ग्रंथालय चळवळीला नवे बळ देण्यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करणार
- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील
राज्य ग्रंथालय परिषदेची पहिली बैठक
मुंबई, दि. ६ : ग्रंथालय चळवळीला नवे बळ देण्यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.
मंत्रालयात राज्य ग्रंथालय परिषदेची बैठक झाली यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी.वेणुगोपाल रेड्डी, सहाय्यक धर्मदाय आयुक्त राम लिप्ते, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग उपसचिव तुषार महाजन, उच्च शिक्षण विभागाचे उपसचिव अमोल मुत्याल, ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष गजानन कोटेवार, ग्रंथालय संघ अमरावती विभागाचे अध्यक्ष प्रभाकर घुगे, ग्रंथालय संघ मराठवाडा विभागाचे अध्यक्ष खंडेराव सरनाईक, पुणे विभागाचे अध्यक्ष सोपान पवार, कोकण विभागाचे अध्यक्ष दिलीप कोरे,डॉ सिद्धी जगदाळे, डॉ सुभाष चव्हाण, सुनील वायाळ व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment