Wednesday, 28 January 2026

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई

 छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई

आंतरराष्ट्रीय विमानतळ मेट्रो जोडणीस मान्यता

·         भूसंपादनासह सर्व परवानग्यांची कार्यवाही प्रकल्प सुरू होण्यापूर्वी पूर्ण करावी

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

·         गडचिरोली जिल्ह्यात खनिज वाहतुकीसाठी नवेगाव मोर ते सुरजागड या चार पदरी

सिमेंट काँक्रिट महामार्गाच्या सुधारित आखणीस मान्यता

मुंबईदि. २७: छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ दरम्यान मेट्रो मार्गिका ८ च्या ३५ किलोमीटरच्या जोडणीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.  यासोबतच ६६ किलोमीटर लांबीचा नाशिक शहर परिक्रमा मार्ग महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून करण्यास आणि गडचिरोली जिल्ह्यात खनिज वाहतुकीसाठी नवेगाव मोर ते सुरजागड या चार पदरी सिमेंट काँक्रिट महामार्गाच्या सुधारित आखणीस मान्यता देण्यात आली.

पायाभूत सुविधा प्रकल्पाला आवश्यक असलेले भूसंपादन आणि सर्व प्रकारच्या परवानग्या प्राप्त करून घेण्याची कार्यवाही  प्रकल्प सुरू होण्यापूर्वी पूर्ण करावीअसे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले. तसेच कुठलाही पायाभूत सुविधा प्रकल्प भूसंपादनानंतर पुढील  तीन वर्षात पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

मॅग्नेट प्रकल्पाच्या मुख्य उद्देशांमध्ये राज्यातील 14 फलोत्पादन पिकांच्या व फुलांच्या मुल्यसाखळ्यांमध्ये

 मॅग्नेट प्रकल्पाच्या मुख्य उद्देशांमध्ये राज्यातील 14 फलोत्पादन पिकांच्या व फुलांच्या मुल्यसाखळ्यांमध्ये खाजगी गुंतवणूक आकर्षित करुन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणेफळे व भाजीपाल्याचे काढणीपश्चात नुकसान कमी करणे व त्यांची साठवणूक क्षमता वाढविणेमागणीनुसार मालाची मूल्यवृद्धी करणे आणि वितरण व्यवस्था कार्यक्षम करणेशेतकरी उत्पादक संस्थांचा मूल्यसाखळीतील सहभाग वाढविणे यांचा प्रामुख्याने समावेश आहे. प्रकल्पाचे हे उद्देश साध्य करण्यासाठी उत्पादक आणि उद्योजकांना नवीन व संघटीत बाजारपेठेत प्रवेश मिळवून देण्यासाठी आवश्यक तांत्रिक साहाय्यपायाभूत सुविधा उभारणीसाठी साहाय्यमध्यम मुदत कर्ज आणि खेळते भांडवल पुरविण्यात येत आहे. मॅग्नेट प्रकल्पाचा वित्तीय आराखडा 142.9 दशलक्ष अमेरीकन डॉलर्स इतका असून प्रकल्पाचा अंमलबजावणी कालावधी सन 2021-22 ते 2027-28 असा आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

समारोप बैठकीमध्ये प्रकल्पाच्या प्रगतीबाबत सविस्तर सादरीकरण करुन आशियाई विकास बँकेच्या शिष्टमंडळाने प्रकल्पाच्या उल्लेखनीय कामाबाबत समाधान व्यक्त केले.

मॅग्नेट प्रकल्पाच्या राज्यातील प्रगतीबाबत आश्वस्त करताना प्रकल्पाच्या अंमलबजावणीद्वारे

 पणन मंत्री जयकुमार रावल यांनी मॅग्नेट प्रकल्पाच्या राज्यातील प्रगतीबाबत आश्वस्त करताना प्रकल्पाच्या अंमलबजावणीद्वारे राज्यात पणनविषयक गुंतवणूक व रोजगार निर्मितीस चालना मिळाली असल्याचे नमूद केले. मॅग्नेट 2.0 बाबत चर्चा करताना राज्यातील कृषीमालास आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळण्याकामी शेतकरी उत्पादक संस्थांसाठी उत्तम कृषी तंत्रज्ञानकृषीमालाची हाताळणीपायाभूत सुविधापॅकेजिंगब्रँण्डींगजागतिक स्तरावरील कृषी मूल्य साखळ्यांचा अभ्यासमहाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे संस्थात्मक बळकटीकरणपोषकतत्व आधारीत बाजारपेठकार्बन क्रेडीटहवामान अनुकूल धोरणाची अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील ग्रामीण स्तरावरील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये पायाभूत सुविधांची उभारणीतसेच शहर स्तरावरील मोठ्या बाजारसमित्यांमध्ये डिजिटायझेशनघनकचरा व्यवस्थापनाचा अवलंब याबाबींवर विशेष भर देण्यात येत आहे. तसेच महिला सक्षमीकरणाबाबत आशियाई विकास बँकेचे अधिक सहकार्य मिळण्यासाठी राज्य शासनामार्फत विकसित महाराष्ट्र व्हिजन 2047 च्या अनुषंगाने पणन विभागामार्फत कार्यवाही करण्यात येत असल्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले.

मॅग्नेट 2.0 प्रकल्पाद्वारे पणन विषयक गुंतवणूक, कृषीमालाचे मूल्यवर्धन व रोजगारवाढीस गती देणार

 मॅग्नेट 2.0 प्रकल्पाद्वारे पणन विषयक

गुंतवणूक, कृषीमालाचे मूल्यवर्धन व रोजगारवाढीस गती देणार

-पणन मंत्री जयकुमार रावल

मुंबईदि. 27 : महाराष्ट्र शासन आणि आशियाई विकास बँक यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यात महाराष्ट्र ॲग्रीबिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्प राबविण्यात येत आहे. हा प्रकल्प राज्यातील शेतकरीशेतकरी उत्‍पादक संघटना आणि कृषीमूल्य साखळी मजबूत करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे सांगून या प्रकल्पाच्या माध्यमातून पणन विषयक गुंतवणूक, कृषीमालाचे मूल्यवर्धन व रोजगार वाढीस गती देणार असल्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले.

प्रकल्पाच्या प्रगती तपासणीसाठी आशियाई विकास बँकेचे शिष्टमंडळ दि. 19 ते 27 जानेवारी 2026 या कालावधीत

 प्रकल्पाच्या प्रगती तपासणीसाठी आशियाई विकास बँकेचे शिष्टमंडळ दि. 19 ते 27 जानेवारी 2026 या कालावधीत महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते. क्रिशन रौटेला यांच्या अध्यक्षतेखालील या शिष्टमंडळामध्ये श्रीमती प्राची शर्माबॅण्डो एंजेलीसमॅरी मागरिटश्रीमती टोकोमो काटोश्री. नायरश्रीमती अनिता कुमारीगोविंद देसाईसुमित राठोडअखिलेश सम्यालगुरविंदर सिंगभुवनेश्वरी बालसुब्रमण्यम यांच्यासमवेत महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदमएनआयपीएचटीचे संचालक मिलींद आकरेप्रकल्प संचालक विनायक कोकरेअतिरिक्त प्रकल्प संचालक डॉ. अमोल यादव आदींचा सहभाग होता.

या शिष्टमंडळाने विदर्भमराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रात उभारणी करण्यात आलेल्या निवडक प्रक्रीया प्रकल्प तसेच राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थातळेगाव दाभाडे येथे प्रत्यक्ष पाहणी केली. या भेटीदरम्यान प्रकल्प लाभार्थी आणि विशेषत: महिला सभासदांशी चर्चा करुन प्रकल्पाकडून अन्य कोणत्या प्रकारचे सहकार्य अपेक्षित आहेयाबाबत माहिती घेतली.

मॅग्नेट प्रकल्पाच्या राज्यातील प्रगतीबाबत आश्वस्त करताना प्रकल्पाच्या अंमलबजावणीद्वारे

 पणन मंत्री जयकुमार रावल यांनी मॅग्नेट प्रकल्पाच्या राज्यातील प्रगतीबाबत आश्वस्त करताना प्रकल्पाच्या अंमलबजावणीद्वारे राज्यात पणनविषयक गुंतवणूक व रोजगार निर्मितीस चालना मिळाली असल्याचे नमूद केले. मॅग्नेट 2.0 बाबत चर्चा करताना राज्यातील कृषीमालास आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळण्याकामी शेतकरी उत्पादक संस्थांसाठी उत्तम कृषी तंत्रज्ञानकृषीमालाची हाताळणीपायाभूत सुविधापॅकेजिंगब्रँण्डींगजागतिक स्तरावरील कृषी मूल्य साखळ्यांचा अभ्यासमहाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे संस्थात्मक बळकटीकरणपोषकतत्व आधारीत बाजारपेठकार्बन क्रेडीटहवामान अनुकूल धोरणाची अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील ग्रामीण स्तरावरील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये पायाभूत सुविधांची उभारणीतसेच शहर स्तरावरील मोठ्या बाजारसमित्यांमध्ये डिजिटायझेशनघनकचरा व्यवस्थापनाचा अवलंब याबाबींवर विशेष भर देण्यात येत आहे. तसेच महिला सक्षमीकरणाबाबत आशियाई विकास बँकेचे अधिक सहकार्य मिळण्यासाठी राज्य शासनामार्फत विकसित महाराष्ट्र व्हिजन 2047 च्या अनुषंगाने पणन विभागामार्फत कार्यवाही करण्यात येत असल्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले.

मॅग्नेट 2.0 प्रकल्पाद्वारे पणन विषयक गुंतवणूक, कृषीमालाचे मूल्यवर्धन व रोजगारवाढीस गती देणार

 मॅग्नेट 2.0 प्रकल्पाद्वारे पणन विषयक

गुंतवणूक, कृषीमालाचे मूल्यवर्धन व रोजगारवाढीस गती देणार

-पणन मंत्री जयकुमार रावल

मुंबईदि. 27 : महाराष्ट्र शासन आणि आशियाई विकास बँक यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यात महाराष्ट्र ॲग्रीबिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्प राबविण्यात येत आहे. हा प्रकल्प राज्यातील शेतकरीशेतकरी उत्‍पादक संघटना आणि कृषीमूल्य साखळी मजबूत करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे सांगून या प्रकल्पाच्या माध्यमातून पणन विषयक गुंतवणूक, कृषीमालाचे मूल्यवर्धन व रोजगार वाढीस गती देणार असल्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले.

सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीस आशियाई विकास बँकेच्या संचालक (भारत) श्रीमती मिओ ओकासंचालक ताकेशी उडेओक्रिशन रौटेला तसेच पणन विभागाचे प्रधान सचिव प्रविण दराडे यांच्यासह प्रकल्पाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Featured post

Lakshvedhi