Thursday, 13 November 2025

आशा सेविकांचे मानधन वेळेत मिळावे, यासाठी काटेकोर पावले

 सार्वजनिक आरोग्य मंत्री आबिटकर म्हणाले कीआशा सेविकांचे मानधन वेळेत मिळावेयासाठी काटेकोर पावले उचलावीत. विलंब करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. तसेच डीबीटी योजनेंतर्गत निधी लाभार्थ्यांच्या खात्यावर वेळेत पोहोचावायासाठी प्रक्रियेमध्ये सुधारणा करण्यावर भर देण्यात यावा. गरजेच्या वस्तूंचीच खरेदी सीएसआर माध्यमातून करावीतसेच गरजू रुग्णांना आरोग्यसेवा पुरवण्यासाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावायासाठी तरतूद करावी.आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी आवश्यक निधीची तरतूद करावीतसेच पॉलिएटिव्ह केअर कार्यक्रम प्रभावीपणे राबवावाकर्करोग रुग्णांना दर्जेदार सेवा मिळाव्यात यासाठी स्वतंत्र मूल्यमापन समिती नेमावी. मानसिक आरोग्यआयूष सेवांचा विस्तार आणि आरोग्यविषयक जनजागृती या विषयांवर विशेष भर द्यावा. नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन नियोजन करावेराज्यातील सर्व आरोग्य समन्वयकांच्या मासिक बैठका घेऊन कामाचे मूल्यमापन नियमितपणे करावेविभागाच्या अधिकाऱ्यांनी आपल्या अनुभवाचा उपयोग करून सेवांचा दर्जा उंचवावाअसे निर्देशही सार्वजनिक मंत्री आबिटकर यांनी दिले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi