Thursday, 13 November 2025

आरोग्य पर्यटनाअंतर्गत राज्यात दंतोपचाराला मोठी संधी

 आरोग्य पर्यटनाअंतर्गत राज्यात दंतोपचाराला मोठी संधी

-         सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर

·         डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम डेंटल एक्सलन्स सेंटरला भेट

 

मुंबईदि. १२ : महाराष्ट्र शासन आरोग्य पर्यटनाला चालना देणार असूनराज्यात विशेषतः मुंबईत असलेल्या पायाभूत सुविधाकुशल तज्ज्ञ आणि कमी खर्चातील सेवा यामुळे दंत उपचाराला आरोग्य पर्यटनाच्या क्षेत्रात मोठी संधी असल्याचे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.

 

इंडियन डेंटल असोसिएशन (आयडीएतर्फे स्थापन करण्यात आलेल्या डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम एज्युकेशनरिसर्च अँड इन्क्युबेशन सेंटर (प्रभादेवीमुंबई) येथे सार्वजनिक आरोग्य मंत्री आबिटकर यांनी भेट देऊन केंद्राची पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते.

 

सार्वजनिक आरोग्य मंत्री आबिटकर म्हणाले कीदंतोपचारसेवेची जागतिक मागणी वाढत आहे. आंतरराष्ट्रीय रुग्णांना आकर्षित करण्यासाठी जागतिक दर्जाची सेवा मुंबईत आहे. इंडियन डेंटल असोसिएशन गिनीजबुक मध्ये रेकॉर्ड असलेली जागतिक दर्जाची संस्था गेली 78 वर्षे चांगली सेवा देत आहे. संशोधन आणि प्रशिक्षण क्षेत्रात आयडीए चे काम उत्तम आहे. राज्य शासन आणि इंडियन डेंटल असोसिएशन मिळून दंत आरोग्य जनजागृतीप्रतिबंधात्मक कार्यक्रमसंशोधन आणि कौशल्यविकास या क्षेत्रात काम करता येईलअसेही त्यांनी सांगितले.

 

यावेळी सार्वजनिक आरोग्य मंत्री आबिटकर यांचे स्वागत आयडीएचे मानद सरचिटणीस डॉ. अशोक धोबळे यांनी केले व अत्याधुनिक सुविधांची सविस्तर माहिती दिली. डॉ. अशोक धोबळे म्हणाले कीमंत्री प्रकाश आबिटकर यांची भेट आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. या भेटीने प्रत्येक नागरिकापर्यंत दर्जेदार आरोग्यसेवा पोहोचविण्याचा आमचा संकल्प अधिक दृढ झाला आहे.

 

हेल्दी स्माईल मिशन २०२५ अंतर्गत महाराष्ट्र शासन आणि इंडियन डेंटल असोसिएशन यांनी एकत्रितपणे दंत आरोग्य सुधारणा व प्रतिबंधात्मक सेवा देण्याचा संकल्प केला असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराज स्मारक उभारणीसंदर्भात बैठक

 संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराज स्मारक उभारणीसंदर्भात बैठक

·        सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांना संकल्पचित्राचे सादरीकरण

 

मुंबईदि. 12 :  रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराज स्मारक उभारण्याच्या अनुषंगाने या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील संकल्पचित्राचे सादरीकरण सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्याकडे करण्यात आले.

 

माजी आमदार प्रमोद जठार यांनी हे स्मारक वेगवेगळ्या टप्प्यात करून ते अधिक भव्यदिव्य व्हावे अशी मागणी केली होती. स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या धर्तीवर स्मारक उभारावेअशी सूचना केली होती. याबाबत संकल्पना समजून घेण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले.

 

सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.शेलार यांनी पहिल्या टप्प्यात संकल्पचित्रानुसार मुख्य स्मारकाचे काम करण्याचे निर्देश दिले. तसेच माजी आमदार प्रमोद जठार यांनी मांडलेल्या सूचनेनुसार आजूबाजूच्या परिसरात पर्यटकांसाठी सेवासुविधा व विकासाच्या कल्पनांचा अभ्यास करून सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देशी दिले. प्रस्तावित स्मारक 5 एकर क्षेत्रात उभारले जाणार असूनपार्किंग आणि अन्य सुविधांसाठी अतिरिक्त 2 एकर जागा शासनाने घेतली आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

लंडन मधील ऐतिहासिक ‘इंडिया हाऊस’ महाराष्ट्र शासन ताब्यात घेणार

 लंडन मधील ऐतिहासिक ‘इंडिया हाऊस’ महाराष्ट्र शासन ताब्यात घेणार

- सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार

 

मुंबईदि. 12 : भारतीय स्वातंत्र्यसैनिकांचे वास्तव्य असलेले लंडनमधील "इंडिया हाऊस"  महाराष्ट्र शासन ताब्यात घेऊन त्यास स्मारक म्हणून जतन करेल. या इंडिया हाऊसमध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे वास्तव्य होतेअशी माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी दिली.

 

सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.शेलार हे नागपूरकरचे रघूजीराजे भोसले यांची ऐतिहासिक तलवार आणण्यासाठी लंडन दौऱ्यावर होतेतेव्हा त्यांनी इंडिया हाऊसला भेट दिली होती. त्यावेळी लंडनस्थित भारतीयांनी ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली होती. तसेच नाशिकच्या आमदार देवयानी फरांदे यांनीही ही मागणी केली होती. याबाबत आमदार देवयानी फरांदेसामान्य प्रशासनसांस्कृतिक कार्यपुरातत्व विभागासह संबंधित विभागाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत संयुक्त बैठक घेऊन आढावा घेण्यात आला.

 

"मित्रा"च्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करून त्यात सामान्य प्रशासन विभागसांस्कृतिक कार्य विभागपुरातत्व विभाग आणि वित्त विभागाचा सहभाग असेल. ही समिती इंडिया हाऊस’ ताब्यात घेण्याबाबतचा सर्वंकष अहवाल तयार करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा येथील स्मारक उभारणीसाठी राजशिष्टाचार

 छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा येथील स्मारक उभारणीसाठी राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल समन्वयक

मुंबईदि.12:- आग्रा येथे ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांना नजरकैदेत ठेवण्यात आले होतेती वास्तू महाराष्ट्र शासन अधिग्रहित करून तेथे स्मारक उभारले जाणार आहे. यासाठी आग्रा येथील या जागेचे अधिग्रहण व संबंधित प्रक्रिया राबविण्याकरिता उत्तर प्रदेश शासनाशी समन्वय साधण्यासाठी 'समन्वयकम्हणून पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीला 395 वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर आग्रा येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना नजरकैदेत ठेवण्यात आले होतेत्या ऐतिहासिक स्थळावर महाराष्ट्र शासनामार्फत भव्य स्मारक उभारले जाणार असल्याचे जाहीर केले होते. यासाठी आवश्यक निधीची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात येईलअसेही सांगितले होते.

या स्मारकाच्या उभारणीसाठी पर्यटन विभागाला नोडल विभाग म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. तसेच आग्रा येथील शिवरायांच्या मुक्कामाच्या जागेचे अधिग्रहण व संबंधित प्रक्रिया राबवण्यासाठी उत्तर प्रदेश शासनाशी समन्वय साधण्यासाठी राजजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांची समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा आग्रा येथील मुक्काम हा स्वराज्याच्या इतिहासातील महत्वपूर्ण घटना आहे. त्या ऐतिहासिक स्मृती जतन करण्यासाठी हे स्मारक उभारले जाणार आहे.

आशा सेविकांचे मानधन वेळेत मिळावे, यासाठी काटेकोर पावले

 सार्वजनिक आरोग्य मंत्री आबिटकर म्हणाले कीआशा सेविकांचे मानधन वेळेत मिळावेयासाठी काटेकोर पावले उचलावीत. विलंब करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. तसेच डीबीटी योजनेंतर्गत निधी लाभार्थ्यांच्या खात्यावर वेळेत पोहोचावायासाठी प्रक्रियेमध्ये सुधारणा करण्यावर भर देण्यात यावा. गरजेच्या वस्तूंचीच खरेदी सीएसआर माध्यमातून करावीतसेच गरजू रुग्णांना आरोग्यसेवा पुरवण्यासाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावायासाठी तरतूद करावी.आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी आवश्यक निधीची तरतूद करावीतसेच पॉलिएटिव्ह केअर कार्यक्रम प्रभावीपणे राबवावाकर्करोग रुग्णांना दर्जेदार सेवा मिळाव्यात यासाठी स्वतंत्र मूल्यमापन समिती नेमावी. मानसिक आरोग्यआयूष सेवांचा विस्तार आणि आरोग्यविषयक जनजागृती या विषयांवर विशेष भर द्यावा. नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन नियोजन करावेराज्यातील सर्व आरोग्य समन्वयकांच्या मासिक बैठका घेऊन कामाचे मूल्यमापन नियमितपणे करावेविभागाच्या अधिकाऱ्यांनी आपल्या अनुभवाचा उपयोग करून सेवांचा दर्जा उंचवावाअसे निर्देशही सार्वजनिक मंत्री आबिटकर यांनी दिले.

आरोग्य विभागाचा निधी रचनात्मक आणि परिणामकारक कामांवर खर्च व्हावा

 आरोग्य विभागाचा निधी रचनात्मक आणि परिणामकारक कामांवर खर्च व्हावा असे सांगून सार्वजनिक आरोग्य मंत्री आबिटकर म्हणाले कीविशेषतः लसीकरणकर्करोग निदान व उपचारतसेच सिकल सेल अनुवांशिक आजार नियंत्रणासाठी ठोस उपक्रम राबवावेत. या सेवांसाठी आवश्यक निधी नियोजनपूर्वक वितरित करावा. राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएमअंतर्गत देशभरात सुरू असलेल्या नवकल्पनांचा अभ्यास करूनमहाराष्ट्रासाठी उपयुक्त योजना समाविष्ट कराव्यात. विभागाने तज्ज्ञांचे मत जाणून घेत नियोजन करावेतसेच आरोग्यसेवा पुरवताना नागरिकांना अधिकाधिक सुविधा मिळतील याची काळजी घ्यावीअसे श्री. आबिटकर यांनी सांगितले.

नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा पुरवण्यासाठी सेवांची प्रभावी अंमलबजावणीआरोग्य सेवेच्या गुणवत्तेसाठी रचनात्मक उपक्रमांवर

 नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा पुरवण्यासाठी सेवांची प्रभावी अंमलबजावणी करावी

- सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर

आरोग्य सेवेच्या गुणवत्तेसाठी रचनात्मक उपक्रमांवर भर देण्याचे निर्देश

मुंबईदि. १२ : राज्यातील आरोग्यसेवा अधिक प्रभावी आणि दर्जेदार करण्यासाठी विभागामार्फत रचनात्मक कामांवर भर द्यावातसेच नागरीकांना पुरवण्यात येणाऱ्या आरोग्य सेवांची प्रभावी अंमलबजावणी करावी असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले. आरोग्य भवन येथे आरोग्य विभागाच्या विविध सेवांचा आढावा मंत्री आबिटकर यांनी घेतला त्या वेळी ते बोलत होते. या बैठकीत लसीकरणकर्करोग निदानसिकल सेल नियंत्रणमानसिक आरोग्यमधुमेह आणि उच्च रक्तदाब या विषयांवर चर्चा झाली.

बैठकीस आरोग्य सेवा आयुक्त कादंबरी बलकवडेआरोग्य संचालक डॉ. नितीन अंबाडेकरसंचालक डॉ. विजय कंदेवाडसहसंचालक डॉ. सुनिता कोल्हाहित, सहसंचालक सांगळेसहाय्यक संचालक दीप्ती पाटील देशमुख यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Featured post

Lakshvedhi