ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले व संत सावता महाराज स्मारकांच्या विकासासाठी
भूसंपादन प्रक्रिया तत्काळ पूर्ण करावी
- ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे
मुंबई, दि. २३ : ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले व संत सावता महाराज स्मारकांच्या भूसंपादनाची प्रक्रिया कोणत्याही अडथळ्याविना पूर्ण करुन त्यानंतर कार्यादेश लवकरात लवकर जारी करण्यात यावा, अशा सूचना ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिल्या.
राज्यातील महापुरुषांच्या स्मारकांच्या विकासाला गती देण्यासाठी मंत्रालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, सातारा व सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment