Tuesday, 6 January 2026

अण्णासाहेब पाटील महामंडळाकडील योजनांचा

 अण्णासाहेब पाटील महामंडळाकडील योजनांचा

जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडून आढावा

 

नागपूरदि.११ : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या विविध योजनांचा जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आढावा घेऊन महामंडळाच्या योजनांचा लाभ अधिकाधिक पात्र नागरिकांपर्यंत पोहोचवावातसेच योजनांच्या अंमलबजावणीस गती देण्यात यावीअसे निर्देश दिले.

 

          अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडील योजनांचा आढावा मंत्री श्री. विखे पाटील यांनी नागपूर येथील विधान भवनातील त्यांच्या दालनात आयोजित बैठकीत घेतला. या आढावा बैठकीस महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटीलआमदार सर्वश्री निरंजन डावखरेअभिमन्यू पवारॲड. राहुल कुलसामान्य प्रशासन विभागाचे सचिव गणेश पाटीलमहामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख तसेच वित्त विभागाचे सहसचिव विवेक दहिफळे उपस्थित होते.

 

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेसाठी

 भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेसाठी हिवाळी अधिवेशनात १२७.७१ कोटी निधीची पूरक मागणी केली आहे. तसेच केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत दुसऱ्या हप्त्याच्या निधीच्या मागणीचा प्रस्ताव केंद्र शासनास पाठवण्यात आला आहे. तर कृषी समृद्धी योजनेसाठी २०२५-२०२६ पासून पुढील पाच वर्षांमध्ये दरवर्षी पाच हजार कोटी अशी एकूण २५ हजार कोटीची तरतूद करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

कृषी यांत्रिकीकरण उप अभियानासाठी ८२ कोटी ६७ लाख, राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरणसाठी

 सन २०२५-२०२६ वर्षाकरिता कृषी विभागामार्फत केंद्र पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण उप अभियानासाठी ८२ कोटी ६७ लाखराज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरणसाठी २०० कोटीप्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजनेसाठी (पीडीएमसी२५१ कोटी ४१ लाख ५० हजारमुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेसाठी १०० कोटीभाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेसाठी ६२ कोटी ७० लाखमुख्यमंत्री कृषी व अन्नप्रक्रिया योजनेसाठी ३१ कोटी ९७ लाख ७५ हजार आणि एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान योजनेसाठी ६८ कोटी ३३ लाख ३३ हजार इतका निधी वितरित करण्यात आल्याचे कृषी मंत्री श्री. भरणे यांनी सांगितले.

कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना अंतर्गत प्राप्त अर्जांच्या

 कृषी मंत्री श्री. भरणे यांनी सांगितले कीकृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना अंतर्गत प्राप्त अर्जांच्या लाभार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी तसेच लाभार्थ्यांची खात्री करून योजनेच्या निकषानुसार पात्र व्यक्तींना लाभ देण्यात येतो. कृषी विभागांतर्गत विविध योजना अंतर्गत निधीची आवश्यकता आहे. याकरिता कृषी समृद्धी योजनेतून निधी उपलब्ध करून देण्याबाबत निर्णय घेण्यात आल्याचे कृषी मंत्री भरणे यांनी सांगितले.

कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना अंतर्गत प्राप्त अर्जांच्या

 कृषी मंत्री श्री. भरणे यांनी सांगितले कीकृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना अंतर्गत प्राप्त अर्जांच्या लाभार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी तसेच लाभार्थ्यांची खात्री करून योजनेच्या निकषानुसार पात्र व्यक्तींना लाभ देण्यात येतो. कृषी विभागांतर्गत विविध योजना अंतर्गत निधीची आवश्यकता आहे. याकरिता कृषी समृद्धी योजनेतून निधी उपलब्ध करून देण्याबाबत निर्णय घेण्यात आल्याचे कृषी मंत्री भरणे यांनी सांगितले.

कृषी योजनांच्या लाभापासून कोणताही शेतकरी वंचित राहणार नाही

 कृषी योजनांच्या लाभापासून कोणताही शेतकरी वंचित राहणार नाही

-         कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

 

नागपूर दि. ११ : राज्य शासन शेतकऱ्यांप्रती संवेदनशील असून कृषी विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या कृषी योजनांच्या लाभापासून कोणताही शेतकरी वंचित राहणार नाहीअसे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधान परिषदेत सांगितले.

सदस्य रणजितसिंह मोहिते पाटील यांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या विविध योजनांचा निधी व अनुदान प्रलंबित असल्याबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या उत्तरात कृषी मंत्री भरणे यांनी ही माहिती दिली. या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य सर्वश्री सतेज पाटीलसदाभाऊ खोतशशिकांत शिंदेनिरंजन डावखरेप्रविण दरेकरसंजय खोडके आणि कृपाल तुमाने यांनी सहभाग घेतला.

कृषी मंत्री.भरणे म्हणालेशेतकरी संकटात असताना शासन नेहमीच त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहे. यापुढे शेतकऱ्याच्या हितासाठी शासन खंबीरपणे उभे राहील. मार्च पर्यंत कृषी योजनांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईलअसेही त्यांनी सांगितले.

कृत्रिम वाळूचा वापर वाढवण्यावर शासनाचा भर

 कृत्रिम वाळूचा वापर वाढवण्यावर शासनाचा भर

-         महसूल राज्यमंत्री योगेश कदम

नागपूरदि. ११ : राज्याच्या वाळू निर्गती धोरणानुसार वाळू गटातील १० टक्के वाळू घरकुलांसाठी राखीव ठेवण्यात येत आहे. तथापि कृत्रिम वाळूचा वापर वाढवण्यावर शासनाचा भर असल्याचे महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांनी विधान परिषदेत सांगितले.

सदस्य कृपाल तुमाने यांनी कमी दरात वाळू उपलब्ध होत नसल्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री हेमंत पाटीलप्रवीण दरेकरभाई जगतापनिरंजन डावखरेडॉ. मनीषा कायंदे यांनी सहभाग घेतला.

महसूल राज्यमंत्री कदम म्हणालेवाळू गटांमधील पाच ब्रास नैसर्गिक वाळू घरकुलांसाठी मोफत दिली जाते. राज्यात वाळू गटांचे लिलाव ३१ डिसेंबर पर्यंत पूर्ण केले जातील. ज्या तालुक्यात वाळूगट नसेल तेथे तहसीलदारांकडे अर्ज करून जेथे वाळू उपलब्ध असेल तेथून वाळू उपलब्ध होऊ शकेल. ही प्रक्रिया सुलभ करण्यात आली आहे. तथापिकृत्रिम वाळूच्या वापरावर भर देण्याच्या उद्देशाने जेथे वाळूची जास्त मागणी असेल तेथे कृत्रिम वाळू प्रकल्प सुरू करण्यास प्रोत्साहन देण्यात येईल. वाळू चोरी होऊ नये यासाठी दक्षता पथक कार्यरत असून त्यांच्यामार्फत निष्पक्ष कार्यवाही करण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

 

Featured post

Lakshvedhi