Thursday, 8 January 2026

राष्ट्रीय युवा महोत्सवामध्ये सहभाग हा राज्यातील युवकांसाठी गौरवाची व प्रेरणादायी बाब असल्याचे गौरवोद्गार

 राष्ट्रीय युवा महोत्सवामध्ये सहभाग हा राज्यातील युवकांसाठी गौरवाची व प्रेरणादायी बाब असल्याचे गौरवोद्गार काढून दिल्ली येथील संवाद कार्यक्रमासाठी निवड झालेल्या युवकांना राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी शुभेच्छा दिल्या.

राज्यपाल आचार्य देवव्रत युवकांशी संवाद साधताना म्हणालेप्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी होणाऱ्या राष्ट्रीय युवा महोत्सवाला नवे स्वरूप देण्यात आले असून देशातील सर्व राज्यातून विद्यार्थ्यांसाठी स्पर्धात्मक परीक्षा घेण्यात आली. त्यातून निवड झालेल्या तीन हजार गुणवंत युवकांना थेट पंतप्रधानांशी संवाद साधण्याची संधी या महोत्सवाच्या माध्यमातून मिळणार आहे. मेहनतपरिश्रम व गुणवत्तेच्या बळावर  या स्पर्धेसाठी निवड झालेल्या युवकांचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी कौतुक केले. ते म्हणालेया स्पर्धेसाठी झालेली युवकांची निवड ही विकसित राष्ट्र निर्माणातील त्यांच्या कष्टाच्या भूमिकेची पावती आहे.

भारत हा युवकांचा देश आहे. युवक देशाच्या विकासाला अधिक गती देण्याची भूमिका

 भारत हा युवकांचा देश आहे. युवक देशाच्या विकासाला अधिक गती देण्याची भूमिका बजावू  शकतातअसा विश्वास व्यक्त करून राज्यपाल आचार्य देवव्रत म्हणाले, भारताचा विकास फक्त आर्थिक किंवा भौतिक उन्नतीपुरता मर्यादित नसूनसंस्कृतीसभ्यतापरंपरा व नैतिक  मूल्यांचे जतन हेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे अधोरेखित करतो. संपूर्ण विश्व हे एक कुटुंब मानणारी विचारधारा ही भारताची ओळख असून भारताने संत-महात्म्यांच्या माध्यमातून मानवतेचा संदेश जगभर पोहोचविला असल्याचेही राज्यपाल आचार्य देवव्रत यावेळी म्हणाले.

स्टार्टअप्स, आत्मनिर्भर भारत अभियानामुळे भारत जागतिक पातळीवर वेगाने प्रगती

 राज्यपाल आचार्य देवव्रत म्हणालेदेश सर्व क्षेत्रात प्रगती करीत असून

स्टार्टअप्सआत्मनिर्भर भारत अभियानामुळे भारत जागतिक पातळीवर वेगाने प्रगती करत आहे. भारत आज जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था बनला असूनतिसऱ्या क्रमांकाकडे वाटचाल करीत आहे. विकासाचा लाभ समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचत आहे. युवकांमध्ये देशाला आत्मनिर्भरसमृद्ध आणि शक्तिशाली बनविण्याची क्षमता असल्याचे सांगून राज्यपाल आचार्य देवव्रत म्हणाले युवकांनी अपयश आल्यास खचून न जाता परिश्रमचिकाटी आणि सकारात्मक विचार करून विकसित राष्ट्र निर्माणात आपले योगदान द्यावे.

या संवाद कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांवरही राज्यपालांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या शेवटी निवड झालेल्या युवकांना प्रातिनिधिक स्वरूपात मान्यवरांच्या हस्ते किटचे वाटप करण्यात आले.

राष्ट्रीय युवा महोत्सव-विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग या अंतर्गत ऑन लाईन स्पर्धा प्रथम टप्पा विकसित भारत क्विज,

 २०२५-२६ या वर्षातील राष्ट्रीय युवा महोत्सवाचे दिल्ली येथे ९ जानेवारी २०२६ पासून आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय युवा महोत्सव-विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग या अंतर्गत ऑन लाईन स्पर्धा प्रथम टप्पा विकसित भारत क्विजव्दितीय टप्पा निबंध लेखन स्पर्धातृतीय टप्पा –विकसीत भारत पीपीटी चॅलेंज अशी स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेतून राज्यामधून ४५ युवांची निवड करण्यात आलेली आहे. तसेच जिल्हाविभाग व राज्यस्तरीय युवा महोत्सव अंतर्गत सांस्कृतिक विभागातून २८ कलाकारांची आणि डिझाईन फॉर भारत आणि हॅक फॉर सोशल कॉज या स्पर्धेतून ५ स्पर्धकांची निवड करण्यात आली आली आहे. राज्यातून निवड झालेल्या युवक व त्यांच्यासोबत असलेल्या अधिकारी  वर्गासह ८५ जणांचा चमू दिल्ली येथे राष्ट्रीय स्पर्धेसाठी आज मुंबई येथून रवाना झाला.

०००००

राष्ट्रीय युवा दिनानिमित्त ‘संविधान जनजागृती प्रश्नमंजुषा’चे आयोजनwww.yuvacareer.com या संकेतस्थळावर

 राष्ट्रीय युवा दिनानिमित्त ‘संविधान जनजागृती प्रश्नमंजुषा’चे आयोजन

मुंबईदि. ०७ : १२ जानेवारी च्या राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संविधानाबाबत जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने संविधान जनजागृती प्रश्नमंजुषा २०२५ -२६ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या राज्यस्तरीय उपक्रमाच्या माध्यमातून युवकांमध्ये संविधानातील मूल्येमूलभूत अधिकार व कर्तव्यांची जाणीव निर्माण करण्यावर भर देण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत सहभागी विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन स्वरूपात १५ दिवसांचे प्रशिक्षण राबविण्यात येणार असूनया प्रशिक्षणात संविधानासंबंधी सखोल माहिती व मार्गदर्शन दिले जाणार आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी १० जानेवारी २०२६ पर्यंत इच्छुक विद्यार्थ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांनी केले आहे.

 

हा राज्यस्तरीय उपक्रम महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती व जमाती आयोग यांच्या वतीने राबविण्यात येत असूनभारतीय संविधानातील मूल्येमूलभूत अधिकार व कर्तव्यांची जाणीव युवकांमध्ये निर्माण करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. युवकांनी संविधान समजून घेऊन जबाबदारसजग आणि लोकशाही मूल्यांवर आधारित नागरिक म्हणून घडावेयासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. "घर घर संविधान" या संकल्पनेतून ही जनजागृती चळवळ राज्यातील प्रत्येक घरापर्यंत व विद्याकरण्यात आले आहे.ही प्रश्नमंजुषा राज्यातील इयत्ता ८ वी ते पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खुली असून, संपूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येणार आहे. १२ जानेवारी २०२६ रोजी राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून ऑनलाईन प्रशिक्षणास प्रारंभ होईल.


 


प्रशिक्षणासाठी महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, नागपूर येथील तज्ज्ञ प्राध्यापक मार्गदर्शन करणार असून आवश्यक अध्ययन साहित्य ऑनलाईन उपलब्ध करून दिले जाणार आहे. ही स्पर्धा मराठी, हिंदी व इंग्रजी या तीन भाषांमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर ऑनलाईन पद्धतीने (प्रॉक्टरिंगसह) परीक्षा घेण्यात येईल. सहभागासाठी केवळ ९९ रुपये इतके नाममात्र शुल्क आकारण्यात येणार आहे.


 


या स्पर्धेमध्ये यशस्वी ठरणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आकर्षक पारितोषिकांची घोषणा करण्यात आली असून प्रथम पुरस्कार १ लाख रुपये, द्वितीय पुरस्कार ५१ हजार रुपये, तृतीय पुरस्कार ११ हजार रुपये यासोबतच सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना रोख पारितोषिकांसह प्रमाणपत्रे देण्यात येणार असून, सहभागी सर्व विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांच्या वतीने सहभाग प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल.


 


हा उपक्रम आदिवासी विकास विभाग, अल्पसंख्यांक विकास विभाग, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, नागपूर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (बार्टी), पुणे तसेच युवा करिअर क्लब यांच्या संयुक्त सहकार्याने राबविण्यात येत आहे.


 


या उपक्रमाची संपूर्ण माहिती, नोंदणी प्रक्रिया व अधिकृत सूचना www.yuvacareer.com या संकेतस्थळावर उपलब्ध असून, नागरिकांनी कोणत्याही अनधिकृत किंवा बनावट संकेतस्थळाला बळी न पडता केवळ अधिकृत संकेतस्थळावरूनच नोंदणी करावी असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टीच्या प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.


 

जगाच्या पाठीवरील विविध देशांतून आलेल्या कल्पक आणि प्रतिभावंत शेफचे यजमानपद भूषवणे,

 या भेटीदरम्यान विदेशी पाहुण्यांनी महाराष्ट्राच्या श्रीखंडपुरणपोळीझुणका-भाकरी आणि कढी-मसालाभात यांसारख्या पारंपरिक मराठी व्यंजनांचा आस्वाद घेतला. या मेजवानीने जागतिक स्तरावरील शेफ भारावून गेले. तसेचविदेशी पाहुण्यांच्या मनोरंजनासाठी हिंदी गाण्यांचा एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होताज्यामध्ये भारतीय संगीताच्या तालावर हे सर्व मान्यवर मनसोक्त थिरकले.

 

निवासी आयुक्त आर. विमला आपल्या मनोगतात म्हणाल्या कीजगाच्या पाठीवरील विविध देशांतून आलेल्या कल्पक आणि प्रतिभावंत शेफचे यजमानपद भूषवणेही महाराष्ट्र शासनासाठी अत्यंत गौरवाची बाब आहे. अशा भेटींमुळे केवळ खाद्यसंस्कृतीच नव्हेतर दोन देशांमधील ऋणानुबंध अधिक दृढ होतात.

 

या शिष्टमंडळातील सदस्यांनी महाराष्ट्र सदनातील शिष्टाचारस्वच्छता आणि इथल्या जिव्हाळ्याच्या आदरातिथ्याबद्दल प्रशासनाचे आभार मानले. या कार्यक्रमाला सहायक निवासी आयुक्त नितीन शेंडेसहायक निवासी आयुक्त स्मिता शेलारमहाराष्ट्र परिचय केंद्राच्या जनसंपर्क अधिकारी मनीषा पिंगळे आणि सदनातील इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्र सदनात जागतिक पाक संस्कृतीचा संगम · विविध देशातील 30 दिग्गज शेफकडून राज्याच्या आदरातिथ्याचा गौरव

 महाराष्ट्र सदनात जागतिक पाक संस्कृतीचा संगम

·         विविध देशातील 30 दिग्गज शेफकडून राज्याच्या आदरातिथ्याचा गौरव

 

नवी दिल्ली दि. 7: जगातील विविध देशांतील 30 नामांकित दिग्गज शेफच्या एका उच्चस्तरीय शिष्टमंडळाने मंगळवारी महाराष्ट्र सदनाला सदिच्छा भेट दिली. महाराष्ट्राचे वैभव आणि येथील आदरातिथ्य पाहून हे आंतरराष्ट्रीय पाहुणे भारावून गेले. महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला यांनी या शिष्टमंडळाचे स्वागत केले. यावेळी आयोजित विशेष सोहळ्यात त्यांनी सर्व परदेशी पाहुण्यांना राज्याच्या समृद्ध सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाची ओळख करून दिली.

 

या भेटीदरम्यान ऑस्ट्रेलियायुक्रेनमॅसेडोनियामलेशियामालदीवदक्षिण आफ्रिकासर्बियाफिलिपिन्सउझबेकिस्तानश्रीलंकामलेशियासिंगापूरव्हिएतनामफ्रान्सदुबईकेनियामॉरिशसइंडोनेशियामालदीव देशांतील 30 पाककला तज्ज्ञांनी महाराष्ट्र सदनाच्या वास्तूशिल्पाची पाहणी केली. निवासी आयुक्त आर. विमला यांनी या प्रतिनिधींना महाराष्ट्राची विविधता आणि जागतिक स्तरावर नावाजल्या जाणाऱ्या 'महाराष्ट्रीयन खाद्यसंस्कृती'चे महत्त्व सांगितले. निवासी आयुक्तांच्या हस्ते सर्व पाहुण्यांना 'पारंपरिक दिवेभेट म्हणून देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. भारतीय संस्कृतीत प्रकाशाचे प्रतीक मानले जाणारे हे दिवे स्वीकारताना पाहुण्यांनी मनापासून आनंद व्यक्त केला

Featured post

Lakshvedhi