Thursday, 22 January 2026

गडचिरोली जिल्ह्यात टसर रेशीम कोष बाजारपेठ उभारणीस मान्यता

 गडचिरोली जिल्ह्यात टसर रेशीम कोष बाजारपेठ उभारणीस मान्यता

मुंबईदि. २१ : राज्यातील टसर रेशीम उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पादनास योग्य व हमखास दर मिळावातसेच पूर्व विदर्भातील टसर रेशीम मूल्यसाखळी अधिक बळकट व्हावीया उद्देशाने गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी येथे शासकीय टसर रेशीम कोष बाजारपेठ उभारण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण २०२३२८ अंतर्गत हा निर्णय घेण्यात आला असूनया प्रकल्पासाठी ₹३.८८ कोटी इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे. या आधुनिक टसर रेशीम कोष बाजारपेठेमुळे रेशीम शेतकऱ्यांना खुल्या व पारदर्शक बाजारात विक्रीची सुविधा उपलब्ध होणार असूनकोषांना योग्य व स्पर्धात्मक दर मिळणार आहे.

या माध्यमातून टसर रेशीम उत्पादनसाठवणलिलाव व विपणनासाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण होणार आहेत. तसेच स्थानिक स्तरावर रोजगारनिर्मिती होऊन ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे. या बाजारपेठेसाठी प्रशासकीय इमारतपाणीपुरवठास्वच्छता व्यवस्थाविद्युतीकरणदिव्यांगांसाठी सुलभ सुविधाअंतर्गत रस्ते व निचरा व्यवस्था आदी सर्व आवश्यक घटकांचा समावेश करण्यात आला आहे.

या प्रकल्पाची अंमलबजावणी रेशीम संचालनालयामार्फत करण्यात येणार असूनकेंद्र सरकारच्या केंद्रीय रेशीम मंडळ यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कार्यवाही केली जाणार आहे. हा उपक्रम टसर रेशीम शेतकऱ्यांसाठी आर्थिक स्थैर्यबाजारातील विश्वास व शाश्वत उत्पन्नाचा मजबूत आधार ठरणार आहे. याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi