पिंपरी–चिंचवडमधील बनावट सौंदर्यप्रसाधने प्रकरणावर कठोर कारवाई;
विशेष चौकशी पथक नेमण्याची तयारी
- अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ
नागपूर, दि. 12 :- पिंपरी–चिंचवडमध्ये बनावट सौंदर्यप्रसाधनांमुळे नागरिकांना त्वचेचे विकार झाल्याच्या गंभीर प्रकरणावर राज्य शासनाने कडक भूमिका घेतली आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाने छाप्यात 36 हजार 700 रुपयांचा माल जप्त केला आहे. तपासानंतर प्रकरण पोलीसांकडे देण्यात आले असून विशेष चौकशी पथक नेमणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी विधानसभेत दिली.
राज्यात औषध निरीक्षक मनुष्यबळाची कमतरता असून 1.45 लाख औषध दुकानांसाठी 42 निरीक्षक कार्यरत आहेत. रिक्त पदे भरण्यासाठी 109 उमेदवारांची नियुक्ती, तसेच 56 निरीक्षक पदांचा निकाल मार्चपर्यंत अपेक्षित आहे.
धायरी येथील एक आणि भिवंडी येथील एक अशा दोन कंपन्यांमधील तपासणी दरम्यान ₹1.16 कोटींचा माल जप्त झाला असून त्यांच्यावर खटले दाखल करण्यात आले आहेत. उत्पादनाच्या मूळ स्रोतापर्यंत पोहोचून कठोर कारवाई करणार असल्याचेही मंत्री झिरवळ यांनी यावेळी सांगितले.
००००
No comments:
Post a Comment