महाराष्ट्र सदनात जागतिक पाक संस्कृतीचा संगम
· विविध देशातील 30 दिग्गज शेफकडून राज्याच्या आदरातिथ्याचा गौरव
नवी दिल्ली दि. 7: जगातील विविध देशांतील 30 नामांकित दिग्गज शेफच्या एका उच्चस्तरीय शिष्टमंडळाने मंगळवारी महाराष्ट्र सदनाला सदिच्छा भेट दिली. महाराष्ट्राचे वैभव आणि येथील आदरातिथ्य पाहून हे आंतरराष्ट्रीय पाहुणे भारावून गेले. महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला यांनी या शिष्टमंडळाचे स्वागत केले. यावेळी आयोजित विशेष सोहळ्यात त्यांनी सर्व परदेशी पाहुण्यांना राज्याच्या समृद्ध सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाची ओळख करून दिली.
या भेटीदरम्यान ऑस्ट्रेलिया, युक्रेन, मॅसेडोनिया, मलेशिया, मालदीव, दक्षिण आफ्रिका, सर्बिया, फिलिपिन्स, उझबेकिस्तान, श्रीलंका, मलेशिया, सिंगापूर, व्हिएतनाम, फ्रान्स, दुबई, केनिया, मॉरिशस, इंडोनेशिया, मालदीव देशांतील 30 पाककला तज्ज्ञांनी महाराष्ट्र सदनाच्या वास्तूशिल्पाची पाहणी केली. निवासी आयुक्त आर. विमला यांनी या प्रतिनिधींना महाराष्ट्राची विविधता आणि जागतिक स्तरावर नावाजल्या जाणाऱ्या 'महाराष्ट्रीयन खाद्यसंस्कृती'चे महत्त्व सांगितले. निवासी आयुक्तांच्या हस्ते सर्व पाहुण्यांना 'पारंपरिक दिवे' भेट म्हणून देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. भारतीय संस्कृतीत प्रकाशाचे प्रतीक मानले जाणारे हे दिवे स्वीकारताना पाहुण्यांनी मनापासून आनंद व्यक्त केला
No comments:
Post a Comment