डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीरण योजनेच्या लाभासाठी
१४ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
मुंबई, दि. ३ :- अल्पसंख्यांक विद्यार्थी बहुल शासनमान्य खासगी अनुदानित, विनाअनुदानित, कायम विना अनुदानित, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळांमध्ये पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीरण योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या अनुदानासाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील संस्थांनी १४ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा अल्पसंख्यांक अधिकारी संजयकुमार शिंदे यांनी केले आहे.
योजनेचा लाभ राज्यातील धर्मादाय आयुक्त अथवा वक्फ बोर्डाकडे नोंदणीकृत असलेल्या मदरसांना दिला जाणार आहे. ज्या मदरसांना मदरशांमध्ये गुणवत्तापुर्ण शिक्षण देणाऱ्या केंद्र शासनाच्या योजनांतर्गत लाभ मिळाला आहे अशा मदरशांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. अधिक माहितीसाठी 022 69403370/19 या क्रमांकावर संपर्क साधावा.
No comments:
Post a Comment