या उपक्रमाच्या यशस्वितेबद्दल समाधान व्यक्त करुन शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे म्हणाले, 'राष्ट्र प्रथम' हा संस्कार विद्यार्थ्यांच्या मनात रुजावा, त्यांच्यामध्ये प्रखर देशप्रेम, शिस्त आणि एकात्मतेची भावना बळकट व्हावी या उद्देशाने हा उपक्रम राज्यभर एकाच वेळी, सुनियोजित आणि नियोजनबद्ध पद्धतीने राबविण्यात आला. सर्व जिल्हे, तालुका व शाळा स्तरांवर या कार्यक्रमाचे प्रभावी नियोजन करण्यात आले होते. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी समाजातील विविध सेवाभावी संस्था, जिल्हा प्रशासन, आरोग्य, पोलीस, अग्निशमन विभागांसह शिक्षणप्रेमींचे मोलाचे सहकार्य लाभले. त्यांच्या सक्रिय सहभागामुळे हा उपक्रम सुरक्षित, शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी पद्धतीने पार पडला. 'राष्ट्र प्रथम' या उपक्रमाने केवळ विश्वविक्रम प्रस्थापित केला नाही, तर भावी पिढीच्या मनात प्रखर राष्ट्रभक्तीचे बीज रोवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. दर शनिवारी देशभक्तीपर गीतांवर सामूहिक कवायत हा उपक्रम सर्व माध्यमांच्या, सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व भाषिक शाळांमध्ये होईल, असेही त्यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment