Wednesday, 28 January 2026

गोंदिया, भंडारा ते गडचिरोली या समृद्धी महामार्गाच्या विस्तारित कामांना गती

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेपायाभूत सुविधा प्रकल्पांची कामे वेळेत पूर्ण करण्यात यावी. कुठल्याही परिस्थितीत कामे रेंगाळू नये,  काम पूर्ण होण्यास विलंब लागल्यास प्रकल्पाच्या खर्चामध्ये वाढ होते. नागपूर ते गोंदियाभंडारा ते गडचिरोली या समृद्धी महामार्गाच्या विस्तारित कामांना गती द्यावी.  प्रकल्प कार्यादेश देतानाच प्रकल्प पुढील तीन वर्षात पूर्ण करण्याची अट करण्यात यावी.

प्रकल्प विहित कालमर्यादेत पूर्ण झाल्यास कंत्राटदाराला प्रोत्साहन मूल्य आणि विहित कालावधीपेक्षा  जास्त वेळ लागल्यास दंडाची व्यवस्था असलेली ऑटो मोडवरील यंत्रणा विकसित करावी. गडचिरोली जिल्ह्यातील महामार्गाचे काम करीत असताना रस्त्याच्या बाजूला गॅस वाहिनीसाठी जागेची उपलब्धता असल्याची खात्री करावी. भविष्यात सुरजागडपर्यंत गॅस वाहिनी कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्यासाठी आतापासून जागेची तरतूद महामार्गाच्या बाजूला करण्यात यावीअसेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.


Tuesday, 27 January 2026

राज्यातील आयटीआयचे आधुनिकीकरण, पीएम – सेतू योजना राबविणार पहिल्या टप्प्यात नागपूर, छत्रपती संभाजीनगर, पुणे यांचा समावेश

 राज्यातील आयटीआयचे आधुनिकीकरणपीएम – सेतू योजना राबविणार

पहिल्या टप्प्यात नागपूरछत्रपती संभाजीनगरपुणे यांचा समावेश

 

राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे (आयटीआयपीएम सेतू योजनेंतर्गत आधुनिकीकरण करण्याच्या योजनेस राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

कुशल मनुष्य़बळाची मागणी आणि पुरवठा यांच्यातील तफावत भरून काढण्यासाठी पीएम सेतू योजनेतून आयटीआयचे आधुनिकीकरण करण्याची योजना आहे. या योजनेच्या पहिल्या टप्पात नागपूरछत्रपती संभाजीनगर आणि पुणे येथील आयटीआयचे आधुनिकीकरण केले जाणार आहे. आयटीआयच्या आधुनिकीकरणासाठी हब अँड स्पोक प्रारूप विकसित केले जाणार आहे.

या योजनेची पुढच्या वर्षात टप्प्या-टप्प्याने अंमलबजावणी करण्यासही मान्यता देण्यात आली. योजनेकरिता केंद्र सरकारचा ५० टक्के राज्य शासनाचा ३३ टक्के आणि उद्योग क्षेत्राचा १७ टक्के निधी असेल. राज्यात एका क्लस्टरकरिता (१ हब आयटीआय व ४ स्पोक आयटीआय) पाच वर्षाकरिता अंदाजित २४१ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्याकरिता केंद्र सरकारचे ११२ कोटी रुपयेराज्य शासनाचे ९८ कोटी रुपये आणि उद्योग क्षेत्राचा ३१ कोटी रुपयांचा वाटा असेल.  त्यापैकी शासनाकडून पाच वर्षाकरीता करावयाच्या ९८ कोटी रुपयांच्या खर्चासही मान्यता देण्यात आली.

दिवसांच्या ई-गव्हर्नन्स कार्यक्रमात महाराष्ट्र सागरी मंडळ अव्वल

 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स कार्यक्रमात महाराष्ट्र सागरी मंडळ अव्वल

-मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्याकडून अभिनंदन

  • 200 पैकी 198.75 गुण मिळवत राज्यात प्रथम क्रमांकाची कामगिरी

मुंबईदि. 26  : राज्याच्या 150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स कार्यक्रमा अंतर्गत राज्यातील एकूण 97 शासकीय संस्थामंडळे व कंपन्यांचे मूल्यमापन करण्यात आले. त्यामध्ये महाराष्ट्र सागरी मंडळ (MMB) यांनी उत्कृष्ट कामगिरी करत सामान्यीकृत 200 गुणांपैकी 198.75 गुण मिळवून राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.

प्रशासन अधिक पारदर्शकगतिमान आणि नागरिकाभिमुख करण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेला 150 दिवसांचा ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रम राज्यातील डिजिटल परिवर्तनाच्या दिशेने एक महत्त्वाकांक्षी पाऊल ठरत आहे.

या कार्यक्रमा अंतर्गत महाराष्ट्र सागरी मंडळाने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजेराज्यातील सर्व प्रवर्गांमध्ये (Generalised Categories) महाराष्ट्र सागरी मंडळाने ही सर्वोच्च कामगिरी नोंदवली आहे. ई-गव्हर्नन्सच्या माध्यमातून कागदविरहित प्रशासनवेळबद्ध सेवापारदर्शक निर्णयप्रक्रिया आणि तंत्रज्ञानाधिष्ठित कार्यपद्धती यांची प्रभावी अंमलबजावणी केल्यामुळे हे यश मिळाले आहे.

150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स या कार्यक्रमाअंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करत राज्यात प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल बंदरे मंत्री  नितेश राणे यांनी महाराष्ट्र सागरी मंडळ व विभागात उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.


सन 1937 मध्ये निर्मित ऐतिहासिक ‘टर्न टेबल शिडी वाहना’चे मुंबई अग्निशमन दलाकडून पुनर्जतन

 सन 1937 मध्ये निर्मित ऐतिहासिक टर्न टेबल शिडी वाहनाचे

मुंबई अग्निशमन दलाकडून पुनर्जतन

टर्न टेबल शिडी’ असलेल्या या ऐतिहासिक अग्निशमन वाहनाची सन १९३७ मध्ये इंग्लंडमधील लेलँड (Leyland) कंपनीत निर्मिती करण्यात आली. तरदि. २४ सप्टेंबर १९४१ रोजी मुंबई अग्निशमन दलाच्या ताफ्यात ते समाविष्ट करण्यात आले. तत्कालिन उंच इमारतीगोदामे तसेच बंदर परिसरातील उंच भागांपर्यंत पोहोचण्यासाठी ही अत्याधुनिक शिडी मानली जायची. ही शिडी पूर्णत: लोखंडी संरचनेत तयार करण्यात आली होती. ती हातानेसाध्या यांत्रिक पद्धतीने फिरवता यायची.

दि. १४ एप्रिल १९४४ रोजी मुंबई बंदरात (मुंबई डॉक) उभ्या असलेल्या एस. एस. फोर्ट स्टिकिन या मालवाहू जहाजाला आग लागली होती. दारुगोळास्फोटकेइंधन आणि युद्धसामग्रीने हे जहाज भरलेले होते. त्यामुळेजहाजावरील आगीने रौद्ररूप धारण केले. अशा भीषण परिस्थितीत मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांनी टर्न टेबल शिडी’ असलेल्या वाहनाच्या सहाय्याने बचावकार्य हाती घेतले. बंदरावरील उंच गोदामांतील आग विझवण्यासाठी तिथपर्यंत पोहोचणेजहाजाच्या आसपास अडकलेल्यांना वाचवणे तसेच जखमींना खाली उतरवणे आदी शर्थीची कामे या वाहनाच्या मदतीने अविरत सुरू होती. या दुर्घटनेत अनेक लोक मृत्युमुखी पडले. मात्रमुंबई अग्निशमन दलाच्या जवानांच्या आटोकाट प्रयत्नांमुळे अनेकांचे प्राणही वाचले.

व्हिंटेज ‘टर्न टेबल शिडी’ वाहनाचे अग्निशमन सेवेतील पुनरागमन गौरवास्पद

 व्हिंटेज टर्न टेबल शिडी’ वाहनाचे

अग्निशमन सेवेतील पुनरागमन गौरवास्पद

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

·         बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालय येथे अनावरण

मुंबई दि २६:- ऐतिहासिक वारसा लाभलेले १९३७ मधील टर्न टेबल शिडी अग्निशमन वाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशमन दल सेवेत पुन्हा दाखल होत आहे ही बाब मुंबईकरांसाठी गौरवास्पद असल्याचे उद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.

बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालय येथे 'टर्न टेबल शिडीअग्निशमन वाहनाचे  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण झाले.

यावेळी बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक  भूषण गगराणीअतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ.  अश्विनी जोशीमुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख अग्निशमन अधिकारी रवींद्र आंबुलगेकरउद्योजक  गौतम सिंघानिया व मान्यवर उपस्थित होते.

प्रखर देशप्रेम, शिस्त आणि एकात्मतेची भावना बळकट व्हावी या उद्देशाने हा उपक्रम राज्यभर एकाच वेळी, सुनियोजित आणि नियोजनबद्ध

 या उपक्रमाच्या यशस्वितेबद्दल समाधान व्यक्त करुन शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे म्हणाले, 'राष्ट्र प्रथमहा संस्कार विद्यार्थ्यांच्या मनात रुजावात्यांच्यामध्ये प्रखर देशप्रेमशिस्त आणि एकात्मतेची भावना बळकट व्हावी या उद्देशाने हा उपक्रम राज्यभर एकाच वेळीसुनियोजित आणि नियोजनबद्ध पद्धतीने राबविण्यात आला. सर्व जिल्हेतालुका व शाळा स्तरांवर या कार्यक्रमाचे प्रभावी नियोजन करण्यात आले होते. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी समाजातील विविध सेवाभावी संस्थाजिल्हा प्रशासनआरोग्यपोलीसअग्निशमन विभागांसह शिक्षणप्रेमींचे मोलाचे सहकार्य लाभले. त्यांच्या सक्रिय सहभागामुळे हा उपक्रम सुरक्षितशिस्तबद्ध आणि प्रेरणादायी पद्धतीने पार पडला. 'राष्ट्र प्रथमया उपक्रमाने केवळ विश्वविक्रम प्रस्थापित केला नाहीतर भावी पिढीच्या मनात प्रखर राष्ट्रभक्तीचे बीज रोवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. दर शनिवारी देशभक्तीपर गीतांवर सामूहिक कवायत हा उपक्रम सर्व माध्यमांच्यासर्व व्यवस्थापनाच्या व सर्व भाषिक शाळांमध्ये होईलअसेही त्यांनी सांगितले. 

 

शालेय शिक्षण विभागामार्फत १४ मिनिटांचा मार्गदर्शक व्हिडीओ राज्यातील सर्व शाळांना उपलब्ध

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतून शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या मार्गदर्शनाखाली मागील काही महिन्यांपासून विद्यार्थ्यांचा कवायत संचलनाचा सराव सुरू होता. यासाठी शालेय शिक्षण विभागामार्फत १४ मिनिटांचा मार्गदर्शक व्हिडीओ राज्यातील सर्व शाळांना उपलब्ध करून देण्यात आला होता.  सर्व विद्यार्थ्यांनी एकाच वेळी सुंदर व शिस्तबद्ध कवायत सादर केली. यासोबतच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जिल्हास्तरावर राबविण्यात आलेल्या उपक्रमाच्या अनुषंगाने एशिया बूक ऑफ रेकॉर्डस् (Asia Book of Records) आणि इंडिया बूक ऑफ रेकॉर्डस् (India Book of Records) या दोन मान्यवर संस्थांकडूनही स्वतंत्र विश्वविक्रमांची नोंद करण्यात आली आहे.

Featured post

Lakshvedhi