अण्णासाहेब पाटील महामंडळाकडील योजनांचा
जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडून आढावा
नागपूर, दि.११ : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या विविध योजनांचा जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आढावा घेऊन महामंडळाच्या योजनांचा लाभ अधिकाधिक पात्र नागरिकांपर्यंत पोहोचवावा, तसेच योजनांच्या अंमलबजावणीस गती देण्यात यावी, असे निर्देश दिले.
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडील योजनांचा आढावा मंत्री श्री. विखे पाटील यांनी नागपूर येथील विधान भवनातील त्यांच्या दालनात आयोजित बैठकीत घेतला. या आढावा बैठकीस महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, आमदार सर्वश्री निरंजन डावखरे, अभिमन्यू पवार, ॲड. राहुल कुल, सामान्य प्रशासन विभागाचे सचिव गणेश पाटील, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख तसेच वित्त विभागाचे सहसचिव विवेक दहिफळे उपस्थित होते.
No comments:
Post a Comment