Thursday, 8 January 2026

मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना अंमलबजावणीस मंत्रिमंडळाची मंजुरी; ग्रामीण रस्ते विकासाला वेग

 मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना अंमलबजावणीस मंत्रिमंडळाची मंजुरी;

ग्रामीण रस्ते विकासाला वेग

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

 

नागपूरदि. १२ : ग्रामीण भागातील शेत आणि पाणंद रस्त्यांची वाढती गरज लक्षात घेतातसेच मनरेगा अंतर्गत कामांमध्ये येणाऱ्या अडचणींमुळे शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांवर उपाय म्हणून राज्य मंत्रिमंडळाने मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना राबविण्यास मंजुरी दिली आहे. याबाबत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानपरिषद आणि विधानसभेत निवेदन केले.

            महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले कीशेतीमधील वाढते यांत्रिकीकरण लक्षात घेऊन ही योजना महसूल विभागामार्फत पूर्णतः यंत्रसामग्रीच्या सहाय्याने राबविण्यात येणार आहे. रोजगार हमी योजना विभागाची मातोश्री ग्रामसमृद्धी शेत/पाणंद रस्ते योजना’ पूर्ववत सुरूच राहणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

आदिवासी तरुणांच्या ‘प्लग अँड प्ले’ प्रशिक्षण योजनेसाठी शासन सकारात्मक

 आदिवासी तरुणांच्या प्लग अँड प्ले’ प्रशिक्षण योजनेसाठी शासन सकारात्मक

उद्योग मंत्री डॉ.उदय सामंत

 

नागपूरदि. 12 : नाशिकमधील आदिवासी क्लस्टरच्या धर्तीवर राज्यात आदिवासी समाजातील तरुण-तरुणींना प्रशिक्षण देणारी प्लग अँड प्ले ही योजना हाती घेण्यासाठी सकारात्मक विचार केला जाईल. यासाठी आवश्यक ती पायाभूत सुविधा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळा (एमआयडीसी) मार्फत उभारली जाईलअसे उद्योग मंत्री डॉ.उदय सामंत यांनी सांगितले.

            पोभुर्णा आणि करंजी (ता. गोंड पिंपरीजि. चंद्रपूर) येथे एमआयडीसी क्षेत्रात आदिवासी औद्योगिक क्षेत्र विकास करण्यासंदर्भात विधानसभेत अर्धा तास चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी हा प्रश्न मांडला होता.

            उद्योग मंत्री डॉ. सामंत म्हणाले कीसंबंधित एमआयडीसी प्रकल्पातील 190 हेक्टर जमीन अधिग्रहणाचा निर्णय विरोधामुळे बदलून सध्या 22.35 हेक्टर जमीन ताब्यात असून ती क्षमता 73 हेक्टरपर्यंत वाढणार आहे. 

            आदिवासी तरुणांसाठी रोजगारक्षम प्रशिक्षण सुविधा उभारण्याची सूचना अत्यंत महत्त्वाची आहे. राज्य शासनामार्फत नाशिकमध्ये उभ्या राहिलेल्या देशातील पहिल्या ट्रायबल क्लस्टरमध्ये एमआयडीसी व आदिवासी समाजाचा एकत्रित मॅचिंग ब्रँड’ तयार करून प्लग अँड प्ले मॉडेल यशस्वीरीत्या सुरू करण्यात आला आहे. या माध्यमातून आदिवासी बांधवांसाठी एक अभिनव व स्वतंत्र उपक्रम सुरू केला जाणार असूनरोजगार आणि कौशल्य विकासाच्या दिशेने हा महत्त्वाचा टप्पा ठरणार आहेअसल्याचे उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांनी सांगितले.

पिंपरी–चिंचवडमधील बनावट सौंदर्यप्रसाधने प्रकरणावर कठोर कारवाई; विशेष चौकशी पथक नेमण्याची तयारी

 पिंपरीचिंचवडमधील बनावट सौंदर्यप्रसाधने प्रकरणावर कठोर कारवाई;

विशेष चौकशी पथक नेमण्याची तयारी

- अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ

 

नागपूरदि. 12 :- पिंपरीचिंचवडमध्ये बनावट सौंदर्यप्रसाधनांमुळे नागरिकांना त्वचेचे विकार झाल्याच्या गंभीर प्रकरणावर राज्य शासनाने कडक भूमिका घेतली आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाने छाप्यात 36 हजार 700 रुपयांचा माल जप्त केला आहे. तपासानंतर प्रकरण पोलीसांकडे देण्यात आले असून विशेष चौकशी पथक नेमणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी विधानसभेत दिली.

            राज्यात औषध निरीक्षक मनुष्यबळाची कमतरता असून 1.45 लाख औषध दुकानांसाठी 42 निरीक्षक कार्यरत आहेत. रिक्त पदे भरण्यासाठी 109 उमेदवारांची नियुक्तीतसेच 56 निरीक्षक पदांचा निकाल मार्चपर्यंत अपेक्षित आहे.

            धायरी येथील एक आणि भिवंडी येथील एक अशा दोन कंपन्यांमधील तपासणी दरम्यान ₹1.16 कोटींचा माल जप्त झाला असून त्यांच्यावर खटले दाखल करण्यात आले आहेत. उत्पादनाच्या मूळ स्रोतापर्यंत पोहोचून कठोर कारवाई करणार असल्याचेही मंत्री झिरवळ यांनी यावेळी सांगितले.

००००

चार आयआयटी, सहा आयआयएम, १२ राष्ट्रीय विधी विद्यापीठे (एनएलयू) आणि आयआयएमसी यांसह

 या परिषदेत चार आयआयटीसहा आयआयएम१२ राष्ट्रीय विधी विद्यापीठे (एनएलयूआणि आयआयएमसी यांसह नामांकित शैक्षणिक संस्थांचा सहभाग राहणार असूनराज्ये व केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांच्या नेतृत्वाखाली ३६ विषयक गट चर्चेत सहभागी होणार आहेतअसे भारत निवडणूक आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

000

सहभागी प्रतिनिधींना भारताची निवडणूक व्यवस्था, प्रक्रिया तसेच तंत्रज्ञानाधारित नवकल्पना यांची माहिती देण्यात येणार

 या परिषदेत सहभागी प्रतिनिधींना भारताची निवडणूक व्यवस्थाप्रक्रिया तसेच तंत्रज्ञानाधारित नवकल्पना यांची माहिती देण्यात येणार असूनभारतीय निवडणुका जगातील लोकशाही व्यवस्थांसाठी आदर्श ठरत असल्याचे अधोरेखित केले जाणार आहे.

परिषदेच्या कार्यक्रमात उद्घाटन सत्रनिवडणूक व्यवस्थापन संस्थांच्या प्रमुखांची विशेष बैठककार्यगट बैठकाईसीआयनेट चे उद्घाटन तसेच जागतिक निवडणूक विषयांवरील आणि आंतरराष्ट्रीय मानकांवरील विविध विषयक सत्रांचा समावेश आहे.


निवडणूक व्यवस्थापन संस्थांमधील आंतरराष्ट्रीय सहकार्याचे

 आयआयआयडीईएम चे महासंचालक राकेश वर्मा यांनी या परिषदेसंदर्भातील रूपरेषा मांडताना सांगितले कीही परिषद निवडणूक व्यवस्थापन संस्थांमधील आंतरराष्ट्रीय सहकार्याचे व्यासपीठ ठरेल. निवडणूक प्रक्रियेत येणाऱ्या समकालीन आव्हानांवर सामूहिक चर्चासर्वोत्तम पद्धती व नावीन्यपूर्ण उपक्रमांची देवाणघेवाण आणि संयुक्त उपाययोजनांची निर्मिती या परिषदेत होणार आहे. यावेळी आयआयसीडीईएम २०२६ च्या अधिकृत लोगोचे अनावरणही करण्यात आले.

भारताने २०२६ या वर्षासाठी ‘इंटरनॅशनल आयडीईए

 भारताने २०२६ या वर्षासाठी इंटरनॅशनल आयडीईए’ या संस्थेच्या सदस्य राष्ट्रांच्या परिषदेचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी मांडलेल्या दृष्टिकोनानुसार ही परिषद आयोजित होत असूनसमावेशकशांततापूर्णसक्षम आणि शाश्वत जगासाठी लोकशाही ही या परिषदेची मुख्य संकल्पना आहे.

Featured post

Lakshvedhi