Tuesday, 27 January 2026

स्वातंत्र्य, समता व बंधुता ही मूल्ये भारतीय संस्कृतीत रुजलेली

 स्वातंत्र्यसमता व बंधुता ही मूल्ये भारतीय संस्कृतीत रुजलेली

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पण करतसंविधान निर्मितीसाठी त्यांनी व संविधान समितीच्या सदस्यांनी दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. स्वातंत्र्यसमता व बंधुता ही मूल्ये भारतीय संस्कृतीत रुजलेली असून त्यांचे प्रभावी प्रतिबिंब भारतीय संविधानात दिसून येतेअसे त्यांनी सांगितले. भगवान गौतम बुद्धांनी सांगितलेली बंधुतेची भावना संविधानाच्या केंद्रस्थानी असल्याचेही त्यांनी नमूद केले.

भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून महाराष्ट्र अधिक सक्षमपणे उभा राहील

 भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून महाराष्ट्र अधिक सक्षमपणे उभा राहील

 

प्रजासत्ताक दिन समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास

 

मुंबईदि. 26 : भारताचे संविधान आणि लोकशाही मूल्ये यांच्या बळावरच आज भारत वेगाने प्रगती करत आहे. भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. नुकत्याच दावोस येथे झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये महाराष्ट्राने 30 लाख कोटी रुपयांचे गुंतवणूक करार केले असून येत्या काळात  भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून महाराष्ट्र अधिक सक्षमपणे उभा राहीलअसा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय समारंभात व्यक्त केला. महाराष्ट्र थांबणार नाहीमहाराष्ट्र गतिशील राहील आणि संविधानाच्या बळावर सातत्याने प्रगतीकडे झेपावत राहीलअसेही ते म्हणाले.

 

दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त झालेल्या मुख्य शासकीय समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकविण्यात आला. यावेळी विधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदेकौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढामुख्य सचिव राजेश अग्रवालपोलीस महासंचालक सदानंद दातेमुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारतीवरिष्ठ प्रशासकीय आणि पोलीस अधिकारीविविध देशांच्या वाणिज्य दूतावासातील प्रतिनिधीनागरिक उपस्थित होते. राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभाग (राजशिष्टाचार) यांच्या वतीने या समारंभाचे आयोजन करण्यात आले. 

Monday, 26 January 2026

प्रगतीचा संदेश देणारे चित्ररथ

 प्रगतीचा संदेश देणारे चित्ररथ

 

ग्रामविकास व पंचायतराज विभागमराठी भाषा विभागसहकारपणन आणि वस्त्रोद्योग विभागपाणी पुरवठा व स्वच्छता विभागसार्वजनिक आरोग्य विभागसामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागपर्यटन विभागजलसंपदा विभागइतर मागास बहुजन कल्याण विभागअन्ननागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागसांस्कृतिक कार्य विभागआदिवासी विकास विभागकृषी विभागगृह विभागवाहतूकअल्पसंख्याक विभागउच्च व तंत्रशिक्षण विभागकामगार विभागकौशल्यरोजगारउद्योजकता व नाविन्यता विभागगृहनिर्माण विभागवन विभाग आणि ऊर्जा विभागाच्या चित्ररथांनी संचलनात सहभाग घेतला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मृण्मयी भजक आणि पल्लवी मुजुमदार यांनी केले. तरकिरण शिंदेअरुण शिंदेविवेक शिंदे आणि कु.आराध्या शिंदे यांनी सनई चौघडा वादन केले.

संचलनात विविध पथकांचा सहभाग

 संचलनात विविध पथकांचा सहभाग

प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात भारतीय नौदलगोवा पोलीसराज्य राखीव पोलीस बलबृहन्मुंबई पोलीस सशस्त्र दलबृहन्मुंबई पोलीस दंगल नियंत्रण पथकबृहन्मुंबई सशस्त्र महिला पोलीस दलमुंबई लोहमार्ग पोलीस दलगडचिरोली व गोंदिया जिल्ह्याचे सी-६० पथकगृह रक्षक दल (पुरुष)बृहन्मुंबई वाहतूक पोलीस दलगृहरक्षक दल (महिला)राज्य उत्पादन शुल्क विभागवन विभाग: मुंबई अग्निशमन दलबृहन्मुंबई महानगरपालिका सुरक्षा दलसुरक्षा रक्षक मंडळ बृहन्मुंबई व ठाणे जिल्हाराष्ट्रीय सेवा योजना (मुले/मुली)सी.कॅडेट कोअर (मुली)सी.कॅडेट कोअर (मुले)रोड सेफ्टी पेट्रोल (मुली) रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूलदहिसर मुंबईरोड सेफ्टी पेट्रोल (मुले) सेंट पॉल हायस्कूलदादरमुंबईरोड सेफ्टी पॅट्रोल (मुली) सेंट पॉल कॉन्व्हेंट हायस्कूलदादरमुंबईरोड सेफ्टी पेट्रोल (मुले) डॉ.अँटोनिओ डा सिल्वा हायस्कूल दादरमुंबईरोड सेफ्टी पेट्रोलमनपा (मुली) वामनराव महाडिक उर्दू आणि पंतनगर मनपा इंग्रजी शाळाघाटकोपर (पूर्व)मुंबईरोड सेफ्टी पेट्रोल मनपा (मुले) जी.व्ही. स्कीम मुलुंड आणि क.दा. गायकवाड हिंदी शाळासायन भोईवाडामुंबईभारत स्काऊट गाईड मनपा शाळा (मुली)भारत स्काऊट गाईड मनपा शाळा (मुले)स्टुडंट पोलीस कॅडेट (मुले/मुली) पुणे विद्याभवन पंतनगर आणि शिवाजी टेक्निकल स्कूल पंतनगरमुंबई यांच्यासह पाईप बँडमहिला पाईप बँडब्रास बँड पथकअश्वदल पोलीस पथक सहभागी झाले होते. त्याचप्रमाणे भारतीय नौदलबृहन्मुंबई पोलीस दलमहिला निर्भया पथक आणि बृहन्मुंबई अग्निशमन दलाच्या वाहनांनी संचलनात सहभाग घेतला. नौदलाचे कमांडर पंकज 

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ग्रामीण भागात ३० लाख घरांच्या निर्मितीचा विक्रम

 प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ग्रामीण भागात ३० लाख घरांच्या निर्मितीचा विक्रम

अनुसूचित जाती-जमातींसह वंचित घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष योजना राबविण्यात येत असून प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ग्रामीण भागात ३० लाख घरांची निर्मिती हा एक विक्रम असणार आहे. सौर कृषी वाहिनीसौरऊर्जेवर चालणारे कृषी पंप यामध्येही राज्याने देशात प्रथम क्रमांक पटकावल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. लाडकी बहीण योजनाशेतकऱ्यांसाठी मोफत वीज योजना यासह विविध लोकाभिमुख योजनांद्वारे समाजातील प्रत्येक घटकाचा विकास साधण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांच्या हितासाठी शासन कटिबद्ध

 शेतकऱ्यांच्या हितासाठी शासन कटिबद्ध

शेतकऱ्यांच्या हितासाठी शासन कटिबद्ध असून अडचणीच्या काळात शेतकऱ्यांना भरघोस मदत करण्यात आली आहे. पुढील टप्प्यात दुष्काळमुक्त महाराष्ट्र घडवण्यासाठी नदीजोड प्रकल्प राबवून राज्याच्या कानाकोपऱ्यात पाणी पोहोचविण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात महाराष्ट्र नवे विक्रम प्रस्थापित करीत असून मुंबई महानगर प्रदेशातील पायाभूत प्रकल्पसमृद्धी महामार्ग आणि शक्तिपीठ महामार्ग यांसारखे प्रकल्प राज्याच्या विकासाला गती देणारे ठरत असल्याचे त्यांनी नमूद केले.

भारताची महत्त्वपूर्ण जागतिक शक्ती व अर्थव्यवस्था म्हणून ओळख

 भारताची महत्त्वपूर्ण जागतिक शक्ती व अर्थव्यवस्था म्हणून ओळख

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताकडे आज एक महत्त्वपूर्ण जागतिक शक्ती व अर्थव्यवस्था म्हणून पाहिले जात असल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले कीहे यश संविधानाने दिलेल्या लोकशाही व्यवस्थेमुळेच शक्य झाले आहे. महाराष्ट्र ही संतांची व वीरांची भूमी असून छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेल्या स्वाभिमानाच्या मूल्यांवर राज्याची प्रगती सुरू आहे. विदर्भमराठवाडाउत्तर महाराष्ट्रपश्चिम महाराष्ट्रकोकण आणि मुंबईसह राज्यातील सर्व भागांमध्ये गुंतवणूक व रोजगारनिर्मिती होत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.


Featured post

Lakshvedhi