माजी सैनिक, सैनिक पत्नी व पाल्यांसाठी मेस्को सिक्युरिटीमध्ये भरती
मुंबई,दि.२१: माजी सैनिक, वीर नारी तसेच सेवानिवृत्त व सेवेतील जवानांच्या पत्नी आणि अवलंबित पाल्यांसाठी मेस्को सिक्युरिटीकडून सुरक्षा रक्षक पदासाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही भरती कंत्राटी सेवा पद्धतीवर असून, उमेदवारांना त्यांच्या राहत्या घरापासून १० ते १५ किलोमीटर अंतरावर कामाचे ठिकाण देण्यात येणार आहे अशी माहिती मुंबई शहरचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.
कंत्राटी सेवा पद्धतीवर सुरक्षा रक्षक भरण्यात येणार आहे. या पदासाठी दररोज ८ तास काम, आठवड्यातून १ साप्ताहिक सुट्टी, पीएफ ईएसआय अंतर्गत जीवन विमा सुविधा, बोनस व ग्रॅच्युइटी या सुविधा आहेत. या पदासाठी एक्स सर्व्हिसमन, आर्मी, नेव्ही व एअर फोर्स साठी ३५ ते ५८ वर्षे, सीआरपीएफ, एसआरपीएफ, बीएसएफ, सीआयएसएफ, आयटीबीपी, होमगार्ड यासाठी ३५ ते ५५ वर्षे वयोमर्यादा, माजी सैनिकांच्या (ईएसएम) वीर नारी : १८ ते ४५ वर्षे, माजी सैनिकांच्या (ईएसएम) वीर पत्नी १८ ते ४५ वर्षे, माजी सैनिकांच्या (ईएसएम) वीर पाल्य ईएसएम पाल्य : २१ ते ३५ वर्षे ही वयोमर्यादा आहे.
या पदासाठी आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड,पॅन कार्ड, बँक पासबुक (स्वतःचे व वारसाचे), डिर्स्चाज बुक, पीपीओ, एक्स सर्व्हिसमन आयडी (सेवानिवृत्त जवानांसाठी), मेस्को कोर्स सर्टिफिकेट (वीर नारी, सेवानिवृत्त व सेवेतील जवानांच्या पत्नी व पाल्यांसाठी) मेस्को सिक्युरिटीद्वारे राबविण्यात येणारी ही भरती प्रक्रिया माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांसाठी आर्थिक स्थैर्य आणि सुरक्षित भविष्याची दिशा देणारी ठरणार आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहन मुंबई शहर जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.
संपर्कासाठी क्रमांक:- क्षेत्रीय व्यवस्थापक (९९९०३१२३१२), सुरक्षा अधिकारी (७४२०००२८३१) कार्यालयीन दूरध्वनी (९४६६८१९८८७)
0000
No comments:
Post a Comment