प्रकल्पाच्या प्रगती तपासणीसाठी आशियाई विकास बँकेचे शिष्टमंडळ दि. 19 ते 27 जानेवारी 2026 या कालावधीत महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते. क्रिशन रौटेला यांच्या अध्यक्षतेखालील या शिष्टमंडळामध्ये श्रीमती प्राची शर्मा, बॅण्डो एंजेलीस, मॅरी मागरिट, श्रीमती टोकोमो काटो, श्री. नायर, श्रीमती अनिता कुमारी, गोविंद देसाई, सुमित राठोड, अखिलेश सम्याल, गुरविंदर सिंग, भुवनेश्वरी बालसुब्रमण्यम यांच्यासमवेत महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम, एनआयपीएचटीचे संचालक मिलींद आकरे, प्रकल्प संचालक विनायक कोकरे, अतिरिक्त प्रकल्प संचालक डॉ. अमोल यादव आदींचा सहभाग होता.
या शिष्टमंडळाने विदर्भ, मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रात उभारणी करण्यात आलेल्या निवडक प्रक्रीया प्रकल्प तसेच राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था, तळेगाव दाभाडे येथे प्रत्यक्ष पाहणी केली. या भेटीदरम्यान प्रकल्प लाभार्थी आणि विशेषत: महिला सभासदांशी चर्चा करुन प्रकल्पाकडून अन्य कोणत्या प्रकारचे सहकार्य अपेक्षित आहे, याबाबत माहिती घेतली.
No comments:
Post a Comment