Wednesday, 28 January 2026

राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन

 राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन

 

बारामती, दि. २८ : राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले.

 

यावेळी केंद्रीय नागरी विमानवाहतूक मंत्री राममोहन नायडू किंजारापूअन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळशिक्षणमंत्री दादाजी भुसेमहिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे,  बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसलेदिवंगत अजित पवार यांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार यांच्यासह खासदार सुप्रिया सुळेआमदार राहूल कुलॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार आदी उपस्थित होते.

राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान अंतर्गत ५२ व्या ग्रंथभेट योजनेसाठी सन २०२५ या कॅलेंडर वर्षातील प्रकाशित ग्रंथ सादर करण्याबाबत आवाहन

 राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान अंतर्गत ५२ व्या ग्रंथभेट योजनेसाठी

सन २०२५ या कॅलेंडर वर्षातील प्रकाशित ग्रंथ सादर करण्याबाबत आवाहन

 

मुंबई, दि. २८ : कोलकाता येथील राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान व राज्य शासन यांच्या संयुक्त विद्यमाने समान निधी 'ग्रंथभेटयोजने अंतर्गत सन २०२५ या कॅलेंडर वर्षात प्रकाशित झालेले मराठीहिंदी व इंग्रजी भाषेतील ग्रंथ खरेदी करुन राज्यातील शासनमान्य ग्रंथालयांना भेट म्हणून देण्यात येतात.

 

या योजनेअंतर्गत खरेदी करण्यात येणाऱ्या ग्रंथांची निवड करण्यासाठी तसेच ग्रंथालय संचालनालय स्तरावरुन प्रसिध्द होणाऱ्या 'शासनमान्य ग्रंथ निवड यादी मध्ये समावेश होण्याच्या दृष्टीने सन २०२५ या कॅलेंडर वर्षात (१ जानेवारी२०२५ ते ३१ डिसेंबर२०२५) प्रकाशित झालेल्या व प्रथम आवृत्ती असलेल्या ग्रंथांची प्रत्येकी एक विनामुल्य प्रत ग्रंथालय संचालकग्रंथालय संचालनालयमहाराष्ट्र राज्यमुंबई यांच्याकडे दि. २८ फेब्रुवारी२०२६ पर्यंत सादर करणे आवश्यक आहे.

 

२८ फेब्रुवारी२०२६ नंतर प्राप्त झालेल्या ग्रंथांचा ग्रंथ निवड यादीसाठी विचार केला जाणार नाही. या योजनेसाठी २०२५ या वर्षात प्रकाशित झालेले ग्रंथ जर यापूर्वी संचालनालयास पाठविले असल्यास पुन्हा पाठविण्याची आवश्यकता नाही.

 

तसेचमुद्रण व नोंदणी अधिनियम१८६७ अन्वये मुद्रकाने व ग्रंथ प्रदान अधिनियम१९५४ अन्वये प्रकाशकाने ग्रंथाची प्रत्येकी एक प्रत राज्य मध्यवर्ती ग्रंथालयनगर भवनमुंबईशासकीय विभागीय ग्रंथालयपुणे व शासकीय विभागीय ग्रंथालयनागपूर येथे पाठविणे आवश्यक आहे. ग्रंथ पोहोचल्याची पोच पावती संबंधित ग्रंथालयांकडून घ्यावी. ग्रंथालय संचालनालयास संबंधित ग्रंथ पाठवितांना वरीलप्रमाणे ग्रंथ पाठविल्याची पोच पावती ग्रंथांसोबत टपालामार्फत वा समक्ष पाठविण्यात यावी. सर्व लेखकप्रकाशक यांनी ग्रंथ पाठविण्याचे आवाहन ग्रंथालय संचालक यांना केले आहे..

Governor Devvrat offers tribute to Dy CM Ajit Pawar at Maharashtra Lok Bhavan Governor of Maharashtra and Gujarat Acharya Devvrat offered tribute to Deputy Chief Minister Ajit Pawar.

