Saturday, 7 February 2026

विदर्भाच्या सर्वांगीण विकासावर भर

 विदर्भाच्या सर्वांगीण विकासावर भर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

·          नागपुरात पहिल्यांदा ऑटोमोबाईल उद्योगाची गुंतवणूक; १५ हजार कोटींचा सामंजस्य करार

·          केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते खासदार औद्योगिक महोत्सव- ॲडव्हान्टेज विदर्भचे थाटात उद्घाटन

 

नागपूर,दि. ६ : गडचिरोली येथे जगातील सर्वात मोठे ग्रीन स्टिल हबनागपुरात सोलर मॉडयुल आणि अमरावतीमध्ये आशिया खंडातील सर्वात मोठे वैमानिक प्रशिक्षण केंद्र उभारण्याच्या दिशेने महत्त्वाची पावले पडली आहेत. निर्मिती आणि सेवा क्षेत्रात विदर्भाची घोडदौड सुरु आहे. महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीसोबत झालेल्या सामंजस्य करारातून नागपूरमध्ये ऑटोमोबाईल उद्योगाचे पदार्पण झाले आहेया सर्व प्रयत्नांतून येत्या ५ वर्षांत विदर्भाचा सर्वांगीण विकास साधण्यात येईलअसे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले. त्यांच्या उपस्थितीत विदर्भासाठी विविध चार गुंतवणूक करारही करण्यात आले.

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विशेष मतदारयादी पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर

 बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर

विशेष मतदारयादी पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर

 

मुंबईदि ६ : पुणे जिल्ह्यातील २०१बारामती विधानसभा मतदारसंघातील रिक्त जागा भरण्यासाठी लवकरच विधानसभेची पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने लोकप्रतिनिधित्व अधिनियम१९५० मधील कलम २१ अन्वये २०१बारामती विधानसभा मतदारसंघासाठी विशेष संक्षिप्त मतदारयादी पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे.

 

हा कार्यक्रम १ जानेवारी २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित असेल. निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार मतदारयादी अद्ययावतअचूक आणि पारदर्शक राहावी यासाठी हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. त्यानुसार एकत्रित प्रारूप मतदारयादी सोमवार९ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानंतर ९ फेब्रुवारी ते २५ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत मतदारांकडून दावे व हरकती स्वीकारल्या जाणार आहेत.

 

प्राप्त दावे व हरकतींची छाननी करून त्या ६ मार्च २०२६ पर्यंत निकाली काढण्यात येणार असूनअंतिम मतदारयादी मंगळवार१० मार्च २०२६ रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे.

 

या प्रक्रियेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तसेच मतदान केंद्रांची यादी तयार करताना स्थानिक स्तरावर सुसूत्रता राखण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी तसेच बारामती मतदार नोंदणी अधिकारी यांच्या स्तरावर मान्यता प्राप्त राजकीय पक्षांबरोबर बैठकांचे आयोजन करण्यात येणार आहे. या बैठकीत राजकीय पक्षांना कार्यक्रमाची सविस्तर माहिती देण्यात येऊन आवश्यक सूचना व सूचना-आदानप्रदान करण्यात येणार असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.

000

भारत रंग महोत्सवात दि. ९ फेब्रुवारी रोजी सांयकाळी ६:३० वाजता रवींद्र नाट्य मंदिर येथे

 भारत रंग महोत्सवात दि. ९ फेब्रुवारी रोजी सांयकाळी ६:३० वाजता रवींद्र नाट्य मंदिर येथे तमास (राष्ट्रीय नाट्य विद्यालयनवी दिल्ली) या नाटकाचे सादरीकरण होईल. दि. १० फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६:३० वाजता रवींद्र नाट्य मंदिर येथे बाबुजी-राष्ट्रीय नाट्य विद्यालयनवी दिल्ली मार्फत हिंदी नाटकाचे सादरीकरण होईल. दि. ११ फेब्रुवारी रोजी मिनी थिएटर येथे सायंकाळी ४:३० वाजता ‘ब्रेस्ट ऑफ लक’ या कॅन्सर विषयावर जनजागृती करणाऱ्या नाटकाचे सादरीकरण करण्यात येईल. तसेच याच दिवशी रवींद्र नाट्य मंदिर येथे सायंकाळी ६:३० वाजता थिव्हज् कार्निव्हल या नाटकाचे राष्ट्रीय नाट्य विद्यालयामार्फत सादरीकरण होईल. दि. १२ फेब्रुवारी रोजी रविंद्र नाट्य मंदिर येथे लाईफ ऑफ ड्रिम या स्पॅनिश भाषेत स्पेन येथील कलाकार आपली कला सादर करणार आहेत. या महोत्सवातील शेवटचे नाटक आधे अधुरे हे नाटक दि. १३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६:३० वाजता सादर होणार आहे.रसिक प्रेक्षकांनी या नाट्यप्रयोगाचा लाभ घ्यावाअसे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्रीराम पांडे यांनी केले आहे.

भारत रंग महोत्सव २०२६’ मुंबईत ९ ते १३ फेब्रुवारी · महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षकांना देशातील व देशाबाहेरील दर्जेदार नाटकांचा अनुभव घेता येणार

 ‘भारत रंग महोत्सव २०२६’ मुंबईत ९ ते १३ फेब्रुवारी

·         महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षकांना देशातील व देशाबाहेरील दर्जेदार नाटकांचा अनुभव घेता येणार

·         सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते उद्घाटन

 

मुंबई दि. ६ : राष्ट्रीय नाट्य विद्यालयभारत सरकार आणि सांस्कृतिक कार्य विभागमहाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने भारत रंग महोत्सव २०२६ या भव्य नाट्य महोत्सवाचे आयोजन दि. ९ ते १३ फेब्रुवारी२०२६ या कालावधीत मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिरप्रभादेवी येथे करण्यात आले आहे.

           

या महोत्सवाचे उद्घाटन सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते ९ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ६:०० वाजता होणार आहे.

 

या नाट्य महोत्सवात देश-विदेशातील नामांकित नाट्यसंस्थांची पाच नाटके सादर करण्यात येणार आहेत. या सादरीकरणांद्वारे विविध भारतीय भाषांमधील नाट्य परंपरासर्जनशीलता आणि प्रयोगशीलतेचा संगम प्रेक्षकांना अनुभवता येईल.

 

या सर्व नाटकांचे प्रयोग प्रेक्षकांसाठी विनामूल्य खुले असून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य याप्रमाणे बैठक व्यवस्था करण्यात आलेली आहे. नाट्यरसिकांनी या संधीचा लाभ घ्यावाअसे आवाहन सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

विश्व की अनेक संस्कृतियां समय के साथ नष्ट हो गईं, लेकिन भारतीय सनातन

 मुख्यमंत्री फडणवीस ने आगे कहा कि विश्व की अनेक संस्कृतियां समय के साथ नष्ट हो गईंलेकिन भारतीय सनातन संस्कृति आज भी जीवंत है। सनातन विचार भारतीय संस्कृति की सबसे प्राचीन और विशिष्ट पहचान हैं। सरस्वती सभ्यता के उत्खनन से भी इन विचारों के अस्तित्व की पुष्टि हुई हैजिससे वैज्ञानिक और ऐतिहासिक दोनों दृष्टियों से भारतीय जीवन पद्धति और सनातन संस्कृति की समृद्धि सिद्ध होती है।

उन्होंने कहा कि भारतीय संस्कृति ने विविधता को आत्मसात कर अपने वैभव में निरंतर वृद्धि की है। इस सांस्कृतिक विरासत को संरक्षित रखने में स्वामी सत्यमित्रानंद गिरी जैसे संतों की भूमिका अत्यंत महत्वपूर्ण रही है। स्वामीजी ने अपने आचरण और कार्यों से इस संस्कृति का पोषण किया और इसे भावी पीढ़ियों को सौंपा।

भारतीय संस्कृति की संत परंपरा समाज को जोड़ने और एकसूत्र में बांधे रख

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा कि भारतीय संस्कृति की संत परंपरा समाज को जोड़ने और एकसूत्र में बांधे रखने का कार्य करती है। इसी परंपरा को स्वामी सत्यमित्रानंद गिरी जी ने भारत माता मंदिर की स्थापना के माध्यम से आगे बढ़ाया। इसके साथ ही उन्होंने विश्वभर में फैली सनातन संस्कृति की धाराओं को एकत्रित करने का महत्वपूर्ण कार्य किया।

उन्होंने अपना संपूर्ण जीवन मानव सेवा को समर्पित कर दिया। जहां कहीं भी आपदा या संकट आयास्वामीजी स्वयं वहां पहुंचे और सभी भेदभावों को त्यागकर सेवा कार्य किया। इसी सेवा भावना के माध्यम से उन्होंने सनातन संस्कृति की पहचान को सशक्त किया। इस यात्रा में उन्होंने कई बार उच्च पदों का त्याग किया और अपने वैश्विक सेवा कार्य को आगे बढ़ाने में ही संतोष पाया। इसी कारण उन्हें विश्वभर में एक अद्भुत व्यक्तित्व के रूप में सम्मान प्राप्त हुआमुख्यमंत्री ने कहा।

स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृति के प्रमुख वाहक समाधि मंदिर भावी पीढ़ियों के लिए प्रेरणास्थल बनेगा

 स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृति के प्रमुख वाहक

समाधि मंदिर भावी पीढ़ियों के लिए प्रेरणास्थल बनेगा

– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के नेतृत्व में सांस्कृतिक पुनर्जागरण को मिली नई गति

 

हरिद्वार, 4 फरवरी: श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी ने सनातन संस्कृति के प्रमुख वाहक के रूप में कार्य किया है और उन्हीं जैसे संतों के कारण आज नई पीढ़ी के सामने भारतीय संस्कृति की महानता जीवंत बनी हुई है। उनके समाधि मंदिर ने भावी पीढ़ियों के लिए एक प्रेरणास्थल का स्वरूप ग्रहण कर लिया हैऐसा प्रतिपादन महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने किया।

मुख्यमंत्री फडणवीस उत्तराखंड के हरिद्वार स्थित श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी महाराज के समाधि मंदिर में आयोजित श्रीविग्रह मूर्ति स्थापना समारोह में प्रमुख अतिथि के रूप में बोल रहे थे।

इस अवसर पर पूर्व राष्ट्रपति रामनाथ कोविंदपूज्य जुनापीठाधीश्वर आचार्य महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद गिरी जीराम जन्मभूमि मंदिर न्यास के स्वामी गोविंददेव गिरी जीपंजाब के राज्यपाल गुलाबचंद कटारियाउपमुख्यमंत्री राजेंद्र शुक्लस्वामी अखिलेश्वरानंद जीस्वामी हरिचेतनानंद जीस्वामी ललितानंद गिरी जीमहंत देवानंद सरस्वतीविनय रोहिलाप्रदीप बत्रा सहित अनेक गणमान्य उपस्थित थे।

Featured post

Lakshvedhi