Friday, 9 January 2026

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले व संत सावता महाराज स्मारकांच्या विकासासाठी भूसंपादन प्रक्रिया तत्काळ पूर्ण करावी

 ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले व संत सावता महाराज स्मारकांच्या विकासासाठी

 भूसंपादन प्रक्रिया तत्काळ पूर्ण करावी

- ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे

 

मुंबई, दि. २३ : ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले व संत सावता महाराज स्मारकांच्या भूसंपादनाची प्रक्रिया कोणत्याही अडथळ्याविना पूर्ण करुन त्यानंतर कार्यादेश लवकरात लवकर जारी करण्यात यावाअशा सूचना ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिल्या.

 

राज्यातील महापुरुषांच्या स्मारकांच्या विकासाला गती देण्यासाठी मंत्रालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, सातारा व सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान

 अभियानाच्या प्रचार व प्रसिध्दीसाठी पारंपरिक तसेच आधुनिक माध्यमांचा प्रभावी वापर करावा. ग्रामसभांमधून जनजागृती करणेमाहिती फलकभित्तीपत्रकेडिजिटल माध्यमे तसेच सामाजिक माध्यमांच्या माध्यमातून अभियानाची उद्दिष्टेलाभ आणि अपेक्षित सहभाग नागरिकांपर्यंत पोहोचवावाअशा सूचना त्यांनी दिल्या.

 

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान हा केवळ प्रशासकीय उपक्रम नसून गावांच्या सर्वांगीण विकासासाठी एक लोकचळवळ आहे. त्यामुळे सर्व अधिकारीकर्मचारी आणि लोकप्रतिनिधींनी एकत्रितपणे प्राधान्य देऊन काम केल्यास गाव विकासाच्या प्रक्रियेला गती मिळेल आणि राज्यातील पंचायतराज व्यवस्था अधिक सक्षम बनेलअसा विश्वास मंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या प्रचार व प्रसिध्दीच्या अनुषंगाने

 मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या प्रचार व प्रसिध्दीच्या अनुषंगाने मंत्रालयात आढावा बैठकीत ते बोलत होते, यावेळी ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत राज्यभरात अभियानाची अंमलबजावणीप्रचाराच्या कार्यपद्धती आणि जनसहभाग वाढविण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले कीमुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान हे ग्रामविकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आणि परिवर्तनकारी अभियान असून त्याची माहिती शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणे अत्यावश्यक आहे. जिल्हा परिषदांनी या अभियानाला सर्वोच्च प्राधान्य देऊन नियोजनबद्ध पद्धतीने काम करावे. पंचायत समितीग्रामपंचायतविविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी समन्वयाने काम केल्यासच अभियानाचा अपेक्षित परिणाम साध्य होईल.

वेनेझुएलातील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारची 'ट्रॅव्हल ॲडव्हायझरी' नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन cons.caracas@mea.gov.in ,किंवा +58-412-9584288

 वेनेझुएलातील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारची 'ट्रॅव्हल ॲडव्हायझरी'

नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन

 

नवी दिल्ली 4: वेनेझुएलातील अलीकडील राजकीय आणि सामाजिक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने भारतीय नागरिकांसाठी महत्त्वाची सूचना (ट्रॅव्हल ॲडव्हायझरी) जारी केली आहे. वेनेझुएलातील सद्यस्थिती पाहताभारतीय नागरिकांनी अत्यंत आवश्यक कामाशिवाय त्या देशाचा प्रवास करणे टाळावेअसे आवाहन केंद्र सरकारकडून अधिकृतपणे करण्यात आले आहे.

परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या पत्रकानुसारजे भारतीय नागरिक सध्या वेनेझुएलामध्ये वास्तव्यास आहेतत्यांनी कमालीची सतर्कता बाळगणे आवश्यक आहे. तेथील भारतीयांनी आपल्या हालचालींवर मर्यादा ठेवाव्यात आणि शक्यतो सुरक्षित ठिकाणी राहावेअशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसेचकोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी नागरिकांनी काराकस येथील भारतीय दूतावासाच्या सातत्याने संपर्कात राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नागरिकांच्या मदतीसाठी भारतीय दूतावासाने संपर्क यंत्रणा सज्ज ठेवली असूननागरिक cons.caracas@mea.gov.in  या ईमेलवर किंवा +58-412-9584288 या तातडीच्या फोन नंबरवर संपर्क साधू शकतात. परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून भारतीय प्रवाशांनी या सूचनांचे पालन करावेअसे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

