Tuesday, 4 November 2025

एकल महिलांना पुनर्विवाहासाठी आर्थिक मदत व पात्र एकल महिला लाभार्थींनाही घरकुल योजनेचा लाभ देण्याचे निर्देश

 एकल महिलांना विविध योजनांचे लाभ मिळवून देण्यासाठी

 विशेष अभियान राबवावे

-  उपमुख्यमंत्री अजित पवार

·         एकल महिलांना पुनर्विवाहासाठी आर्थिक मदत व

पात्र एकल महिला लाभार्थींनाही घरकुल योजनेचा लाभ देण्याचे निर्देश

 

       

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणालेएकल महिलांना समाजात सन्मानाची  वागणूक देणेमालमत्तेचे हक्क देणेआरोग्य सेवा उपलब्ध करून देणेत्यांना आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या सक्षम करून स्वावलंबी आणि आत्मनिर्भर करण्याची गरज आहे. त्यासाठी सर्वसमावेशक धोरण तयार करावे. केरळ आणि तामिळनाडू या राज्यांच्या धर्तीवर महाराष्ट्रात एकल महिलांना पुनर्विवाहासाठी आर्थिक मदत करावी. पात्र एकल महिला लाभार्थींना सुद्धा घरकुल योजनेचा लाभ द्यावाअसे निर्देशही उपमुख्यमंत्र्यांनी दिले.

राज्यातील एकल महिलांचे सर्वेक्षण करून राज्यस्तरीय संगणकीय डेटाबेस प्रणाली तयार करणेअंगणवाडी सेविका निवड प्रक्रियेप्रमाणे शासन निर्णयात बदल करून एएनएमस्टाफ नर्स निवड आणि एनएचएम भरती प्रक्रियेत एकल महिलांना प्राधान्य देणेत्यांना शासकीय कागदपत्रे उपलब्ध करून देणेव्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून देणेएकल महिलांसाठी गाव पातळीवर जागरूकता शिबिरे आणि मार्गदर्शन सत्र आयोजित करणे,अशा विविध विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली.

००००

एकल महिलांना विविध योजनांचे लाभ मिळवून देण्यासाठी विशेष अभियान राबवावे

 एकल महिलांना विविध योजनांचे लाभ मिळवून देण्यासाठी

 विशेष अभियान राबवावे

-  उपमुख्यमंत्री अजित पवार

·         एकल महिलांना पुनर्विवाहासाठी आर्थिक मदत व

पात्र एकल महिला लाभार्थींनाही घरकुल योजनेचा लाभ देण्याचे निर्देश

 

         मुंबई, दि. ३ : एकल महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम व स्वावलंबी बनविण्यासाठी त्यांना शासनाच्या विविध योजनांचे लाभ मिळवून देण्याची गरज आहे.त्यासाठी राज्यात प्रत्येक जिल्हा परिषद गटनिहाय विशेष अभियान राबवावे,असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री राज्य अतिथीगृह गृह येथे एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी पुणे जिल्हा परिषदेने सुरू केलेल्या मोहिमेच्या धर्तीवर राज्यस्तरावर अभियान राबविण्याबाबत बैठक झाली.

यावेळी महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरेराज्यमंत्री मेघना बोर्डीकर - साकोरेसामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव तथा पुणे जिल्ह्याच्या पालक सचिव व्ही.राधामहसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगेअन्न व नागरी पुरवठा विभागाचे अपर मुख्य सचिव अनिल डिग्गीकरनियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजयवित्त विभागाच्या सचिव शैला ए.ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवलेमहिला व बाल विकास विभागाचे सचिव अनुप कुमार यादव,उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ.राजेश देशमुखसार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव डॉ.निपुण विनायकपुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील उपस्थित होते.

पायाभूत सुविधा वॉर रूम बैठकीत विकास प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

 बीडीडी चाळ अत्यावश्यक प्रकल्प’ म्हणून घोषित करा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

पायाभूत सुविधा वॉर रूम बैठकीत विकास प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

 

मुंबईदि. 3 : राज्यातील सुरू असलेले विकास प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण करण्यात यावे. हे प्रकल्प सुरू असताना येणाऱ्या अडचणी तात्काळ दूर करण्यात याव्यात तसेच नवीन प्रकल्प दोन ते अडीच वर्षात पूर्ण झाले पाहिजेअसे नियोजन करण्यात यावे. विविध विकास प्रकल्प तयार करताना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावाअसे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. बीडीडी चाळ हा अत्यावश्यक प्रकल्प म्हणून घोषित करण्याची सूचनाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली.

 

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत मुंबई मेट्रो लाईन - 2 - बी ही डी.एन.नगर ते डायमंड गार्डन-

 मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत मुंबई मेट्रो लाईन - 2 - बी ही डी.एन.नगर ते डायमंड गार्डन-मंडाले या मार्गाने धावणार असून यात 19 स्टेशन्स असणार आहे. हा मेट्रो प्रकल्प 31 मार्च 2027 पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, स्वामी समर्थनगर ते विक्रोळी ही मेट्रो लाईन 31 डिसेंबर 2026 पर्यंत पूर्ण करण्यात यावी. याकरिता नगरविकास विभागाने श्याम नगर स्टेशन येथील जमिनीसंदर्भातील अडचणी 15 दिवसात सोडवाव्यात. शिवडी ते वरळी हा जोडमार्ग प्रकल्प दिवसरात्र कामे करून पूर्ण करण्यात यावा. जे प्रकल्प मागे पडले ते वेळेत कसे पूर्ण होतील, यासाठी संबंधित अधिकारी आणि कंत्राटदाराने लक्ष देण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणामार्फत मान-हिंजेवाडी-शिवाजीनगर या मेट्रो लाईन 3 चे

 पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणामार्फत मान-हिंजेवाडी-शिवाजीनगर या मेट्रो लाईन 3 चे कामकाज 31 मार्च 2026 पर्यंत पूर्ण होणार आहे. नायगाव येथील बीडीडी चाळ प्रकल्प जून 2029 पर्यंत पूर्ण तर वरळी येथील प्रकल्प मे 2029 पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना केल्या. मुंबईतील एन.एम.जोशी बीडीडी चाळ प्रकल्प हा जून 2031 पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडीडी चाळ’ प्रकल्पास अत्यावश्यक प्रकल्प म्हणून घोषित करण्याची सूचना केली.

ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्प, उत्तन विरार सी लिंक प्रकल्प, ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह शहरी बोगदा प्रकल्प

 ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पउत्तन विरार सी लिंक प्रकल्पऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह शहरी बोगदा प्रकल्प योग्य नियोजन करून वेळेत पूर्ण होईलअसे पाहण्याचे निर्देश देवून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले कीऐरोली-कटई नाका फ्रीवे प्रकल्पामुळे प्रवासाचा वेळ 20 मिनिटावर येणार आहे. यासाठी जमीन अधिग्रहणासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने तात्काळ रक्कम द्यावी असेही निर्देश दिले.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास प्राधिकरणामार्फत वडपे-ठाणे

 महाराष्ट्र राज्य रस्ते विकास प्राधिकरणामार्फत वडपे-ठाणे हा 23.8 कि.मी. रस्ता बांधकाम सुरू असून यातील 19 किमीचा रस्ता तयार झाला असून संपूर्ण रस्ता मार्च 2026 पर्यंत पूर्ण होणार आहे. हा रस्ता समृद्धी महामार्गासाठी महत्त्वपूर्ण असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

त्याचबरोबर मुंबई पुणे मिसिंग लिंकचे काम लवकर पूर्ण करण्यात येणार आहे. वांद्रे -वर्सोवा सी लिंक प्रकल्पाचे काम धीम्या गतीने सुरू असल्याबाबत मुख्यमंत्र्यांनी यावेळी नाराजी व्यक्त केली. हा प्रकल्प वेळेत पूर्ण होण्यासाठी संबंधित कंत्राटदाराने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून वेळेत कामे पूर्ण करण्याचे आदेश दिले.

Featured post

Lakshvedhi