

Lakshvedhi