नदीजोड प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारने अर्थसहाय्य करावे
- महाराष्ट्राची मागणी
नवी दिल्ली, दि.१९ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याकरिता राज्य सरकारने सुरु केलेल्या नदीजोड प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी केंद्र सरकारने अर्थसहाय्य करावे अशी विनंती राज्याच्या वतीने केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर पाटील यांच्याकडे करण्यात आली.
राज्यातील सिंचन प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी नवी दिल्ली येथे केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर पाटील यांच्या उपस्थितीत विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीस जलसंपदा मंत्री डॉ.राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री गिरीष महाजन, जलशक्ती विभागाचे केंद्रीय सचिव कांताराव, आयुक्त प्रविण कुमार, विभागाचे अपर मुख्य सचिव दिपक कपूर, सचिव डॉ.संजय बेलसरे यांच्यासह राज्याच्या सर्व पाटबंधारे महामंडळाचे कार्यकारी संचालक आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment