मंत्री लोढा म्हणाले की, राज्य तेल व समन्वय विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या संरक्षण समता महोत्सव अभियानाचा उद्देश जीवाश्म इंधनांचा अपव्यय कमी करणे, परकीय चलनावरील वाढता भार रोखणे तसेच हरितगृह वायूंमुळे होणारे पर्यावरणीय नुकसान कमी करणे हा आहे. आज जगभरात ऊर्जेला सर्वाधिक मागणी आहे. जागतिक स्तरावरील राजकारण तेलाभोवती एकवटले आहे. इंधनाची बचत करणे म्हणजे देशाच्या प्रगतीला हातभार लावणे असे आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा जास्तीत जास्त वापर करून आपण तेल बचत करू शकतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यात हरित उर्जेला प्राधान्य देण्यात येत आहे. शालेय जीवनामध्ये तेल संवर्धनाचे महत्त्व पटवून दिल्यास भविष्यात त्याचा चांगला उपयोग होऊ शकतो. प्रत्येक घटकाचा तेल बचतीमधील खारीचा वाटा हा देशाच्या प्रगतीला हातभार लागू शकतो असे मत मंत्री लोढा यांनी व्यक्त केले.
सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Wednesday, 4 February 2026
नैसर्गिक तेल व वायूची बचत ही देशसेवा
नैसर्गिक तेल व वायूची बचत ही देशसेवा
-मंत्री मंगलप्रभात लोढा
· ऊर्जा संवर्धनासाठी ‘सक्षम २०२५-२६’ अभियानाची आजपासून सुरुवात
मुंबई, दि. २ : नैसर्गिक तेल व वायूची बचत करणे ही देशाची सेवा आहे. विकसित भारत २०४७ च्या उद्दीष्टामधील प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे इंधन बचत हे ध्येय असून प्रत्येकाच्या सहभागाने देश हे ध्येय साध्य करेल. तेल व वायूचे संवर्धन करणे म्हणजे हरित ऊर्जेचा अंगीकार करणे हा आपल्या प्रत्येकाच्या सामाजिक उत्तरदायित्वाच्या या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले.
प्रभादेवी रवींद्र नाट्य मंदिर येथे केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली आणि राज्य शासनाच्या सहकार्याने तेल उद्योगातील राज्यस्तरीय समन्वयकांकडून विविध जनजागृती उपक्रम आयोजित करण्यात येत आहेत. त्याअंतर्गत 'संरक्षण क्षमता महोत्सव २०२५-२६' चा मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी 7 फेब्रुवारीस मतदान ; उद्योग, आस्थापना व
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी 7 फेब्रुवारीस मतदान ;
उद्योग, आस्थापना व कारखान्यांमधील कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्ट
मुंबई, दि. 2 : राज्यातील 12 जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत 125 पंचायत समित्यांमध्ये शनिवार दि. 7 फेब्रुवारी 2026 रोजी सार्वत्रिक निवडणूक होत आहे. या निवडणुकीमध्ये राज्यातील तसेच राज्याच्या सीमेलगतच्या सर्व मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी उद्योग, आस्थापना व कारखान्यांमधील कामगार कर्मचाऱ्यांना या दिवशी सुट्टी किंवा सवलत देणे बंधनकारक आहे, असे परिपत्रक उद्योग, उर्जा, कामगार व खनिकर्म विभागाने जारी केले आहे.
यानुसार, निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार, अधिकारी, कर्मचारी तसेच कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असलेल्या मतदारांनाही निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर, ही सुट्टी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने इत्यादींना लागू असेल. यात खासगी कंपन्या यामधील आस्थापना, सर्व दुकाने व इतर आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्य गृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किवा इतर आस्थापना तसेच माहिती तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, माल्स, रिटेलर्स आदींना हे आदेश लागू राहणार आहेत.
अपवादात्मक परिस्थितीत अनुपस्थितीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होईल अशा धोकादायक अथवा लोकोपयोगी सेवेत अथवा आस्थापनांच्या संदर्भात अधिकारी, कर्मचारी व कामगार इत्यादींना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी दोन ते तीन तासांची विशेष सवलत मिळेल, याची दक्षता संबंधित आस्थापना मालकांनी घेणे आवश्यक राहील.
सार्वजनिक सुट्टी लागू असलेल्या जिल्हा परिषदेमध्ये रायगड (पंचायत समित्या - पनवेल, कर्जत, खालापूर, सुधागड, पेण, उरण, अलिबाग, मुरुड. रोहा, तळा, माणगाव, म्हसळा, श्रीवर्धन, महाड, पोलादपूर); रत्नागिरी (मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण, गुहागर, रत्नागिरी, संगमेश्वर, लांजा, राजापूर); सिंधुदुर्ग (वैभववाडी, कणकवली, देवगड, मालवण, कुडाळ, वेंगुर्ला, सावंतवाडी दोडामार्ग); पुणे (जुन्नर, आंबेगाव, शिरुर, खेड, मावळ, मुळशी, हवेली, दौंड, पुरंदर, वेल्हे, भोर, बारामती, इंदापूर); सातारा (खंडाळा, फलटण, माण, खटाव, कोरेगाव, वाई, महाबळेश्वर, जावळी, सातारा, पाटण, कराड); सांगली (आटपाडी, जत, खानापूर (विटा), कडेगाव, तासगाव, कवठेमहांकाळ, पलूस, वाळवा-ईश्वरपूर, शिराळा, मिरज); सोलापूर (करमाळा, माढा, बार्शी, उत्तर सोलापूर, मोहोळ, पंढरपूर, माळशिरस, मंगळवेढा, सांगोला, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट); कोल्हापूर (शाहुवाडी, पन्हाळा, हातकणंगले, शिरोळ, कागल, करवीर, गगनबावडा, राधानगरी, भुदरगड, आजरा, गडहिंग्लज, चंदगड); छत्रपती संभाजीनगर (सोयगाव, सिल्लोड, कन्नड, फुलंब्री, खुलताबाद, वैजापूर, गंगापूर, छत्रपती संभाजीनगर, पैठण); परभणी (जिंतूर, परभणी, मानवत, सेलू, पाथरी, सोनपेठ, पूर्णा, पालम, गंगाखेड); धाराशीव (परांडा, भूम, वाशी, कळंब, धाराशीव, तुळजापूर, लोहारा, उमरगा) आणि लातूर (पंचायत समित्या - अहमदपूर, जळकोट, उदगीर, चाकूर, रेणापूर, लातूर, शिरूर (अनंतपाळ), देवणी, औसा, निलंगा) यांचा समावेश आहे.
परळी वैजनाथ येथे प्रदर्शनासाठी भव्य मैदान व पशुधनासाठी आवश्यक सुविधा उभारण्याचे काम वेगाने
राज्याच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने पशुसंवर्धन विभागाचे सचिव (पदुम) डॉ. रामास्वामी एन. यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रदर्शनाचे नियोजन अत्यंत प्रभावीपणे करण्यात येत आहे. परळी वैजनाथ येथे प्रदर्शनासाठी भव्य मैदान व पशुधनासाठी आवश्यक सुविधा उभारण्याचे काम वेगाने सुरू आहे. "या प्रदर्शनाच्या माध्यमातून पशुपालकांना पशुसंवर्धनाविषयीची संकीर्ण व अद्ययावत माहिती एकाच छताखाली उपलब्ध होईल. याचा मोठा फायदा पशुपालन व्यवसायाला चालना देण्यासाठी होईल," असा विश्वास पशुसंवर्धन आयुक्त डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी व्यक्त केला आहे.
नवीन तंत्रज्ञान व दर्जेदार पशुधनाची माहिती घेण्यासाठी हे प्रदर्शन एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरणार आहे. बीड जिल्ह्यासह राज्यातील जास्तीत जास्त पशुपालकांनी या तीन दिवसीय प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
परळी वैजनाथमध्ये 13 फेब्रुवारीपासून अखिल भारतीय पशुपक्षी प्रदर्शन
परळी वैजनाथमध्ये 13 फेब्रुवारीपासून अखिल भारतीय पशुपक्षी प्रदर्शन
· राज्यातील पशुपक्षी पालकांना सहभागी होण्याचे आवाहन
मुंबई, दि. 2 : बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथे 13 ते 15 फेब्रुवारी 2026 या कालावधीत 'अखिल भारतीय पशुपक्षी प्रदर्शनाचे' आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनामध्ये देशभरातील विविध प्रजातींचे एक हजाराहून अधिक पशू सहभागी होणार असून प्रदर्शनाची जय्यत तयारी सुरू आहे. या पशुपक्षी प्रदर्शनात सहभागी व्हावे, असे आवाहन पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात आले आहे.
या प्रदर्शनात पशुपालकांना गायी, म्हशी, घोडे, शेळ्या-मेंढ्या आणि विविध पक्ष्यांच्या दर्जेदार प्रजाती पाहायला मिळतील. केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर संपूर्ण देशातील प्रगतशील पशुपालक व शेतकरी या ठिकाणी हजेरी लावणार आहेत. पशुपालकांना आधुनिक पशुपालन, आहार व्यवस्थापन आणि आरोग्याविषयी सविस्तर माहिती या माध्यमातून मिळणार आहे, अशी माहिती पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.
मालमत्तेचे व्यवहार करताना तोतयांपासून सावधगिरी बाळगावी ·
मालमत्तेचे व्यवहार करताना तोतयांपासून सावधगिरी बाळगावी
· सह जिल्हा निबंधक कार्यालयाचे नागरिकांना आवाहन
मुंबई, दि. 2 : तोतया व्यक्तींना पुढे करून बनावट कागदपत्रांच्या आधारे दस्त नोंदणी करण्याचे प्रकार घडत असून, या पार्श्वभूमीवर जनसामान्यांनी मालमत्तेच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार करतांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन मुंबई उपनगर जिल्ह्याचे सह जिल्हा निबंधक यांनी केले आहे.
एका तोतया व्यक्तीने स्वतःला मूळ मालक म्हणून दर्शवत बनावट कागदपत्रांच्या आधारे दस्तनोंदणी केल्याचा गंभीर प्रकार अंधेरी येथील सह दुय्यम निबंधक यांच्या कार्यालयात 29 जानेवारी रोजी उघडकीस आला आहे. या प्रकरणी स्वतःला सलाउद्दीन आदम नाईक या मूळ मालकाच्या जागेवर भासवणारे मोहम्मद रफीक मोहम्मद इलियास यांच्याविरुद्ध जूहू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सह जिल्हा निबंधक कार्यालयात मोठ्या प्रमाणावर खरेदी-विक्री, गहाणखत, बक्षी
डिजिटल युगात मुलांच्या सर्वांगीण कल्याणासाठी
डिजिटल युगात मुलांच्या सर्वांगीण कल्याणासाठी शासनाने पुढाकार घेऊन योग्य व परिणामकारक उपाययोजना करणे आवश्यक असून, या आव्हानाला सामोरे जाताना माहितीपूर्ण आणि संतुलित दृष्टिकोन स्वीकारण्याची हीच योग्य वेळ असल्याचे मत माहिती तंत्रज्ञान मंत्री अॅड.आशिष शेलार यांनी व्यक्त केले आहे.
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...