Tuesday, 20 January 2026

अहिल्‍यानगर जिल्‍ह्यातील निळवंडे २ प्रकल्‍पाचे काम पूर्ण होऊन

 अहिल्‍यानगर जिल्‍ह्यातील निळवंडे २ प्रकल्‍पाचे काम पूर्ण होऊन यामध्‍ये पाणीसाठाही होत आहे. डाव्‍या व उजव्‍या कालव्‍यांची कामेही पूर्ण होत आहेत. प्रकल्‍पाच्‍या कालव्‍यांचे अस्‍तरीकरणाचे काम प्रगतीपथावर असूनपाण्‍याची वितरण व्‍यवस्‍था बंदिस्‍त करण्‍याचे धोरण घेण्‍यात आले असूनयासाठी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतून निधी उपलब्‍ध व्‍हावा अशीही मागणी या बैठकीत करण्‍यात आली. यासाठी २ हजार ३८ कोटी रुपयांच्‍या निधीचा प्रस्‍ताव सादर करण्‍यात आला असूननिधी उपलब्‍ध झाल्‍यास बंदिस्‍त नलिका वितरण प्रणालीव्‍दारे ६४ हजार २६० हेक्‍टर क्षेत्राचे काम जलदगतीने पूर्ण होईल असा विश्‍वासही या बैठकीत व्यक्त करण्‍यात आला.


बळीराजा जलसंजीवनी योजनेअंतर्गत कृष्‍णा व गोदावरी

 बळीराजा जलसंजीवनी योजनेअंतर्गत कृष्‍णा व गोदावरी महामंडळाच्‍या अंतर्गत सुरु असलेल्‍या प्रकल्‍पांच्‍या कामापैकी १५ प्रकल्‍प पूर्ण झाले आहेत. उर्वरित दोन प्रकल्‍प पूर्ण करण्‍याकरिता विभागाचे प्रयत्‍न असूनया दोन्‍हीही योजनांच्‍या अंतर्गत सुरु असलेल्‍या  कामांची गती वाढवून ही कामे पूर्णत्‍वास जाण्‍यासाठी सहकार्य करण्‍याची ग्‍वाही केंद्रीय मंत्री सी.आर पाटील यांनी दिली.

       मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍या नेतृत्‍वाखाली राज्‍य  दुष्‍काळमुक्‍त करण्‍याच्‍या दृष्‍टीने मोठ्या प्रमाणात नदीजोड प्रकल्‍पांची कामे हाती घेण्‍यात आली आहेत. यामध्‍ये प्राधान्‍याने दमणगंगा- एकदरे-गोदावरीदमणगंगा-वैतरणा-गोदावरीकोकण गोदावरी खोरेनळगंगा- वैनगंगापार गोदावरी या प्रकल्‍पांच्‍या कामासाठी अधिकच्‍या  निधीची गरज असूनकेंद्र सरकारने यासाठी निधी उपलब्‍ध करुन द्यावा  अशी विनंती जलसंपदा मंत्री राधाकृष्‍ण 

राज्‍यामध्‍ये सुरु असलेल्‍या सिंचन प्रकल्‍पांच्‍या कामाची माहिती

 राज्‍यामध्‍ये सुरु असलेल्‍या सिंचन प्रकल्‍पांच्‍या कामाची माहिती केंद्रीय मंत्र्यांना देण्‍यात आली.  सुरु असलेल्‍या कामाबाबत त्‍यांनी समाधानही व्‍यक्‍त केले. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत राज्‍यातील २९ प्रकल्‍पांचा समावेश करण्‍यात आला असूनयामध्‍ये कोकण पाटबंधारे विकास महामंडळअंतर्गत ५विदर्भ पाटबंधारे महामंडळा अंतर्गत ७कृष्‍णा खोरे विकास महामंडळ अंतर्गत ९ आणि गोदावरी विकास महामंडळ अंतर्गत ४ तसेच तापी पाटबंधारे विकास महामंडळ अंतर्गत ४ प्रकल्‍पांची कामे सुरु असल्‍याचे केंद्रीय मंत्र्यांच्‍या निदर्शनास आणून देण्यात आले. यापैकी कृष्‍णा व गोदावरी प्रकल्‍पाअंतर्गत सुरु असलेल्‍या  १३ प्रकल्‍पांपैकी दहा प्रकल्‍प पूर्ण झाले असल्‍याची माहिती मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी बैठकीत दिली.

नदीजोड प्रकल्‍प पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारने अर्थसहाय्य करावे - महाराष्ट्राची मागणी

 नदीजोड प्रकल्‍प पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारने अर्थसहाय्य करावे

- महाराष्ट्राची मागणी

नवी दिल्ली, दि.१९ : मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍या नेतृत्‍वाखाली महाराष्‍ट्र दुष्‍काळमुक्‍त करण्‍याकरिता राज्य सरकारने सुरु केलेल्‍या नदीजोड प्रकल्‍पाच्‍या पूर्णत्वासाठी केंद्र सरकारने अर्थसहाय्य करावे अशी विनंती राज्याच्या वतीने केंद्रीय जलशक्‍ती मंत्री सी.आर पाटील यांच्याकडे  करण्‍यात आली.

राज्‍यातील सिंचन प्रकल्‍पांचा आढावा घेण्‍यासाठी नवी दिल्‍ली  येथे  केंद्रीय जलशक्‍ती मंत्री सी.आर पाटील यांच्‍या  उपस्थितीत विशेष बैठकीचे आयोजन करण्‍यात आले. या बैठकीस  जलसंपदा मंत्री डॉ.राधाकृष्‍ण विखे पाटीलमंत्री गिरीष महाजनजलशक्‍ती विभागाचे केंद्रीय सचिव कांतारावआयुक्‍त प्रविण कुमारविभागाचे अपर मुख्‍य सचिव दिपक कपूरसचिव डॉ.संजय बेलसरे यांच्‍यासह राज्‍याच्‍या सर्व पाटबंधारे महामंडळाचे कार्यकारी संचालक आणि वरिष्‍ठ अधिकारी उपस्थित होते.

हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी : श्रद्धेचा अभिषेक,सेवेतून इतिहासाचे साक्षीदार होऊ या

 हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी : श्रद्धेचा अभिषेक

या ऐतिहासिक कार्यक्रमात हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. गुरूंच्या प्रतिकृतीवर आणि भाविकांवर होणारी ही पुष्पवृष्टी म्हणजे श्रद्धेचासन्मानाचा आणि कृतज्ञतेचा अभिषेक असेल.

सेवेतून इतिहासाचे साक्षीदार हो या

नांदेड येथे होणारा हा ३५० वा शहीदी समागम म्हणजे केवळ एक धार्मिक कार्यक्रम नसूनसेवासमानताबलिदान आणि मानवतेचा महासोहळा आहे.

हिंद-दी-चादर श्री गुरु तेगबहादूर साहिबजी यांचा संदेश आजही तितकाच जिवंत असूनतो या भव्य आयोजनातून संपूर्ण जगाला पुन्हा एकदा दिशा देणार आहे.तसेच या कार्यक्रमासाठी विविध राज्यांचे मुख्यमंत्रीबागेश्वरचे आचार्य महंत आदी उपस्थित राहणार आहे

Monday, 19 January 2026

गतका, परंपरा आणि शौर्याचे दर्शन

 गतकापरंपरा आणि शौर्याचे दर्शन

या शहीदी समागमात शीख धर्मीयांचा पारंपरिक युद्धकला प्रकार गतका’ सादर करण्यात येणार आहे. यामध्ये पारंपरिक शस्त्रांचे प्रदर्शनशौर्यशिस्त आणि युद्धकलेचे प्रात्यक्षिक पाहायला मिळणार आहे.

तसेच नऊ समाजांच्या वतीने पारंपरिक कीर्तनकथा आणि धार्मिक प्रवचनांचे आयोजन करण्यात येणार असूनत्यातून गुरूंच्या जीवनकार्याचा आणि बलिदानाचा संदेश नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे.

या सामगमासाठी दिल्ली, अमृतसरचंदीगडमुंबईहैद्राबाद येथून रेल्वे सेवा उपलब्ध  राहणार असून विशेष विमानसेवाही दोन्ही दिवस असणार आहे. तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी दहा हजार भाविकांच्या निवासासाठी सर्व सुविधायुक्त आदर्श टेन्ट सिटी उभी करण्यात येणार आहेत

जुताघर : नम्रतेचा आणि अहंकारत्यागाचा संस्कार

 जुताघर : नम्रतेचा आणि अहंकारत्यागाचा संस्कार

कार्यक्रम स्थळी ८ प्रवेशद्वारांवर ८ जताघरे उभारण्यात येणार असूनगरजेनुसार त्यांची संख्या वाढवण्यात येणार आहे. लाखो भाविकांच्या पादत्राणांची काळजी घेणे ही एक मोठी जबाबदारी असूनती सेवा अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडली जाणार आहे. ताघर सेवा म्हणजे अहंकाराचा त्याग आणि नम्रतेची साधना. गुरूच्या दरबारात प्रवेश करताना पादत्राणे बाहेर ठेवणे म्हणजे बाह्य वैभव आणि गर्व दारातच ठेवणे होय. ही सेवा माणसाला अंतर्मुख करते आणि समानतेचा खरा अर्थ शिकवते.

Featured post

Lakshvedhi