Thursday, 22 January 2026

हिंद-दी-चादर’ शहीदी समागमासाठी नांदेडमध्ये आरोग्य यंत्रणा सज्ज १० लाखांहून अधिक भाविकांसाठी ५ दिवस व्यापक वैद्यकीय सेवा

 हिंद-दी-चादर’ शहीदी समागमासाठी नांदेडमध्ये आरोग्य यंत्रणा सज्ज

  • १० लाखांहून अधिक भाविकांसाठी ५ दिवस व्यापक वैद्यकीय सेवा

 

नांदेडदि. २१: शीख धर्माचे नववे गुरु श्री गुरु तेग बहादुर यांच्या ३५० व्या शहीदी समागम- हिंद-दी-चादर शताब्दी कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यातील संपूर्ण आरोग्य यंत्रणा सज्ज झाली असूनलाखो भाविकांच्या आरोग्य सुरक्षेसाठी अत्यंत काटेकोरबहुस्तरीय व समन्वयित वैद्यकीय व्यवस्थापन उभारण्यात आले आहे.

 

२४ व २५  जानेवारी २०२६ रोजी नांदेड शहरात होणाऱ्या मुख्य सोहळ्यासाठी राज्यभरासह देशाच्या विविध भागांतून १० लाखांपेक्षा अधिक भाविक सहभागी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर २२ ते २६ जानेवारी २०२६ या पाच दिवसांच्या कालावधीत अखंड आरोग्य सेवा उपलब्ध असणार आहे.

जब अन्याय के खिलाफ सभी प्रयास किये गये हो,

 जब अन्याय के खिलाफ सभी प्रयास किये गये होन्याय का मार्ग अवरुद्ध होतब तलवार उठाना सही है" (जेव्हा अन्यायाचा प्रतिकार करण्याचे शांततेचे सर्व मार्ग बंद होताततेव्हा हाती तलवार घेणे हेच उचित व धर्मसंमत ठरते). विशेष म्हणजेभाई दया सिंगजींनी हे पत्र दिल्यावर खुद्द औरंगजेबाने त्याचा सकारात्मक स्वीकार केला होता व गुरूजींना सन्मानाने भेटीसाठी आमंत्रित करणारे शाही पत्र जारी केले होतेअशी साक्ष येथील इतिहास देतो.

 

भाई दया सिंगजींच्या चरणस्पर्शाने पावन झालेली ही भूमी शीख समाजासाठी अत्यंत पवित्र असूनती एका ऐतिहासिक पर्वाची साक्ष देत उभी आहे. हे स्थान केवळ धार्मिक श्रद्धेचे केंद्र नसूनभारतीय इतिहासातील एका महत्त्वाच्या कालखंडाचे व गुरु गोविंदसिंगजींच्या सर्वोच्च नीतिमत्तेचे प्रतीक आहे. हा अमूल्य ऐतिहासिक वारसा भावी पिढ्यांसाठी नक्कीच प्रेरणास्त्रोत ठरेल.

याच पवित्र भूमीवर, भाई दया सिंगजींच्या चरणांनी पावन झालेल्या जागेचा विकास अहिल्यानगर येथील शीख

 याच पवित्र भूमीवरभाई दया सिंगजींच्या चरणांनी पावन झालेल्या जागेचा विकास अहिल्यानगर येथील शीख समाजाने श्रद्धेने व स्वखर्चाने केला. आज ती जागा गुरुद्वारा भाई दया सिंगजी साहिबगोविंदपुराअहिल्यानगर म्हणून ओळखली जाते.

 

गुरु गोविंदसिंगजींनी हे पत्र मूळ पर्शियन (फारसी) भाषेत लिहिले असून त्यात एकूण १११ कडवी (शेर) आहेत.'झफरनामाम्हणजे केवळ एक पत्र नसून ती अन्यायाविरुद्ध पुकारलेली नैतिक विजयाची ललकारी होती. या पत्रात गुरूजींनी चमकौरचे युद्धआपल्या पुत्रांचे बलिदान व औरंगजेबाच्या सैन्याने पवित्र कुराण पाठवुन दिलेले शब्द न पाळता केलेला विश्वासघातयावर कठोर शब्दांत ताशेरे ओढले आहेत. याच पत्रात शीख इतिहासातील प्रसिद्ध ओळ नमूद आहे - कुन् कर अझ हमेह् हील्-ते दार गुज़श्त,

हलाल अस्त बुर्दन बा शमशेर दस्त ||२२||


अहिल्यानगर येथील 'गुरुद्वारा भाई दया सिंगजी' शीख इतिहासातील 'झफरनामा' या महत्त्वपूर्ण अध्यायाचा साक्षीदार !

 अहिल्यानगर येथील 'गुरुद्वारा भाई दया सिंगजीशीख इतिहासातील 'झफरनामाया महत्त्वपूर्ण अध्यायाचा साक्षीदार !

 

अहिल्यानगरदि. २१ - नांदेड येथे 'हिंद दी चादरश्री गुरू तेग बहादुर यांच्या ३५० व्या शहीदी समागम पर्वाच्या ऐतिहासिक सोहळ्याची जय्यत तयारी सुरू असतानाचमहाराष्ट्राच्या ऐतिहासिक वारशात मोलाची भर घालणाऱ्या अहिल्यानगर शहराला लाभलेल्या शीख इतिहासाच्या एका अत्यंत महत्वपूर्ण पर्वावर प्रकाश टाकणे क्रमप्राप्त ठरते. गोविंदपुरा येथील 'गुरुद्वारा भाई दया सिंगजीहे स्थान शीख इतिहासातील 'झफरनामाया निर्णायक घटनेचा थेट साक्षीदार मानले जाते.

 

इतिहासाच्या पानांवर कोरलेली ही महत्त्वपूर्ण घटना १८ व्या शतकाच्या सुरुवातीची (सन १७०५-०६) आहे. शीख धर्माचे दहावे गुरुश्री गुरु गोविंदसिंगजी महाराज यांनी स्वतःच्या वडिलांचे व पुत्रांचे मारेकरी ठरलेल्या  तत्कालीन मुघल बादशहा औरंगजेब याला एक अत्यंत महत्त्वपूर्ण पत्र पाठविले होतेजे इतिहासात 'झफरनामा' (विजयाचे पत्र) म्हणून ओळखले जाते. हे ऐतिहासिक पत्र औरंगजेबापर्यंत पोहोचविण्याची अत्यंत महत्त्वाची व जोखमीची जबाबदारी गुरु गोविंदसिंगजींनी 'पंच प्याऱ्यांपैकी एक असलेल्या 'भाई दया सिंगजीयांच्यावर सोपविली होती

Wednesday, 21 January 2026

भारत निवडणूक आयोगाच्या वतीने आंतरराष्ट्रीय लोकशाही व निवडणूक व्यवस्थापन परिषद

 भारत निवडणूक आयोगाच्या वतीने आंतरराष्ट्रीय लोकशाही व निवडणूक व्यवस्थापन परिषद

 

मुंबईदि. २१ : नवी दिल्ली येथे २३ जानेवारीपासून आंतरराष्ट्रीय लोकशाही व निवडणूक व्यवस्थापन परिषद (आयआयसीडीईएमसुरू झाली आहे. या परिषदेसाठी जगभरातील आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींचे आगमन झाले असून३२ देशांतील ७१ प्रतिनिधी नवी दिल्लीमध्ये दाखल झाले आहेत.

ही तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद २१ ते २३ जानेवारी २०२६ दरम्यान भारत मंडपमनवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली आहे. परिषदेचा आरंभ मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या हस्ते शिष्टमंडळ प्रमुखांच्या औपचारिक स्वागताने होत असूनयावेळी निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंग संधू आणि डॉ. विवेक जोशी उपस्थित असतील.

या परिषदेत ७०हून अधिक देशांतील १०० आंतरराष्ट्रीय प्रतिनिधीविविध आंतरराष्ट्रीय संस्थांचे प्रतिनिधीभारतातील परदेशी मिशन्स तसेच निवडणूक क्षेत्रातील शैक्षणिक आणि कार्यरत तज्ज्ञ सहभागी झाले आहेत. लोकशाहीनिवडणूक व्यवस्थापनआंतरराष्ट्रीय निवडणूक मानकेतसेच निवडणूक प्रक्रियेतील नवकल्पना आणि उत्तम पद्धती यावर सखोल चर्चा होणार आहे.

परिषदेदरम्यान उद्घाटन सत्रइलेक्शन मॅनेजमेंट बॉडी (ईएमबी) लीडर्स प्लेनरीकार्यगट बैठका तसेच विविध विषयांवरील सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. ३६ विषयक गटांमध्ये राज्ये व केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य निवडणूक अधिकारी नेतृत्व करणार असूनराष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय शैक्षणिक तज्ज्ञ त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. या चर्चांमध्ये ४ आयआयटी६ आयआयएम१२ राष्ट्रीय विधी विद्यापीठे (एनएलयूआणि भारतीय जनसंचार संस्था (आयआयएमसीयांसारख्या अग्रगण्य संस्थांचा सहभाग असणार आहे.

याच वर्षी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर डेमोक्रसी अँड इलेक्टोरल असिस्टन्स’ या संस्थेच्या सदस्य राष्ट्र परिषदेचे २०२६ साठी अध्यक्षपद स्वीकारले आहे. त्या अनुषंगानेआयआयसीडीईएम-२०२६ मध्ये भारताची समावेशकशांततापूर्णसक्षम आणि शाश्वत जगासाठी लोकशाही’ ही व्यापक संकल्पना केंद्रस्थानी राहणार आहे.

आयआयसीडीईएम-२०२६ परिषदेमुळे लोकशाहीच्या भवितव्यावर आणि निवडणूक प्रशासनावर जागतिक पातळीवरील उच्चस्तरीय संवादाला नवी दिशा मिळणार असल्याचे भारत निवडणूक आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

रेडिओ क्लब जेट्टीच्या कामाला वेग द्या

 रेडिओ क्लब जेट्टीच्या कामाला वेग द्या

मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

 

मुंबईदि. 21 : बॉम्बे प्रेसिडेन्सी रेडिओ क्लबनजीक असलेल्या जेट्टीचे काम निविदेतील कालमर्यादेत करण्यात यावे. जेट्टीचे काम विहीत कालावधीत पूर्ण होऊन नागरिकांसाठी वॉटर टॅक्सी सेवेत आणण्यासाठी या कामाला वेग द्यावाअसे निर्देश मत्सव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी रेडिओ क्लब जेट्टीच्या कामाबाबत मंत्रालयात आयोजित बैठकीत दिले.

 

            बैठकीस महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. प्रदीपमुख्य प्रशासकीय अधिकारी प्रदीप बढीयेउपजिल्हाधिकारी अंजली भोसलेमुख्य बंदरे अधिकारी खराह आदी उपस्थित होते.

 

            रेडिओ जेट्टीचे काम पूर्ण झाल्यानंतर येथून नवी मुंबईसाठी वॉटर टॅक्सी सेवा सुरू करावयाची आहे. त्यादृष्टीने या प्रकल्पाचे काम कुठल्याही प्रकारे रखडता कामा नये. जेट्टीच्या कामात 25 फेब्रुवारीपर्यंत गती न दिसल्यास कंत्राटदारावर कारवाई करावी. निविदेत दिलेल्या कालावधीत जेट्टीचे काम पूर्ण करण्यात यावे. या कामाचा प्रत्येक आठवड्यात प्रगती अहवाल सादर करावाअसे निर्देशही मंत्री नितेश राणे यांनी दिले.

 

            रेडिओ क्लब जेट्टीचे काम पूर्ण झाल्यानंतर या भागातून नवीन जलमार्ग विकसित होतील. त्यामुळे नागरिकांना अधिक जलमार्गाचा पर्याय देऊन नवी मुंबईला थेट जोडणी देता येईल. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे जाणाऱ्या प्रवाशांसाठी आणि तेथून दक्षिण मुंबईत येणाऱ्या प्रवाशांसाठी सोयीचे होईलअसेही बंदरे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले

मत्‍स्यव्यवसाय व बंदरे विभागाचे निधीबाबत शासनाकडील अवलंबित्व

 मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे म्हणालेमत्‍स्यव्यवसाय व बंदरे विभागाचे निधीबाबत शासनाकडील अवलंबित्व कमी करण्यासाठी उत्पन्न वाढीसाठी निवडेलल्या पर्यायांवर काम करावे. याबाबत कालमर्यादा पाळत कार्यवाही पूर्ण करावी. उत्पन्न वाढीबरोबरच विभागाच्या माध्यमातून राज्याच्या विकासात भरीव योगदान द्यावे. उत्पन्नाचे स्वत:चे स्त्रोत निर्माण झाल्यास विभागाद्वारे अधिक परिणामकारक आणि पुढाकाराने विकासाची कामे करता येतील. महाराष्ट्र किनारपट्टीसाठी जाहिरात धोरणकिनारपट्टीवरील लहान बंदराच्या हद्दीत भाडेपट्टयाने द्यावयाच्या स्टॉलबाबत अधिसूचना प्रसिद्धीची कार्यवाही पूर्ण करावी.

 

समुद्र किनाऱ्यालगतचे जमीन व्यवस्थापन व जलकिनाऱ्याचा उपयोग करण्याबाबत सर्वंकषगुंतवणूकदारांना आकर्षक असणाऱ्या धोरणाची निर्मिती करावी. यासाठी जीआयएसवर आधारित पोर्टलची निर्मिती करण्यात यावी. समुद्रकिनारे लाभलेल्या अन्य राज्यांच्या धोरणनियमांचा अभ्यास करून गुंतवणूकीस सुलभ धोरण असावे. या माध्यमातून रोजगारनिर्मिती होईल. प्रथम धोरण बनवून त्यानंतर पायाभूत प्रकल्पांसाठी धोरण आणावेअसे निर्देशही मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी दिले. बैठकीला संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.  

 

Featured post

Lakshvedhi