Tuesday, 4 November 2025

‘सर्व्हायकल कॅन्सर फ्री पुणे’ अभियानाचा

 ‘सर्व्हायकल कॅन्सर फ्री पुणे’ अभियानाचा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शुभारंभ

            मुंबई दि.३ : पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या सर्व्हायकल कॅन्सर फ्री पुणे अभियानाचा शुभारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते  सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे करण्यात आला.

यावेळी उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुखपुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटीलपुणे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारेउपमुख्यमंत्र्यांचे सहसचिव डॉ.संतोष भोसलेसिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाजीविका फाउंडेशनयुनियन बँकअमेरिका - इंडिया फाउंडेशन या संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

स्त्रियांमध्ये होणारा सर्व्हायकल कॅन्सर हा देशातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठ्या प्रमाणात आढळून येणारा आजार आहे. एचपीव्ही लस आणि वेळेवर केलेल्या स्क्रीनिंगमुळे या आजाराला प्रभावीपणे प्रतिबंध करता येऊ शकतो. त्यामुळे या आजाराच्या बाबतीत महिलांमध्ये जनजागृती करणे आणि लसीकरणाचे प्रमाण वाढवण्याची गरज आहेअसे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी यावेळी अभियानासंदर्भात सादरीकरण केले.

या प्रकल्पाचा उद्देश सर्व्हायकल कॅन्सरच्या संदर्भात प्रतिबंध,जनजागृतीलसीकरण आणि समायोजित स्क्रीनिंगच्या माध्यमातून   कॅन्सरचं संपूर्णपणे निर्मूलन करणं हा आहे. या उपक्रमांतर्गत शाळांमध्ये लसीकरणाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे. त्याचबरोबर आशा सेविकांकडून घराघरात जाऊन महिला वर्गासाठी सर्व्हायकल कॅन्सर स्क्रीनिंगची माहिती दिली जाणार आहे,अशी माहिती यावेळी देण्यात आली.

0000

डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीरण योजनेच्या लाभासाठी १४ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

  

डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीरण योजनेच्या लाभासाठी

 १४ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 

मुंबई, दि. ३ :- अल्पसंख्यांक विद्यार्थी बहुल शासनमान्य खासगी अनुदानितविनाअनुदानितकायम विना अनुदानितकनिष्ठ महाविद्यालयेऔद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळांमध्ये पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीरण योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या अनुदानासाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील संस्थांनी १४ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा अल्पसंख्यांक अधिकारी संजयकुमार शिंदे यांनी केले आहे.

 

योजनेचा लाभ राज्यातील धर्मादाय आयुक्त अथवा वक्फ बोर्डाकडे नोंदणीकृत असलेल्या मदरसांना दिला जाणार आहे. ज्या मदरसांना मदरशांमध्ये गुणवत्तापुर्ण शिक्षण देणाऱ्या केंद्र शासनाच्या योजनांतर्गत लाभ मिळाला आहे अशा मदरशांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. अधिक माहितीसाठी 022 69403370/19 या क्रमांकावर संपर्क साधावा.

मुलांमध्ये लठ्ठपणा, मधुमेह, अस्थमा, मानसिक आरोग्य या समस्या आणि रक्तविकार

 आधुनिक जीवनशैलीअसंतुलित आहार आणि शारीरिक निष्क्रियतेमुळे मुलांमध्ये लठ्ठपणामधुमेहअस्थमामानसिक आरोग्य या समस्या आणि रक्तविकार झपाट्याने वाढत आहेत. भावी पिढीसाठी ही चिंतेची बाब असून  लोकप्रतिनिधीशाळापालक सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन या आजाराविरुद्ध यशस्वी लढा देण्यात पुढाकार घ्यावा. महाराष्ट्र राज्याने  बाल मृत्यूदर कमी करण्यात देशाला दिशा दिली आहे. त्याचप्रमाणे बालकामधील असंसर्गजन्य आजार रोखण्यासाठी राज्याने दिशादर्शक असे काम करावेअशी अपेक्षा युनिसेफचे डॉ. संजय सिंह यांनी यावेळी व्यक्त केली.

 

किशोरवयीन मुलांमध्ये अस्थमालठ्ठपणामधुमेह वाढत आहे  असे सांगून डॉ. मृदला फडके म्हणाल्या असंसर्गजन्य आजारांबाबत व्यापक जनजागृती करणे आवश्यक आहे. असंसर्गजन्य आजारात किशोरवयीन मुलींच्या आरोग्यावर अधिक लक्ष केंद्रित करणे गरजेचे असल्याचेही त्या म्हणाल्या.

 

यावेळी युनिसेफचे डॉ. मंगेश गाधारी आणि  आरोग्य सेवा संचालक यांनीही मनोगत व्यक्त केले.

सृदृढ बालके आपल्या देशाचे भविष्य असून त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे हे उज्ज्वल भविष्यासाठी

 सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर म्हणाल्यासृदृढ बालके आपल्या देशाचे भविष्य असून त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे हे उज्ज्वल भविष्यासाठी गुंतवणूक करणे आहे. मुलांमधील असंसर्गजन्य आजार याविषयी अधिक व्यापक जनजागृती होण्यासाठी अधिवेशन काळात विधिमंडळ सदस्यांसाठी कार्यशाळा आयोजित केली जाईल असेही त्यांनी सांगितले. राज्याचा आरोग्य विभाग व युनिसेफ यांच्यामार्फत आरोग्यदायी बालपण ही संकल्पना राबविण्यात येणार असून यामध्ये लोकप्रतिनिधींचा सहभाग व  पुढाकार महत्वाचा असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

 

राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर म्हणाल्याआधुनिक जीवनशैलीबदलती आहार पद्धती आणि शारीरिक निष्क्रियतेमुळे मुलांमध्ये लठ्ठपणामधुमेहउच्च रक्तदाबमानसिक ताणतणाव यासारखे असंसर्गजन्य आजार वाढत आहेत. यावर मात करण्यासाठी  समाजशाळापालक आणि लोकप्रतिनिधींची जबाबदारी महत्वाची आहे. आपल्या भागातील प्रत्येक बालक सृदृढनिरोगी राहावेते शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असावे यासाठी आरोग्य विभागामार्फत राबविण्यावर येणारे उपक्रम यशस्वीपणे राबिण्यावर भर देण्यात यावा. तसेच शाळांमध्ये नियमित आरोग्य तपासणी शिबिरेतंदुरुस्त बालपण मोहीम आयोजनपौष्टिक आहार आणि शारीरिक क्रियाशीलतेबाबत जनजागृती आणि मुलांच्या मानसिक आरोग्याकडे विशेष लक्ष देण्यात यावेअसे आवाहन त्यांनी केले.

मुलांमधील असंसर्गजन्य आजार रोखण्यासाठी एसओपी तयार करणार -

 मुलांमधील असंसर्गजन्य आजार रोखण्यासाठी

एसओपी तयार करणार

-         सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

 

मुंबईदि. ३ : राज्यातील जनतेचे आरोग्य सदृढ राहावे आणि सर्वसामान्य नागरिकांना आरोग्याच्या सुविधा विनासायास उपलब्ध व्हाव्यात यासाठी राज्य शासन सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात अनेक उपक्रम राबवत आहे. याच पार्श्वभूमीवर मुलांमधील असंसर्गजन्य आजार रोखण्यासाठी सर्वसमावेशक मार्गदर्शक सूचना (एसओपी) तयार करण्यात येणार असल्याचे  सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी सांगितले.

 

मुलांमधील असंसर्गजन्य आजार एक वाढती समस्या या विषयी सार्वजनिक आरोग्य विभाग आणि युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यशाळेत मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. कार्यशाळेस युनिसेफचे संजय सिंहआरोग्य सेवा संचालकडॉ. विजय कंदेवाड (दूरदृश्य प्रणालीद्वारे)महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. मृदुला फडके‘युनिसेफ’चे डॉ. मंगेश गाधारी उपस्थित होते. काही लोकप्रतिनिधी दूरदृश्य प्रणालीद्वारे या कार्यशाळेत सहभागी झाले होते.

 

सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर म्हणाल्यासृदृढ बालके आपल्या देशाचे भविष्य असून त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे हे उज्ज्वल भविष्यासाठी गुंतवणूक करणे आहे. मुलांमधील असंसर्गजन्य आजार याविषयी अधिक व्यापक जनजागृती होण्यासाठी अधिवेशन काळात विधिमंडळ सदस्यांसाठी कार्यशाळा आयोजित केली जाईल असेही त्यांनी सांगितले. 

गौरविलेल्या सरपंचांच्या गावांमध्ये स्मार्ट अंगणवाड्यांची उभारणी -

 गौरविलेल्या सरपंचांच्या गावांमध्ये स्मार्ट अंगणवाड्यांची उभारणी

- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

 

मुंबईदि. ३ : राज्यातील अंगणवाड्यांना आधुनिकसशक्त आणि पारदर्शक बनवून बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी स्मार्ट अंगणवाडी योजनेअंतर्गत राज्यभरात व्यापक कार्यवाही सुरू आहे. या योजनेअंतर्गत उत्कृष्ट सरपंच म्हणून गौरविण्यात आलेल्या १३ सरपंचांच्या गावांमध्ये स्मार्ट अंगणवाड्या उभारण्यात आल्या असल्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.

 

महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की१३ गावांतील अंगणवाड्यांना स्मार्ट स्वरूप देण्यात आले आहे. या केंद्रांमध्ये अत्याधुनिक सुविधाडिजीटल शिक्षण साधनेतसेच बालक आणि मातांसाठी आरोग्य व पोषण जनजागृती उपक्रम सुरू करण्यात आले आहेत. हे काम पूर्ण झाल्याचा मनस्वी आनंद आहे. एकात्मिक बालविकास सेवा (आयसीडीएसयोजनेअंतर्गत अंगणवाड्यांमध्ये बालकांना आरोग्यपोषण आणि पूर्व-प्राथमिक शिक्षण या तिन्ही क्षेत्रांत मूलभूत सेवा पुरविल्या जातात. या अंगणवाड्यांना स्मार्ट बनविण्याच्या उपक्रमामुळे त्यांच्या पायाभूत सोयी-सुविधांमध्ये सुधारणा झाली असूनशिक्षण आणि पोषण सेवा अधिक प्रभावी पद्धतीने दिल्या जात आहेत.

 

महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी म्हणाल्या कीस्मार्ट अंगणवाडी हे केवळ इमारतीचे नव्हेतर बालक आणि मातांच्या उज्ज्वल भविष्याचे प्रतीक आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि संवेदनशील  दृष्टिकोन यांचा संगम घडवून अंगणवाड्यांना आदर्श केंद्र बनवण्याचा प्रयत्न आहे. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील बालकांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार असूनराज्यातील सर्व अंगणवाड्यांना टप्प्याटप्प्याने स्मार्ट स्वरूप देण्यासंदर्भात कार्यवाही सुरू असल्याचेही तटकरे यांनी सांगितले.

0000

ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्प, उत्तन विरार सी लिंक प्रकल्प, ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह

 ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पउत्तन विरार सी लिंक प्रकल्पऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह शहरी बोगदा प्रकल्प योग्य नियोजन करून वेळेत पूर्ण होईलअसे पाहण्याचे निर्देश देवून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले कीऐरोली-कटई नाका फ्रीवे प्रकल्पामुळे प्रवासाचा वेळ 20 मिनिटावर येणार आहे. यासाठी जमीन अधिग्रहणासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने तात्काळ रक्कम द्यावी असेही निर्देश दिले.

Featured post

Lakshvedhi