Saturday, 10 January 2026

जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात पोलीस उप आयुक्त पुरुषोत्तम कराड यांची विशेष मुलाखत सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर व सायबर सुरक्षेवर सखोल मार्गदर्शन

 जय महाराष्ट्र कार्यक्रमात पोलीस उप आयुक्त पुरुषोत्तम कराड

यांची विशेष मुलाखत

सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर व सायबर सुरक्षेवर सखोल मार्गदर्शन

 

मुंबईदि. 9: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित जय महाराष्ट्र’ या लोकप्रिय कार्यक्रमात सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर आणि सायबर सुरक्षा’ या विषयावर सायबर गुन्हे शाखेचे पोलीस उप आयुक्त पुरुषोत्तम कराड यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे.

 

आजच्या डिजिटल युगात सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला असूनत्याचबरोबर सायबर फसवणूकऑनलाईन आर्थिक गुन्हेबनावट संदेशफेक प्रोफाइल्सवैयक्तिक माहितीचा गैरवापर अशा सायबर गुन्ह्यांमध्येही लक्षणीय वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सोशल मीडियाचा सुरक्षित व जबाबदारीने वापर कसा करावाकोणत्या खबरदाऱ्या घ्याव्यातसायबर गुन्ह्यांना बळी पडू नये यासाठी काय उपाययोजना आवश्यक आहेतसायबर गुन्हा घडल्यास तात्काळ काय करावेयाबाबत पोलीस उप आयुक्त कराड यांनी 'जय महाराष्ट्रकार्यक्रमात उपयुक्त मार्गदर्शन केले आहे.

 

जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ही मुलाखत दोन भागांत प्रसारित होणार असूनपहिला भाग मंगळवार 13 जानेवारी 2026 रोजी तर दुसरा भाग मंगळवार, 20 जानेवारी 2026 रोजी रात्री 8.00 वाजता

दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर पाहता येणार आहे. तसेच ही मुलाखत माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत समाजमाध्यमांवरही उपलब्ध राहणार आहे. ही मुलाखत निवेदिका सुषमा जाधव यांनी घेतली आहे.

 

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाची अधिकृत समाजमाध्यमे

 

 X (Twitter) : https://twitter.com/MahaDGIPR

 Facebook : https://www.facebook.com/MahaDGIPR

YouTube : https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR

महाराष्ट्राची समृद्ध परंपरा सर्वदूर पोहोचवणे हेच आमचे ध्येय






 महाराष्ट्राची समृद्ध परंपरा सर्वदूर पोहोचवणे हेच आमचे ध्येय

-निवासी आयुक्त आर. विमला

            निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला यांनी या महोत्सवाच्या सांस्कृतिक महत्त्वावर प्रकाश टाकला. त्या म्हणाल्या की, "छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्याप्रमाणे अटकेपार झेंडा फडकवून महाराष्ट्राची प्रचिती दिलीतोच सांस्कृतिक वारसा आज राजधानीत आणि संपूर्ण देशात पोहोचवणे ही आपली जबाबदारी आहे. मकर संक्रांत हा सण देशाच्या विविध भागात वेगवेगळ्या नावाने साजरा केला जातोया विविधतेतील एकता जपत महाराष्ट्राची विशेष खाद्य संस्कृतीविशेषतः हुरडाआणि मराठमोळ्या परंपरा राष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्याचा आमचा मानस आहे. ज्येष्ठ अभिनेते भरत जाधव यांच्या उपस्थितीमुळे महाराष्ट्राच्या भावना आणि संस्कृती अधिक प्रभावीपणे मांडली जात असूनयातून महाराष्ट्राची एक वेगळी ओळख दिल्लीत निर्माण होईलअसा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र सदनात मकर संक्रांती महोत्सव व हुरडा पार्टीचे उद्घाटन महाराष्ट्र सदनात मराठी संस्कृतीची मेजवानी मनाला सुखद धक्का देणारी

    महाराष्ट्र सदनात मकर संक्रांती महोत्सव व हुरडा पार्टीचे उद्घाटन

महाराष्ट्र सदनात मराठी संस्कृतीची मेजवानी मनाला सुखद धक्का देणारी

-अभिनेते भरत जाधव

 

नवी दिल्ली,9 : एक कलाकार म्हणून कलेविषयी आणि आपल्या संस्कृतीविषयी बोलताना मिळणारा आनंद हा शब्दांत व्यक्त न करण्याजोगा असतो. महाराष्ट्र सदनात पहिल्यांदाच असा अनुभव घेताना मला मनापासून समाधान वाटत आहे. दिल्लीसारख्या महानगरातजिथे विविध प्रांतांचे लोक येताततिथे आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आणि खाद्यसंस्कृतीची चव पोहोचवणे हे अभिमानास्पद कार्य आहेअशा शब्दांत लोकप्रिय अभिनेते भरत जाधव यांनी दिल्लीतील मराठी उपक्रमाचे कौतुक केले. महाराष्ट्र सदनामध्ये आयोजित  मकर संक्रांती महोत्सव व हुरडा पार्टीचे उद्घाटन भरत जाधव यांच्या हस्ते झाले,  त्यावेळी ते बोलत होते.

            यावेळी व्यासपीठावर निवासी आयुक्त तथा सचिव आर विमलानिवासी आयुक्त (गुंतवणूक) सुशील गायकवाडमाहिती संचालक हेमराज बागुल, सहायक निवासी आयुक्त नितीन शेंडेस्मिता शेलारजनसंपर्क अधिकारी मनीषा पिंगळे उपस्थित होते.

            यावेळी भरत जाधव म्हणाले, महाराष्ट्रात हुरडा पार्टीचा आनंद सर्वजण घेतोचपण परराज्यात आपल्या माणसांसाठी अशी मेजवानी मिळणे ही मोठी पर्वणी आहे. या उपक्रमामुळे दिल्लीतही महाराष्ट्राचा सुगंध दरवळतो आहे.  सर्व दिल्लीकरांनी  या गावरान मेजवानीचा आस्वाद घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

भारतीय रिझर्व्ह बॅकेमार्फत ग्राहकांच्या सेवेकरिता तक्रार निवारण सुविधा

 व्यवस्थापक शिल्पा छेडा म्हणाल्या कीभारतीय रिझर्व्ह बॅकेमार्फत ग्राहकांच्या सेवेकरिता तक्रार निवारण सुविधा उपलब्ध आहे.  जर तुमची  बँक ग्राहकांना त्यांच्या  बँक खात्याशी संबंधित तक्रारींबाबत समाधानकारक उपाय  देत नसेल किंवा तक्रारींच्या अनुषंगाने तत्परतेने  ठोस कारवाई करत नसेलतर अशा प्रकरणात संबंधित ग्राहक रिझर्व्ह बँकेकडे आपली तक्रार नोंदवू शकतात. ग्राहक आपली  तक्रार ईमेल किंवा पत्राद्वारे दाखल करु शकतात. या जनजागृती  सत्रास मंत्रालयातील विविध विभागाचे अधिकारी,कर्मचारी प्रत्यक्ष तसेच ऑनलाईन उपस्थित होते.

सार्वजनिक वाय-फाय नेटवर्कवर बँकिंग किंवा आर्थिक व्यवहार कटाक्षाने टाळावेत, सूचना

 सार्वजनिक वाय-फाय नेटवर्कवर बँकिंग किंवा आर्थिक व्यवहार कटाक्षाने टाळावेत. अशा नेटवर्कवरून माहिती चोरीला जाण्याचा धोका अधिक असतो. व्यवहारानंतर खात्याचा तपशीलमेसेज व ई-मेल नियमित तपासणे गरजेचे आहे. फसवणुकीची शंका आल्यास किंवा पैसे चुकीने वजा झाल्यास तत्काळ बँकेशी संपर्क साधावा तसेच सायबर क्राईम हेल्पलाईनवर तक्रार नोंदवावी. लवकर तक्रार केल्यास नुकसान टाळण्याची शक्यता वाढते,असे बच्छाव यांनी सांगितले.

आपल्या सुरक्षित आर्थिक व्यवहारांसाठी नेहमी ग्राहकांनी अधिकृत अ‍ॅप्स व संकेतस्थळांचाच वापर करावा

 आपल्या सुरक्षित आर्थिक व्यवहारांसाठी नेहमी ग्राहकांनी अधिकृत अ‍ॅप्स व संकेतस्थळांचाच वापर करावा. अ‍ॅप डाउनलोड करताना गुगल प्ले स्टोअर किंवा अधिकृत अ‍ॅप स्टोअरच वापरावे. संशयास्पद लिंकवर क्लिक करणे टाळावे. ई-मेल किंवा मेसेजमधील लिंक उघडण्यापूर्वी ती अधिकृत आहे का याची खात्री करणे गरजेचे आहे. ऑनलाईन व्यवहारासाठी सहज लक्षात न येणारा मोठा,संमिश्र  पासवर्ड वापरणे आणि तो नियमितपणे बदलणे महत्त्वाचे आहे. एकाच पासवर्डचा अनेक ठिकाणी वापर टाळावा. शक्य असल्यास दोन स्तरांची सुरक्षा सक्रिय ठेवावी, असे सहायक महाव्यवस्थापक बच्छाव यांनी सांगितले.

खबरदारी घेतल्यास ऑनलाईन आर्थिक व्यवहार सुरक्षितपणे करता येऊ शकतात.

 यावेळी मार्गदर्शन करताना सहायक महाव्यवस्थापक बच्छाव म्हणाले की,  खबरदारी घेतल्यास ऑनलाईन आर्थिक व्यवहार सुरक्षितपणे करता येऊ शकतात. यादृष्टीने ग्राहकांनी कायम आपले ओटीपीपिनपासवर्ड किंवा सीव्हीव्ही क्रमांक दुसऱ्या कोणालाही  सांगू नयेत. तसेच बँक किंवा कोणतीही अधिकृत संस्था फोनमेसेज किंवा ई-मेलद्वारे अशी माहिती कधीही मागत नाही. अशा प्रकारचा फोन किंवा दूरध्वनी आल्यास तो फसवणुकीचा असण्याची शक्यता असते हे लक्षात घेऊन माहिती देऊ नये.  बँकिंगयूपीआयवॉलेटऑनलाईन खरेदी अशा व्यवहारांमध्ये थोडासा  निष्काळजीपणा ग्राहकांना मोठ्या आर्थिक नुकसानीकडे नेऊ शकतो. त्यामुळे ऑनलाईन व्यवहार करताना खबरदारी घेणे आवश्यक आहे.

Featured post

Lakshvedhi