 Governor Devvrat offers tribute to

Dy CM Ajit Pawar at Maharashtra Lok Bhavan

Governor of Maharashtra and Gujarat Acharya Devvrat offered tribute to Deputy Chief Minister Ajit Pawar.

 

At a condolence meeting held at Lok Bhavan, Mumbai the Governor observed two minutes’ silence and paid homage to the late Dy CmAjit Pawar.

Officers and staff of Lok Bhavan, along with police personnel and officers posted at Lok Bhavan, were also present on the occasion.

In a condolence message, the Governor said:

“I was deeply saddened by the untimely demise of the Deputy Chief Minister of Maharashtra, Ajit Pawar in a plane crash near Baramati.  I pay my respects to Ajit Pawar and convey my heartfelt condolences to all the members of the bereaved f

महाराष्ट्राचा अत्यंत अभ्यासू आणि कर्तबगार नेता हरपला

 महाराष्ट्राचा अत्यंत अभ्यासू आणि कर्तबगार नेता हरपला

- मंत्री जयकुमार रावल

 

मुंबई दि.28:- महाराष्ट्राच्या राजकीयसामाजिकया सह सर्व क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणारे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात झालेले दुर्दैवी निधन अत्यंत धक्कादायकवेदनादायी आणि मन सुन्न करणारे आहे. त्यांच्या अकाली जाण्याने महाराष्ट्राने एक अत्यंत अभ्यासूअनुभवीकर्तबगारअजातशत्रू आणि लोकाभिमुख नेतृत्व गमावले आहे.अशा शब्दात अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी शोक संवेदना व्यक्त केल्या.

 

मंत्री जयकुमार रावल म्हणाले कीअजित पवार यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत राज्याच्या विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. शेतीजलसंपदापायाभूत सुविधाऔद्योगिक विकास आणि ग्रामीण भागाच्या उन्नतीसाठी त्यांनी दिलेले योगदान कायम स्मरणात राहील. सामान्य माणसाच्या प्रश्नांसाठी ते नेहमीच संवेदनशील राहिले. कठोर निर्णयक्षमताप्रशासनावर मजबूत पकडआणि स्पष्टवक्ता म्हणून त्यांच्या नेतृत्वाची ओळख होती.

 

तसेच माझ्या शालेय जीवनापासून त्यांच्याशी सबंध आणि संवाद होता. पुण्याचे सिम्बॉयसिस कॉलेजमध्ये मी शिकत असताना त्यांनी मला बोलवून माझी मुलाखत घेतली होती. नंतरच्या काळात राजकारणात आमदार झाल्यानंतर जिल्ह्यातील विकासाच्या अनेक योजनांना सहकार्य केले. साक्री तालुक्यातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प मागणी केल्यानंतर त्यांनी मंजूर केला. काल झालेल्या कॅबिनेट बैठकीमध्ये राज्यातील सोयाबीनतूर खरेदी आणि एकूणच पणन संदर्भात अनेक विषयात चर्चा करून मार्गदर्शन केले.

 

त्यांच्या निधनाने केवळ एका राजकीय नेत्याचा नव्हेतर राज्याच्या विकासप्रक्रियेला दिशा देणाऱ्या प्रभावी व्यक्तिमत्त्वाचा अंत झाला आहे. ही हानी भरून न निघणारी असून महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण झालेली पोकळी दीर्घकाळ जाणवेल.असे  मंत्री रावल म्हणाले.

 

या दुःखद प्रसंगीत्यांच्या कुटुंबीयांप्रतीआप्तस्वकीयांप्रती मी शोकसंवेदना व्यक्त करतो. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो व कुटुंबीयांना हे असह्य दुःख सहन करण्याचे बळ देवोहीच प्रार्थना.

0000

बी.सी.झंवर/विसंअ

अजित दादांच्या जाण्याने मनाला चटका

 अजित दादांच्या जाण्याने मनाला चटका

                                                -मंत्री पंकजा मुंडे

 

मुंबईदि. 28 : दादा अशी एक्झिट घ्यायची नव्हती!! ... तुम्ही जीवाला चटका लावून गेलात... तुम्ही सदैव स्मरणात रहाल.. तुमच्याबरोबर प्रवास केलाचर्चा केल्याअगदी गप्पाही खूप मारल्या.. तुमचा राजकीय आणि अॅकडमिक सेन्स खूप जबरदस्त होता. तुमच्या भाषणातूनविनोद बुद्धीने तुम्ही अनेकांना स्पष्ट बोलूनही हसवलं.. पण आज तुमच्या जाण्याने तुम्ही कार्यकर्त्यांना रडवलं..असा अनुभवी नेता होणे नाही .. महाराष्ट्र एका डायनॉमिक नेत्याला मुकला.. गोपीनाथ मुंडे परिवारातर्फे आदरांजलीअशा शब्दांत पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग व पशुसंवर्धन विभागाच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी श्रद्धांजली वाहिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर शोकाकुल झालेल्या पंकजा मुंडे यांनी अजित दादांना भावपूर्ण शब्दांत आदरांजली वाहिली.

श्रीमती मुंडे म्हणाल्या कीअजितदादांनी आपल्या कामानेआपल्या वागण्याने राज्याच्या राजकारणात एक वेगळा दरारा निर्माण केला होता. राजकारणात शब्दांला जागणारे म्हणून सर्वांनाच ते परिचत होते. जनतेत रमणाराजनतेसाठी झटणारा हा लोकनेता आज आपल्यात नाहीयावर विश्वास बसत नाही.

कुशल प्रशासकदिलेला शब्द पाळणारे व कामाप्रती प्रचंड निष्ठा असलेले व्यक्तिमत्व म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ओळखले जाते. अशा अजित दादांच्या अकाली निधनाची बातमी मनाला चटका लावणारी आहे. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्रातील सुसंस्कृत दादा व्यक्तिमत्व हरपले. आपल्या अभ्यासू वृत्तीने व कामाच्या झपाट्याने वेगळा ठसा उमटविणाऱ्या दादांना महाराष्ट्र विसरू शकत नाही. हे दुःख पचविण्याची ताकद परमेश्वर पवार कुटुंबियांना देवोअशा शब्दांत श्रीमती मुंडे यांनी शोक व्यक्त केला.

माझा मोठा भाऊ गेल्याची भावना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भावपूर्ण श्रद्धांजली

  

माझा मोठा भाऊ गेल्याची भावना

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भावपूर्ण श्रद्धांजली

 

मुंबई दि.२८: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाची बातमी अविश्वसनीय आणि धक्कादायक आहे. ते माझ्यापेक्षा अनुभवाने आणि वयानेही मोठे होते. त्यांच्या निधनाने माझा मोठा भाऊ गेल्याची भावना माझ्या मनात आहे. महाराष्ट्रासाठी आजचा काळा दिवस असून एक दूरदर्शीस्पष्टवक्ता आणि अतिशय अभ्यासू नेता आपण गमावला आहे. महायुती सरकारमधले ते केवळ माझे सहकारी नव्हते तर माझे चांगले मित्रही होते. त्यांचं अकाली जाणं जीवाला चटका लावणारं आहे, अशा भावपूर्ण शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रद्धांजली वाहिली.

उपमुख्यमंत्री श्री. शिंदे आपल्या शोकसंदेशात म्हणतात कीमहाराष्ट्र त्यांना दादा म्हणून ओळखायचा आणि ते तसे होते. त्यांच्याकडे वेळ’ साधण्याचा अप्रतिम गूण होता. त्यांच्या कामाचा झपाटा आणि निर्णयक्षमता आम्ही सगळ्यांनी अनुभवली आहे. मी केवळ सहकारी म्हणूनच नाही तरी मित्र म्हणून सुद्धा त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या पैलुंना जवळून पाहिलं आहे.

अजितदादांच्या स्पष्ट आणि नर्म विनोदीमार्मिक कोपरखळ्यांची वैशिष्ट्ये सुद्धा सगळ्यांना आवडते. आमचे सरकार तीन पक्षांचे असलेतरीही निर्णय मात्र एकसंधपणे आणि एकजूटीने घेत आलो आहोत. विशेषतः अगदी प्रारंभीपासून राज्याची आर्थिक घडी चांगली बसावी यासाठी राज्याचा वित्तमंत्री म्हणून अजित दादांनी विकास कामांना खीळ बसू न देता अतिशय हातोटीने निर्णय घेतले. राज्यातील अनेक पायाभूत विकास प्रकल्पांना चालना देण्यासाठी मी मुख्यमंत्री असतांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असो किंवा इतर काही योजना असोउपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री म्हणून अजितदादा यांनी वेळोवेळी पाठबळच दिले.

