मुख्यमंत्र्यांकडून विशेष कौतुक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रोझी ब्लू फाऊंडेशन आणि त्यांच्या स्वयंसेवा प्लॅटफॉर्म 'कनेक्ट फॉर'च्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांचे विशेष कौतुक केले.
'कनेक्ट फॉर'च्या संस्थापक श्लोका अंबानी आणि सह-संस्थापक मानिती शाह यांनी गडचिरोली जिल्ह्यावर विशेष लक्ष केंद्रित करावे, अशी सूचना स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिली होती.
अंबानी उद्योग समूहातील सदस्य श्लोका अंबानी यांनी नीती आयोगाने ‘आकांक्षित जिल्हा’ म्हणून घोषित केलेल्या गडचिरोलीमध्ये शैक्षणिक पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी घेतलेला पुढाकार अत्यंत प्रशंसनीय असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून प्रकल्पाला सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
No comments:
Post a Comment