Thursday, 13 November 2025

नाशिकला रामकाल पथाचे भूमिपूजन

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते

नाशिकला रामकाल पथाचे भूमिपूजन

 

नाशिक दि. 13 : केंद्र शासनाच्या पर्यटन मंत्रालयाच्या माध्यमातून स्पेशल असिस्टंट टू स्टेटस् फॉर कॅपिटल इन्व्हेस्टमेंट’ योजनेंतर्गत 99 कोटी 14 लाख रुपये खर्चातून रामकुंडसह परिसरात साकारण्यात येणाऱ्या रामकाल पथचे भूमीपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज करण्यात आले.

 

            नाशिक येथील रामकुंड परिसरात झालेल्या या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेआपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीष महाजनशालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसेक्रीडा मंत्री ॲड. माणिकराव कोकाटेआमदार ॲड. राहुल ढिकलेआमदार दिलीप बनकरआमदार देवयानी फरांदेआमदार सीमा हिरेविभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडामनाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंहपोलीस आयुक्त संदीप कर्णिकमहानगरपालिका आयुक्त मनीषा खत्रीजिल्हाधिकारी आयुष प्रसादकुंभमेळा अतिरिक्त आयुक्त कल्पना नायरसहायक जिल्हाधिकारी अर्पिता ठुबे आदी उपस्थित होते.

धानोरा तालुक्यातील 10 शाळांसाठी सोलर प्रकल्पास मंजुरी

 धानोरा तालुक्यातील 10 शाळांसाठी सोलर प्रकल्पास मंजुरी

मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी 31 ऑक्टोबर 2025 रोजी 'सोलर शाळा प्रकल्पा'अंतर्गत रोझी ब्लू फाऊंडेशनला काम करण्यास मंजुरी दिली.

पहिल्या टप्प्यात फाऊंडेशनने धानोरा तालुक्यातील दहा जिल्हा परिषद शाळांमध्ये सौर ऊर्जेवर आधारित युनिट्स उपलब्ध करून देण्याचा उपक्रम हाती घेतला. यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धानोरामुसक्यासालेभट्टीरांगीनिमगावदुडमलामुरूमगावबन्धोनातसेच जिल्हा परिषद हायस्कूल धानोरा आणि मोहली या शाळांचा समावेश आहे.

या प्रकल्पामुळे शाळांमधील अध्यापन व डिजिटल शैक्षणिक उपक्रमांना वीज पुरवठ्यावरील अवलंबन कमी होऊन अखंड सुविधा मिळेल व या शाळांमधील सुमारे 1,470 विद्यार्थ्यांना याचा थेट लाभ होईल.

मुख्यमंत्र्यांकडून विशेष कौतुक

 मुख्यमंत्र्यांकडून विशेष कौतुक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रोझी ब्लू फाऊंडेशन आणि त्यांच्या स्वयंसेवा प्लॅटफॉर्म 'कनेक्ट फॉर'च्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांचे विशेष कौतुक केले.

'कनेक्ट फॉर'च्या संस्थापक श्लोका अंबानी आणि सह-संस्थापक मानिती शाह यांनी गडचिरोली जिल्ह्यावर विशेष लक्ष केंद्रित करावेअशी सूचना स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिली होती.

अंबानी उद्योग समूहातील सदस्य श्लोका अंबानी यांनी नीती आयोगाने आकांक्षित जिल्हा’ म्हणून घोषित केलेल्या गडचिरोलीमध्ये शैक्षणिक पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी घेतलेला पुढाकार अत्यंत प्रशंसनीय असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून प्रकल्पाला सर्वतोपरी सहकार्य केले जाईलअशी ग्वाहीही त्यांनी दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योजक श्लोका अंबानी यांच्या पुढाकाराने गडचिरोलीत 'सोलर शाळा' उपक्रम

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योजक श्लोका अंबानी

यांच्या पुढाकाराने गडचिरोलीत 'सोलर शाळाउपक्रम

 

