या भेटीदरम्यान विदेशी पाहुण्यांनी महाराष्ट्राच्या श्रीखंड, पुरणपोळी, झुणका-भाकरी आणि कढी-मसालाभात यांसारख्या पारंपरिक मराठी व्यंजनांचा आस्वाद घेतला. या मेजवानीने जागतिक स्तरावरील शेफ भारावून गेले. तसेच, विदेशी पाहुण्यांच्या मनोरंजनासाठी हिंदी गाण्यांचा एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये भारतीय संगीताच्या तालावर हे सर्व मान्यवर मनसोक्त थिरकले.
निवासी आयुक्त आर. विमला आपल्या मनोगतात म्हणाल्या की, जगाच्या पाठीवरील विविध देशांतून आलेल्या कल्पक आणि प्रतिभावंत शेफचे यजमानपद भूषवणे, ही महाराष्ट्र शासनासाठी अत्यंत गौरवाची बाब आहे. अशा भेटींमुळे केवळ खाद्यसंस्कृतीच नव्हे, तर दोन देशांमधील ऋणानुबंध अधिक दृढ होतात.
या शिष्टमंडळातील सदस्यांनी महाराष्ट्र सदनातील शिष्टाचार, स्वच्छता आणि इथल्या जिव्हाळ्याच्या आदरातिथ्याबद्दल प्रशासनाचे आभार मानले. या कार्यक्रमाला सहायक निवासी आयुक्त नितीन शेंडे, सहायक निवासी आयुक्त स्मिता शेलार, महाराष्ट्र परिचय केंद्राच्या जनसंपर्क अधिकारी मनीषा पिंगळे आणि सदनातील इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment