Friday, 30 January 2026

महाराष्ट्रातील आयटीआय होणार सर्वोत्तम 'स्किल डेव्हलमपेंट हब'

 महाराष्ट्रातील आयटीआय होणार सर्वोत्तम 'स्किल डेव्हलमपेंट हब'

-मंत्री मंगल प्रभात लोढा

 

·         राज्यातील आयटीआयचे आधुनिकीकरणपीएम – सेतू योजना राबविणार

·         पहिल्या टप्प्यात नागपूरछत्रपती संभाजीनगरपुणे यांचा समावेश

·         केंद्र आणि राज्य सरकार मिळून २४२ कोटी खर्च करणार

 

मुंबईदि. 30 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या शाश्वत विकासाच्या दूरदृष्टीच्या संकल्पनेतून आकाराला आलेल्या ' पीएम सेतू या योजनेमुळे महाराष्ट्रातील आयटीआय सर्वोत्तम 'स्किल डेव्हलमपेंट हबहोणार असल्याचेराज्याचे कौशल्यरोजगार,  उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील चार जिल्ह्यात ही योजना सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे (आयटीआय) पीएम सेतू योजनेंतर्गत आधुनिकीकरण होणार असून पुढच्या टप्प्यात उर्वरित जिल्ह्यांचा समावेश करण्यात येणार आहे.

 

कुशल मनुष्य़बळाची मागणी आणि पुरवठा यांच्यातील तफावत भरून काढण्यासाठी पीएम सेतू योजनेतून आयटीआयचे आधुनिकीकरण करण्याची योजना आहे. या योजनेच्या पहिल्या टप्पात नागपूरछत्रपती संभाजी नगर आणि पुणे येथील आयटीआयचे आधुनिकीकरण केले जाणार आहे.

महा निर्यात इग्नाईट कन्व्हेंशन–2026’चे मुंबईत आयोजन

 महा निर्यात इग्नाईट कन्व्हेंशन–2026’चे मुंबईत आयोजन


मुंबई, दि. 30 : राज्यातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एम,एस,एम,ई,) क्षेत्राच्या कार्यक्षमता व उत्पादकतेत वाढ करून उद्योजकीय वातावरण अधिक व्यापक करण्याच्या उद्देशाने ‘महा निर्यात इग्नाईट कन्व्हेंशन–2026’ या जिल्हास्तरीय कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळांच्या माध्यमातून एक जिल्हा एक उत्पादन (ओडीओपी) व निर्यात प्रचालन उपक्रमांद्वारे निर्यातवृद्धीस चालना देण्यावर भर देण्यात येणार आहे.


मुंबई उपनगरासाठी 2 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत एम,एस,एम,ई, विकास व सुविधा कार्यालय, साकीनाका, मुंबई येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून, ती जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा निर्यात प्रचालन समिती, मुंबई उपनगर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे

कर्तव्यपथावर महाराष्ट्राचा गौरवपूर्ण यशाने महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख अधिक उंचावली

 कर्तव्यपथावर महाराष्ट्राचा गौरवपूर्ण यशाने महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख अधिक उंचावली आहे. या चित्ररथाचे गीतलेखन बिभिषण चवरे यांचे असून गाण्याचे गीतकार मयुरेश सुकाळे व सिद्धेश जाधव आहे. संगीत संयोजन मनोहर गोलांबरे यांनी केले आहे.

कोल्हापूरसातारासांगली ग्रामीण भागातून आलेल्या विविध कलाकारांनी तसेच चंद्रकांत पाटील व राजेंद्र संकपाळ यांच्या पथकाने सांघिक भावनेने ऐकतेचे प्रदर्शन करून उत्तमरित्या लेझीम नृत्याचे सादरीकरण केले. या चित्ररथाचे कलादिग्दर्शन व बांधणी नागपूर येथील तुषार प्रधानरोशन इंगोलेकृष्णा सालटकर व श्रीपाद धोंगडे यांनी केले आहे.

००००

"महाराष्ट्राच्या मातीतील कलेचा आणि कारागिरांच्या कष्टाचा हा सन्मान आहे. गणेशोत्सव हा केवळ उत्सव नसून तो अनेकांच्या

 "महाराष्ट्राच्या मातीतील कलेचा आणि कारागिरांच्या कष्टाचा हा सन्मान आहे. गणेशोत्सव हा केवळ उत्सव नसून तो अनेकांच्या रोजगाराचे आणि आत्मनिर्भरतेचे साधन आहेहे आपण जगाला दाखवून दिले आहे. हे यश महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचे आणि कलात्मक शिस्तीचे राष्ट्रीय पातळीवर झालेले ठळक दर्शन आहे, असे गौरोद्गार सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड.आशिष शेलार यांनी केले.

गौरवास्पद कामगिरीमागे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलारसांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले तसेच सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभिषण चवरेयांचे दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व मोलाचे ठरले. चित्ररथ समूहातील अधिकारीकलाकार आणि सर्व सहकाऱ्यांची मेहनतसमर्पण आणि संघभावना यामुळे हे यश शक्य झाले.

प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्ली येथील कर्तव्यपथावरील संचलनात महाराष्ट्राचा डंका

 प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्ली येथील कर्तव्यपथावरील संचलनात महाराष्ट्राचा डंका

·         'गणेशोत्सव: आत्मनिर्भरतेचे प्रतीकचित्ररथाला प्रथम पारितोषिक

·         महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कार्य विभागाने पाठवलेल्या सांस्कृतिक पथकाला आंतरराज्य समूह नृत्य स्पर्धेत तिसरा क्रमांक

 

मुंबईदि. ३० : भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्ली येथील 'कर्तव्यपथावरपार पडलेल्या दिमाखदार संचलनात महाराष्ट्र राज्याच्या चित्ररथाने प्रथम क्रमांकाचा सर्वोच्च बहुमान पटकावला. आज दिल्लीत राष्ट्रीय रंगशाळा केंट येथे केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ व सहसचिव अमिताभ श्रीवास्तव यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

'गणेशोत्सव: आत्मनिर्भरतेचे प्रतीकया विषयावर आधारित या चित्ररथाने महाराष्ट्राची सांस्कृतिक समृद्धी आणि आर्थिक स्वावलंबनाचे दर्शन संपूर्ण जगाला घडवले. यंदाच्या चित्ररथातून महाराष्ट्राची अष्टविनायक परंपरागणेशोत्सवातील सार्वजनिक सहभाग आणि या उत्सवामुळे मिळणारा लाखो हातांना रोजगार (मूर्तीकामसजावटवाद्ये) यांचे प्रभावी सादरीकरण करण्यात आले होते. आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेत महाराष्ट्राचा गणेशोत्सव कसा पूरक ठरतोहे या चित्ररथातून प्रकर्षाने मांडण्यात आले.

            चित्ररथासोबत पारंपारिक वेशभूषेत लेझीमनृत्य सादर करणाऱ्या कलाकारांनी कर्तव्यपथावर चैतन्य निर्माण केले. त्यांच्या ऊर्जेमुळेच महाराष्ट्राच्या चित्ररथाला विशेष पसंती मिळाली. शिवाय महाराष्ट्राच्या सांस्कृतिक सादरीकरण करण्यासाठी पाठवलेल्या पथकाला देखील तिसरा क्रमांक प्राप्त झाला आहे .

Maharashtra Lok Bhavan pays tribute to martyrs on Martyrs’ Day

 Maharashtra Lok Bhavan pays tribute to martyrs on Martyrs’ Day

 

Mumbai Dated 30 : A 2 -  minute silence was observed as a mark of respect to the martyrs who laid down their lives for the country on the occasion of Mahatma Gandhi Punyatithi and Hutatma Din at Maharashtra Lok Bhavan, Mumbai on Friday

Joint Secretary to the Governor S. Ramamoorthy, Comptroller of the Governor’s Households Dr Nishikant Deshpande, Officers and staff of Lok Bhavan, public works department and police personnel were present to pay their tribute to the martyrs.

 

Every year 30 January is observed as Martyrs’ Day in memory of the martyrs who laid down their life for India’s freedom.

 

0000


दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विधान भवन येथे श्रध्दांजली

 दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विधान भवन येथे श्रध्दांजली

 

मुंबईदि. 30 : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विधान भवन येथे श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. विधान भवन इमारतीतील मुख्यप्रवेशद्वाराजवळ त्यांच्या प्रतिमेस सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांच्यातर्फे पुष्पहार आणि गुलाबपुष्प अर्पण करण्यात आले. सर्वांनी दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रध्दांजली अर्पण केली.

याप्रसंगी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव-1 जितेंद्र भोळेसचिव-2  मेघना तळेकर इटकेलवारसचिव-3 डॉ. विलास आठवलेसचिव-4 शिवदर्शन साठ्येसभापती महाराष्ट्र विधानपरिषद यांचे सचिव पंडित खेडकरअध्यक्ष महाराष्ट्र विधानसभा यांचे सचिव सुनिल वाणी यांच्यासह सर्व अधिकारी आणि कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाचे वृत्त समजताच विधानमंडळ सचिवालयातील अधिकारी आणि कर्मचारी वर्गात तीव्र दु:ख आणि हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अधिवेशन कामकाजाच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वक्तशीरपणा तसेच शिस्तप्रियता स्पष्ट करणाऱ्या अनेक प्रसंगांना यावेळी उजाळा देण्यात आला.

0000

Featured post

Lakshvedhi