गडचिरोलीदि.13 :  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने आणि अंबानी उद्योग समूहातील सदस्य व 'रोझी ब्लू फाउंडेशन'च्या संचालिका श्लोका अंबानी यांच्या सामाजिक सहकार्यातून नक्षलग्रस्त व दुर्गम गडचिरोली जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांच्या सौर ऊर्जीकरणाचा महत्त्वपूर्ण उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

मजूर सहकारी संस्थांना नियमानुसार काम मिळावे

 मजूर सहकारी संस्थांना नियमानुसार काम मिळावे

मजूर सहकारी संस्थांच्या प्रलंबित मागण्यांबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली.  मजूर सहकारी संस्थांना शासन नियमानुसार कामे  मिळावीत यासाठी संबंधित विभागांना सहकार विभागाने अवगत करावेअशा सूचना सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिल्या.

या बैठकीस मजूर  सहकारी संस्थांचे राज्यस्तरीय प्रतिनिधी उपस्थित होते.

नियोजित स्वप्नपूर्ती सहकारी गृहनिर्माण संस्था नोंदणीसाठी प्रस्ताव सादर करावा

 नियोजित स्वप्नपूर्ती सहकारी गृहनिर्माण संस्था नोंदणीसाठी प्रस्ताव सादर करावा

-सहकार मंत्री बाबासाहेब पाटील

 

मुंबईदि. ११:- नवी मुंबईच्या खारघर येथील नियोजित स्वप्नपूर्ती सहकारी गृहनिर्माण संस्था क्रमांक ९ या संस्थेच्या  नोंदणीसाठी आवश्यक माहितीसह प्रस्ताव  सादर करावाअसे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सांगितले.

सहकार मंत्री पाटील यांच्या दालनात झालेल्या बैठकीच्या वेळी आमदार प्रवीण दरेकरआमदार प्रशांत ठाकूरसहकार विभागाचे प्रधान सचिव प्रविण दराडेसहकार आयुक्त दीपक तावरेसह सचिव संतोष पाटील आदी उपस्थित होते.

नियोजित स्वप्नपूर्ती सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या स्थापनेसाठी नियमानुसार आवश्यक असलेली सभासद संख्या काही कारणास्तव पूर्ण होत नाही. त्यामुळे या संस्थेच्या नोंदणीसाठी  विशेष बाब म्हणून निर्णय घेण्यासाठी प्रस्ताव सादर करावा. असे निर्देश देण्यात आले.


कर्नाळा नागरी सहकारी बँकेकडील ठेवीदारांच्या ठेवींबाबत सह

 कर्नाळा नागरी सहकारी बँकेकडील ठेवीदारांच्या ठेवींबाबत

सहकार विभागाने पुढाकार घ्यावा

-सहकार मंत्री बाबासाहेब पाटील

 

मुंबईदि. ११:- कर्नाळा नागरी सहकारी बँक लिमिटेडच्या ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत देण्यासाठी सहकार विभागाने पुढाकार घ्यावा. या बँकेच्या जप्त मालमत्ताकायदेशीर प्रकरणे या संदर्भात मुख्यमंत्री यांच्याकडे बैठकीचे आयोजन केले जाईल असे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सांगितले.

सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या दालनात झालेल्या  बैठकीच्या वेळी आमदार प्रवीण दरेकरआमदार प्रशांत ठाकूरसहकार विभागाचे प्रधान सचिव प्रविण दराडेसहकार आयुक्त दीपक तावरेसह सचिव संतोष पाटील आदी उपस्थित होते.

सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सांगितले, बँकेच्या ठेवीदारांना ठेवी परत देण्यासाठी  बँकेच्या ज्या मालमत्तासंदर्भात न्यायालयीन प्रकरणे सुरू आहेत यासंदर्भात देखील सहकार विभागाने आवश्यक तो पाठपुरावा करावा. एमपीआयडी यांच्याकडील विषयासंदर्भात कायदेशीर सल्ला घेण्यात यावा.

०००००

Featured post

Lakshvedhi