परखड आणि जिथल्या-तिथे निर्णय घेण्याची क्षमता म्हणून दादांचा महाराष्ट्राला परिचय होता. वित्तमंत्री म्हणून त्यांच्याकडे सगळ्याच खात्यांबाबत माहिती असायची. पण म्हणून त्यांनी कधी शिष्टाचाराची चौकट मोडली नाही. धोरणात्मक निर्णय जाहीर करतानाही त्यांनी कधी कुणाला अव्हेरल्याचे दिसत नाही. आपले म्हणणे ते सूस्पष्टपणे आणि अधिकारवाणीने मांडत. त्यांचा हा स्पष्टवक्तेपणा धोरणात्मक बैठका आणि विधिमंडळ सभागृहातही अनुभवायला आला.

स्वप्नाळू सादरीकरण आणि केवळ सांगोवांगी गोष्टींपेक्षा ते व्यावहारिक गोष्टी पडताळून पहात. एखादी संकल्पना पुढे आलीकी तिचा ते सर्वांबाजूंनी विचार करायला भाग पाडत. ती संकल्पना टिकेल कितपततिच्या भविष्यातील देखभालीची व्यवस्था इथपासूनती लोकहिताची आहे काकितीजणांसाठी ती उपयुक्त ठरणार आहेअशा अनेक गोष्टींचा ते विचार करत. ठोस आणि तडकपणे निर्णय घेत असल्याने विधिमंडळातील आमदार आणि मंत्रिमंडळातील होतकरू-तरूण मंत्र्यांनाही अजितदादांच्या कार्यशैलीबाबतदैनंदिनीबाबत कुतूहल असायचे. त्यांनाही वेळप्रसंगी ठणकावयाला ज्येष्ठत्वाच्या नात्याने दादा मागे पुढे पाहत नसत. छोट्या-मोठ्या गोष्टींचाही लोकप्रतिनिधींनी विचार करायला हवा. आपल्या निर्णयाचा लोकांच्या जीवनावर कसा आणि काय परिणाम होतोयाचा अभ्यास करायला हवा असा त्यांचा आग्रह असायचा. त्यामागे चूका काढण्याची नव्हेतरत्यांची पुनरावृत्ती होऊ नये याची तळमळ असायची.

आज दादा आपल्यात नाहीत ही कल्पना सुद्धा मनाला पटत नाही. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो असेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शेवटी म्हणतात.

दादा गेले! आजचा दिवस महाराष्ट्रासाठी अतिशय कठीण उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शोकमग्न श्रद्धांजली

 दादा गेले! आजचा दिवस महाराष्ट्रासाठी अतिशय कठीण

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शोकमग्न श्रद्धांजली

 

मुंबईदि. २८: जमिनीशी घट्ट नाळ असलेले जननेतेमाझे मित्र आणि सहकारीउपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्याची घटना मनाला अत्यंत व्यथित करणारी आहे. मनाला चटका लावणारी आहे. मन सुन्न झाले आहे. भावना व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीतअशा शोकमग्न भावना व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्रीराज्य उत्पादन शुल्क मंत्री अजित पवार यांना शोकमग्न श्रद्धांजली अर्पण केली आहे.

 

'माझा दमदार आणि दिलदार मित्र मी गमावला आहे. माझ्यासाठी ही वैयक्तिक हानी आहे. हे कधीही भरून न येणारे नुकसान आहे. आजचा दिवस महाराष्ट्रासाठी अतिशय कठीण आहे. मी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस परिवाराच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या अपघातात अन्य ४ जणांचा मृत्यू झाला. त्यांच्याही कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोतअसे नमूद करून मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Featured post

Lakshvedhi