000

जनऔषधी, क्षयरोग निर्मूलनाला व राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या कामाला गती देणार

 जनऔषधीक्षयरोग निर्मूलनाला व राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या कामाला गती देणार

 

 क्षयरोग निर्मूलनाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी जिल्हा व तालुका स्तरावर मिशन मोडमध्ये विशेष रणनीती राबविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. तसेच तपासणी मोहीम व्यापक करणेउपचारांमध्ये सातत्य राखणे आणि रुग्णांना पोषण सहाय्य देणेनिक्षय मित्र यांचे मार्फत फूड बास्केट देणे यावर विशेष भर देण्यात येणार आहे. राज्यातील क्षय रोगाच्या रुग्णांची एक्स-रे तपासणी वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या. केंद्र शासनामार्फत 96 अतिरिक्त हॅन्ड हेल्ड एक्स-रे मशीन राज्याला देण्यात येणार आहेत.

केंद्र व राज्य सरकारच्या समन्वयातून राज्याच्या आरोग्य क्षेत्रातील उपक्रमांना गती देत लोकाभिमुखसक्षम आणि विश्वासार्ह आरोग्य व्यवस्था उभारण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला. महाराष्ट्राची सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक प्रभावी बनविण्याच्या दिशेने ही बैठक महत्त्वाची ठरली आहे. सदर बैठकीसाठी आरोग्य मंत्री यांचे सोबत आरोग्य सचिव इ रवींद्रनसंचालक डॉक्टर नितीन अंबाडेकर उपस्थित होते.

000

 


राज्यातील आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांच्या सोबत आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची दिल्लीत बैठक

 राज्यातील आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांच्या सोबत आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची दिल्लीत बैठक

 

जनऔषधीक्षयरोग निर्मूलनाला व राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या कामाला गती देणार

 

मुंबईदि. 4 - राज्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम व गतिमान करण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा व राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांची दिल्ली येथे महत्त्वपूर्ण आढावा संपन्न झाली.

 या बैठकीत राज्यातील राष्ट्रीय आरोग्य योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणेसार्वजनिक आरोग्य पायाभूत सुविधांचे बळकटीकरण करणेआणि रुग्णकेंद्रित सेवा देणे बाबत चर्चा करण्यात आली.

बैठकी दरम्यान नागरिकांना दर्जेदार व परवडणाऱ्या दरात औषधे सहज उपलब्ध व्हावीतयासाठी प्रत्येक जिल्हा रुग्णालयात जनऔषधी केंद्र आणि अमृत फार्मसींचे जाळे राज्यात अधिक विस्तारण्याच्या सूचना केंद्रीय आरोग्य मंत्री यांनी दिल्या. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना रुग्णांवरील औषध खर्चाचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे.


संतमत अनुयायी आश्रमांचे कार्य समाजाला सेवेकडे आणि प्रेमाकडेपरमहंस महाराजांनी जात-पात

 मुख्यमंत्री  म्हणाले कीसंतमत अनुयायी आश्रमांचे कार्य समाजाला  सेवेकडे आणि प्रेमाकडे नेणारे आहे. मानवसेवासमताप्रेम व सद्भावना या मूल्यांच्या जपणुकीसाठी आश्रमाचे योगदान अमूल्य असूनहेच संतमत परंपरेचे खरे स्वरूप आहे.

संतमत परंपरेतील परमहंस महाराजांनी जात-पात व भेदभावाला विरोध करून मानवधर्म प्रधान मानला. त्यांनी आत्मज्ञानअहंकार,त्याग व मानवसेवेचा संदेश दिला. भारतीय संस्कृतीतील गीता ही केवळ विचारधारा नसूनसंस्कृती व सभ्यता जपत उत्तम जीवन जगण्याचा मार्ग असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भारतीय संस्कृती जपण्याचे महान कार्य संतपरंपरेने केले आहेअसेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.

Featured post

Lakshvedhi