नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा पुरवण्यासाठी सेवांची प्रभावी अंमलबजावणी करावी
- सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर
आरोग्य सेवेच्या गुणवत्तेसाठी रचनात्मक उपक्रमांवर भर देण्याचे निर्देश
मुंबई, दि. १२ : राज्यातील आरोग्यसेवा अधिक प्रभावी आणि दर्जेदार करण्यासाठी विभागामार्फत रचनात्मक कामांवर भर द्यावा, तसेच नागरीकांना पुरवण्यात येणाऱ्या आरोग्य सेवांची प्रभावी अंमलबजावणी करावी असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले. आरोग्य भवन येथे आरोग्य विभागाच्या विविध सेवांचा आढावा मंत्री आबिटकर यांनी घेतला त्या वेळी ते बोलत होते. या बैठकीत लसीकरण, कर्करोग निदान, सिकल सेल नियंत्रण, मानसिक आरोग्य, मधुमेह आणि उच्च रक्तदाब या विषयांवर चर्चा झाली.
बैठकीस आरोग्य सेवा आयुक्त कादंबरी बलकवडे, आरोग्य संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, संचालक डॉ. विजय कंदेवाड, सहसंचालक डॉ. सुनिता कोल्हाहित, सहसंचालक सांगळे, सहाय्यक संचालक दीप्ती पाटील देशमुख यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment