Thursday, 13 November 2025

कर्नाळा नागरी सहकारी बँकेकडील ठेवीदारांच्या ठेवींबाबत सह

 कर्नाळा नागरी सहकारी बँकेकडील ठेवीदारांच्या ठेवींबाबत

सहकार विभागाने पुढाकार घ्यावा

-सहकार मंत्री बाबासाहेब पाटील

 

मुंबईदि. ११:- कर्नाळा नागरी सहकारी बँक लिमिटेडच्या ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत देण्यासाठी सहकार विभागाने पुढाकार घ्यावा. या बँकेच्या जप्त मालमत्ताकायदेशीर प्रकरणे या संदर्भात मुख्यमंत्री यांच्याकडे बैठकीचे आयोजन केले जाईल असे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सांगितले.

सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या दालनात झालेल्या  बैठकीच्या वेळी आमदार प्रवीण दरेकरआमदार प्रशांत ठाकूरसहकार विभागाचे प्रधान सचिव प्रविण दराडेसहकार आयुक्त दीपक तावरेसह सचिव संतोष पाटील आदी उपस्थित होते.

सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सांगितले, बँकेच्या ठेवीदारांना ठेवी परत देण्यासाठी  बँकेच्या ज्या मालमत्तासंदर्भात न्यायालयीन प्रकरणे सुरू आहेत यासंदर्भात देखील सहकार विभागाने आवश्यक तो पाठपुरावा करावा. एमपीआयडी यांच्याकडील विषयासंदर्भात कायदेशीर सल्ला घेण्यात यावा.

०००००

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi