Thursday, 22 January 2026

रेडिओ क्लब जेट्टीच्या कामाला वेग द्या मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

 रेडिओ क्लब जेट्टीच्या कामाला वेग द्या

मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

 

मुंबईदि. 21 : बॉम्बे प्रेसिडेन्सी रेडिओ क्लबनजीक असलेल्या जेट्टीचे काम निविदेतील कालमर्यादेत करण्यात यावे. जेट्टीचे काम विहीत कालावधीत पूर्ण होऊन नागरिकांसाठी वॉटर टॅक्सी सेवेत आणण्यासाठी या कामाला वेग द्यावाअसे निर्देश मत्सव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी रेडिओ क्लब जेट्टीच्या कामाबाबत मंत्रालयात आयोजित बैठकीत दिले.

 

            बैठकीस महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. प्रदीपमुख्य प्रशासकीय अधिकारी प्रदीप बढीयेउपजिल्हाधिकारी अंजली भोसलेमुख्य बंदरे अधिकारी खराह आदी उपस्थित होते.

 

            रेडिओ जेट्टीचे काम पूर्ण झाल्यानंतर येथून नवी मुंबईसाठी वॉटर टॅक्सी सेवा सुरू करावयाची आहे. त्यादृष्टीने या प्रकल्पाचे काम कुठल्याही प्रकारे रखडता कामा नये. जेट्टीच्या कामात 25 फेब्रुवारीपर्यंत गती न दिसल्यास कंत्राटदारावर कारवाई करावी. निविदेत दिलेल्या कालावधीत जेट्टीचे काम पूर्ण करण्यात यावे. या कामाचा प्रत्येक आठवड्यात प्रगती अहवाल सादर करावाअसे निर्देशही मंत्री नितेश राणे यांनी दिले.

 

            रेडिओ क्लब जेट्टीचे काम पूर्ण झाल्यानंतर या भागातून नवीन जलमार्ग विकसित होतील. त्यामुळे नागरिकांना अधिक जलमार्गाचा पर्याय देऊन नवी मुंबईला थेट जोडणी देता येईल. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे जाणाऱ्या प्रवाशांसाठी आणि तेथून दक्षिण मुंबईत येणाऱ्या प्रवाशांसाठी सोयीचे होईलअसेही बंदरे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.

गडचिरोली जिल्ह्यात टसर रेशीम कोष बाजारपेठ उभारणीस मान्यता

 गडचिरोली जिल्ह्यात टसर रेशीम कोष बाजारपेठ उभारणीस मान्यता

मुंबईदि. २१ : राज्यातील टसर रेशीम उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पादनास योग्य व हमखास दर मिळावातसेच पूर्व विदर्भातील टसर रेशीम मूल्यसाखळी अधिक बळकट व्हावीया उद्देशाने गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी येथे शासकीय टसर रेशीम कोष बाजारपेठ उभारण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण २०२३२८ अंतर्गत हा निर्णय घेण्यात आला असूनया प्रकल्पासाठी ₹३.८८ कोटी इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे. या आधुनिक टसर रेशीम कोष बाजारपेठेमुळे रेशीम शेतकऱ्यांना खुल्या व पारदर्शक बाजारात विक्रीची सुविधा उपलब्ध होणार असूनकोषांना योग्य व स्पर्धात्मक दर मिळणार आहे.

या माध्यमातून टसर रेशीम उत्पादनसाठवणलिलाव व विपणनासाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण होणार आहेत. तसेच स्थानिक स्तरावर रोजगारनिर्मिती होऊन ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे. या बाजारपेठेसाठी प्रशासकीय इमारतपाणीपुरवठास्वच्छता व्यवस्थाविद्युतीकरणदिव्यांगांसाठी सुलभ सुविधाअंतर्गत रस्ते व निचरा व्यवस्था आदी सर्व आवश्यक घटकांचा समावेश करण्यात आला आहे.

या प्रकल्पाची अंमलबजावणी रेशीम संचालनालयामार्फत करण्यात येणार असूनकेंद्र सरकारच्या केंद्रीय रेशीम मंडळ यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कार्यवाही केली जाणार आहे. हा उपक्रम टसर रेशीम शेतकऱ्यांसाठी आर्थिक स्थैर्यबाजारातील विश्वास व शाश्वत उत्पन्नाचा मजबूत आधार ठरणार आहे. याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

माजी सैनिक, सैनिक पत्नी व पाल्यांसाठी मेस्को सिक्युरिटीमध्ये भरतीक्षेत्रीय व्यवस्थापक (९९९०३१२३१२), सुरक्षा अधिकारी (७४२०००२८३१) कार्यालयीन दूरध्वनी (९४६६८१९८८७)

 माजी सैनिक, सैनिक पत्नी व पाल्यांसाठी मेस्को सिक्युरिटीमध्ये भरती

मुंबई,दि.२१: माजी सैनिक, वीर नारी तसेच सेवानिवृत्त व सेवेतील जवानांच्या पत्नी आणि अवलंबित पाल्यांसाठी मेस्को सिक्युरिटीकडून सुरक्षा रक्षक पदासाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही भरती कंत्राटी सेवा पद्धतीवर असून, उमेदवारांना त्यांच्या राहत्या घरापासून १० ते १५ किलोमीटर अंतरावर कामाचे ठिकाण देण्यात येणार आहे अशी माहिती मुंबई शहरचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.         

        कंत्राटी सेवा पद्धतीवर  सुरक्षा रक्षक भरण्यात येणार आहे. या पदासाठी दररोज ८ तास कामआठवड्यातून १ साप्ताहिक सुट्टीपीएफ ईएसआय अंतर्गत जीवन विमा सुविधा, बोनस व ग्रॅच्युइटी या सुविधा आहेत. या पदासाठी एक्स सर्व्हिसमन, आर्मी, नेव्ही व एअर फोर्स साठी ३५ ते ५८ वर्षेसीआरपीएफएसआरपीएफ, बीएसएफसीआयएसएफआयटीबीपी,  होमगार्ड  यासाठी ३५ ते ५५ वर्षे वयोमर्यादामाजी सैनिकांच्या (ईएसएम) वीर नारी : १८ ते ४५ वर्षेमाजी सैनिकांच्या (ईएसएम) वीर पत्नी  १८ ते ४५ वर्षेमाजी सैनिकांच्या (ईएसएम) वीर पाल्य ईएसएम पाल्य : २१ ते ३५ वर्षे ही वयोमर्यादा आहे.

           या पदासाठी आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड,पॅन कार्डबँक पासबुक (स्वतःचे व वारसाचे)डिर्स्चाज बुकपीपीओएक्स सर्व्हिसमन आयडी (सेवानिवृत्त जवानांसाठी)मेस्को कोर्स सर्टिफिकेट (वीर नारी, सेवानिवृत्त व सेवेतील जवानांच्या पत्नी व पाल्यांसाठी) मेस्को सिक्युरिटीद्वारे राबविण्यात येणारी ही भरती प्रक्रिया माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांसाठी आर्थिक स्थैर्य आणि सुरक्षित भविष्याची दिशा देणारी ठरणार आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहन मुंबई शहर जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

संपर्कासाठी क्रमांक:- क्षेत्रीय व्यवस्थापक (९९९०३१२३१२)सुरक्षा अधिकारी (७४२०००२८३१) कार्यालयीन दूरध्वनी (९४६६८१९८८७)

0000

राष्ट्रीय शालेय बँड स्पर्धेच्या अंतिम फेरीत महाराष्ट्रातील संजीवनी सैनिक स्कूल आणि डॉन बॉस्को हायस्कूलची निवड

 राष्ट्रीय शालेय बँड स्पर्धेच्या अंतिम फेरीत महाराष्ट्रातील संजीवनी सैनिक स्कूल आणि डॉन बॉस्को हायस्कूलची निवड

 

नवी दिल्ली,२१: प्रजासत्ताक दिन सोहळा २०२६ चे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या 'राष्ट्रीय शालेय बँड स्पर्धे'च्या विभागीय स्तरावरील फेऱ्यांची यशस्वी सांगता झाली असून, महाराष्ट्रातील दोन शाळांनी या स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवून राज्याचा गौरव वाढवला आहे. पश्चिम विभागातून  महाराष्ट्राच्या संजीवनी सैनिक स्कूल आणि ज्युनियर कॉलेज, कोपरगाव (अहिल्यानगर) या शाळेच्या मुलांच्या ब्रास बँड पथकाने आणि डॉन बॉस्को हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज, विक्रोळी (मुंबई) या शाळेच्या मुलींच्या ब्रास बँड पथकाने अंतिम फेरीत धडक मारली आहे.

 

 संरक्षण मंत्रालय आणि शिक्षण मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने २४ जानेवारी २०२६ रोजी नवी दिल्लीतील राष्ट्रीय बालभवन येथे या स्पर्धेची अंतिम फेरी पार पडणार आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून देशातील शालेय विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, शिस्त आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना वृद्धिंगत करण्याचा उद्देश केंद्र सरकारद्वारे निश्चित करण्यात आला आहे.

 

यंदाच्या स्पर्धेत राज्यस्तरावर देशभरातील ७६३ शाळांनी सहभाग नोंदवला होता. त्यापैकी विभागीय स्तरावर ३० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील ८० पथकांनी, ज्यामध्ये २,२१७ विद्यार्थ्यांचा समावेश होता, आपली कला सादर केली. कडक निकषांनंतर आता अंतिम फेरीसाठी देशभरातून एकूण १६ उत्कृष्ट पथकांची निवड करण्यात आली आहे.

 

अंतिम फेरीचे मूल्यांकन करण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने त्रिसदस्यीय तज्ज्ञ समितीची नियुक्ती केली आहे. यामध्ये भारतीय भूदल, नौदल आणि वायुदल या तिन्ही दलांच्या प्रतिनिधींचा समावेश असेल.

 

प्रत्येक श्रेणीतील विजेत्यांना प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकासाठी अनुक्रमे ५१,००० रुपये, ३१,००० रुपये आणि २१,००० रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र प्रदान केले जाईल. तसेच, उर्वरित सहभागी संघांना ११,००० रुपयांचे उत्तेजनार्थ पारितोषिक दिले जाणार आहे.

 

0000

मुंबई व पुणे विद्यापीठांमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारण्याबाबत बैठक

 मुंबई व पुणे विद्यापीठांमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांसाठी

वसतिगृह उभारण्याबाबत बैठक

 

मुंबईदि. २१ : राज्यातील अनेक आदिवासी विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी दुर्गम भागातून मुंबईपुणे यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये येतात. या विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक परिसरात राहण्याची सोय व्हावी यासाठी मुंबई व पुणे विद्यापीठाच्या परिसरात वसतिगृह उभारण्यासंदर्भात आढावा बैठक आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

 

बैठकीस मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णीपुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, ठाणे अप्पर आयुक्त गोपीचंद कदमसहसचिव मच्छिंद्र शेळकेमुख्य अभियंता उज्वल डाबे उपस्थित होते.

 

आदिवासी विकास मंत्री डॉ. वुईके म्हणालेआदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी लागणाऱ्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आदिवासी विकास विभाग नेहमीच प्रयत्नशील असतो. अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी आपला जिल्हा सोडून इतर जिल्ह्यात जात असतात. या वसतीगृहांचा लाभ केवळ विद्यापीठातीलच नव्हे तर विद्यापीठाशी संलग्न विविध महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांनाही मिळणार आहे. त्यामुळे एकाच ठिकाणी अनेक विद्यार्थ्यांना सुरक्षित व परवडणाऱ्या निवासाची सोय उपलब्ध होणार आहे. आगामी काळात राज्यातील इतर प्रमुख विद्यापीठांच्या परिसरातही अशाच प्रकारच्या वसतीगृह सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आदिवासी समाजाचा इतिहास आणि संस्कृती पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रमुख विद्यापीठामध्ये आदिवासी अध्ययन व संशोधन केंद्र सुरू करण्यासंदर्भातील प्रस्ताव असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.

प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता देण्याच्या प्रक्रियेत सुसूत्रता आणावी

 प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता देण्याच्या प्रक्रियेत सुसूत्रता आणावी

-मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

मुंबईदि. २१ : राज्यातील १५ कोटी रुपयांपर्यंतच्या विकास प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता देण्याच्या प्रक्रियेत अधिक सुसूत्रता आणि गती आणावीअसे निर्देश मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी मंत्रालयात आयोजित बैठकीत दिले. 

वित्त विभागाच्या २० सप्टेंबर २०१९ च्या शासन निर्णयानुसार (GR) विहित करण्यात आलेल्या कार्यपद्धतीचा बैठकीत सविस्तर आढावा घेण्यात आला.

प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता देताना येणारे तांत्रिक अडथळे दूर करून कामांना गती देण्याचे निर्देश देत बंदरे मंत्री राणे म्हणाले२०१९ च्या शासन निर्णयातील तरतुदींची अंमलबजावणी प्रभावीपणे होत आहे की नाहीयाची पडताळणी करण्यात यावी. विविध विभागांमधील तांत्रिक आणि प्रशासकीय समन्वय वाढविण्यात यावा. याद्वारे १५ कोटींपर्यंतच्या लहान व मध्यम स्वरूपाच्या प्रकल्पांना मंजुरी मिळण्याचा मार्ग अधिक सुकर होऊन विकासकामांना वेग मिळेलअसेही बंदरे मंत्री राणे यांनी सांगितले.

बैठकीस वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव विवेक दहिफळेउपसचिव ठाकूरमहाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श पी. प्रदीप यांच्यासह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

0000

निलेश तायडे/विसंअ

 

 


राष्ट्रध्वज लावण्याच्या योग्य पद्धतीबाबत शासन परिपत्रक

 राष्ट्रध्वज लावण्याच्या योग्य पद्धतीबाबत शासन परिपत्रक क्रमांक एफएलजी-1091/30दिनांक 2 मार्च 1991 तसेच क्रमांक एफएलजी- 1091(2)/30दिनांक 5 डिसेंबर 1991 तसेच क्रमांक एफएलजी 1098/ ध्वजसंहिता/30दिनांक 11 मार्च 1998 अन्वये दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याची दक्षता घेण्यात यावी. याप्रसंगी सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी उपस्थित रहावे. तसेच उत्सव अथवा औपचारिक प्रसंगी परिधान करावयाचा राष्ट्रीय पोशाख प्रजासत्ताक दिन समारंभप्रसंगी उपस्थित राहणाऱ्या सर्व अधिकारीकर्मचारी व व्यक्तींनी परिधान करावा. स्थानिक लोकप्रतिनिधीस्वातंत्र्यसैनिकशहीद जवानांच्या पत्नींना व आई-वडील यांना तसेच आणिबाणीच्या कालावधीमध्ये कारावास भोगलेल्या व्यक्ती यांना समारंभास निमंत्रित करावे. अधिकाधिक नागरिकांना हा सोहळा घरबसल्या पाहता यावायासाठी वेबसाईटद्वारे थेट प्रक्षेपण करण्याचा प्रयत्न करावाअशा सूचना या परिपत्रकाद्वारे देण्यात आल्या आहेत.

०००००

Featured post

Lakshvedhi