Saturday, 10 January 2026

खबरदारी घेतल्यास ऑनलाईन आर्थिक व्यवहार सुरक्षितपणे करता येऊ शकतात.

 यावेळी मार्गदर्शन करताना सहायक महाव्यवस्थापक बच्छाव म्हणाले की,  खबरदारी घेतल्यास ऑनलाईन आर्थिक व्यवहार सुरक्षितपणे करता येऊ शकतात. यादृष्टीने ग्राहकांनी कायम आपले ओटीपीपिनपासवर्ड किंवा सीव्हीव्ही क्रमांक दुसऱ्या कोणालाही  सांगू नयेत. तसेच बँक किंवा कोणतीही अधिकृत संस्था फोनमेसेज किंवा ई-मेलद्वारे अशी माहिती कधीही मागत नाही. अशा प्रकारचा फोन किंवा दूरध्वनी आल्यास तो फसवणुकीचा असण्याची शक्यता असते हे लक्षात घेऊन माहिती देऊ नये.  बँकिंगयूपीआयवॉलेटऑनलाईन खरेदी अशा व्यवहारांमध्ये थोडासा  निष्काळजीपणा ग्राहकांना मोठ्या आर्थिक नुकसानीकडे नेऊ शकतो. त्यामुळे ऑनलाईन व्यवहार करताना खबरदारी घेणे आवश्यक आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi