Saturday, 7 February 2026

विदर्भाच्या सर्वांगीण विकासावर भर

 विदर्भाच्या सर्वांगीण विकासावर भर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

·          नागपुरात पहिल्यांदा ऑटोमोबाईल उद्योगाची गुंतवणूक; १५ हजार कोटींचा सामंजस्य करार

·          केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते खासदार औद्योगिक महोत्सव- ॲडव्हान्टेज विदर्भचे थाटात उद्घाटन

 

नागपूर,दि. ६ : गडचिरोली येथे जगातील सर्वात मोठे ग्रीन स्टिल हबनागपुरात सोलर मॉडयुल आणि अमरावतीमध्ये आशिया खंडातील सर्वात मोठे वैमानिक प्रशिक्षण केंद्र उभारण्याच्या दिशेने महत्त्वाची पावले पडली आहेत. निर्मिती आणि सेवा क्षेत्रात विदर्भाची घोडदौड सुरु आहे. महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीसोबत झालेल्या सामंजस्य करारातून नागपूरमध्ये ऑटोमोबाईल उद्योगाचे पदार्पण झाले आहेया सर्व प्रयत्नांतून येत्या ५ वर्षांत विदर्भाचा सर्वांगीण विकास साधण्यात येईलअसे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले. त्यांच्या उपस्थितीत विदर्भासाठी विविध चार गुंतवणूक करारही करण्यात आले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi